पहाटेच जाग आली 

कोणी टकटक करीत होते,🤛🏼

दार उघडून पाहिले बाहेर 

तर कुणीच उभे नव्हते...🤔


आवाजाच्या दिशेने बघताच 

खिडकीवर दिसला एक पक्षी,🐥

चोचीने टकटक करीत तावदानावर 

उमटवीत होता नक्षी...🐧


"का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,

"भाड्याने मिळेल का एखादे झाड 🌳

घरटे बांधण्यासाठी?,

एकटा कुठेही कसाही राहिलो असतो 

पण जागा हवी 

पिल्लांसाठी...🐣


 

तुमच्या भाऊबंदांनी लुटले 

आमचे रान केले निर्वासित,🤯

बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी 

असतो आता फिरस्तित...


वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत 

थोडे दाणे अन पाणी,🍲🫙

पण निवाऱ्याचे काय? 

हे लक्षात घेतच नाही कुणी...


पोटाला हवेच, खातो ती भिक 

अन नेतो थोडे घरी,🦜

खायला तर हवच, 

जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...🐦


कधीकधी वाटते  करावी आत्महत्या🦉

बसुन विजेच्या तारेवर,

किंवा द्यावा जीव लोटून 

त्या उंच मोबाईल टाॅवरवर...🦇


 

जसे मग आत्महत्ये नंतर 

सरकार काही देते शेतक-याला,🦩

तसेच मिळेल का एखादं झाड 

माझ्या पिल्लांना तरी आस-याला"🕊️


ऐकून मी चक्रावलो, खरचं 

एवढा विचार मी नव्हता केला,🦃

जंगलतोडीत त्यांच्या घरांचा 

विचार कुठेच नाही झाला...🦤


मी हात जोडून म्हटले, 

"त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,🦢

पण आत्महत्या करू नको 

खरचं मनापासुन सांगतो...🦚


तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर 

बांध वनरुम किचन खोपा,🐓

अडचण होईल पण आत्ता तरी 

एवढाच उपाय आहे सोपा..."🦅


तो म्हणाला, "खुप उपकार होतील, 

पण भाडे कसे देणार?",🦆

"रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव, 

बाकी काही नाही मागणार..."🦜


तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात 

पण बाकी नातलगांच काय?,🦋

त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी, 

कुठे ठेवतील पाय...?"🐾


"अरे लावताहेत आता झाडे 

अन जगवतात आता कुणी कुणी,🐸

बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग 

आत्महत्या करू नका कुणी..."🙈


ऐकुन तो पक्षी उडाला 

काड्या जमवायला घरट्यासाठी,🌿

अन मी पण मोबाइल उचलला 

तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...🙊


त्याची खिडकीवरची टकटक 

माझ्या मनाचे उघडले कवाड,⛩️

वाचुन तुम्ही पण लावाल ना 

कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...🌱


*निदान एक तरी झाड !*🌴


  🌳🌳 🌳🌳🌳

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा