हिममंद कणांचा खांब
जसें प्रतिबिंब
जडावें नयनीं,
मेघांवरचा रंग मालवुन
मेघांवरचा रंग मालवुन
दूर निघाले कोणी....
दूर निघाले कोणी, अवघें—
- दुःखच नेत्रीं जडलें
अंबर वरती विरलें
सांज - विसरल्या रात्रींपाशी
प्राणच मदिरा प्याले....
सांज - विसरल्या रात्रींपाशी
प्राणच मदिरा प्याले....
प्राणच मदिरा प्याले, नुरला -
दूर नदीचा पूल
भूलच सगळी भूल
धुळित हरवला चंद्र कुणाचा
धूळच झाली फूल....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा