👩एक बाई आपल्या आवडीचा रुमाल बँक कॅश काऊंटरवर विसरून जाते. 

ज्याकुणाचा आहे तो घेऊन जाईल असा विचार करून कॅशिअर बाजूला ठेवून देतो पण गडबडीत कॅशिअर कडून त्यावर २-४ स्टँप मारले जातात.


काहीवेळानं ती बाई आपला रुमाल शोधत येते. कॅशिअर तिला रुमाल देतो, ती रुमालावर शिक्के बघते, रागाने हे काय माझा रुमाल खराब केलात?

कॅशिअर पण चिडतो कोणी सांगितलं तुम्हाला इथं विसरून जायला ?

वादावादी वाढते आणि 

बाई चिडून तणतणत मॅनेजरच्या केबिन मध्ये जाऊन त्याला सगळं सांगते. 

मॅनेजर तिच्या कडून रुमाल मागून घेतो आणि त्यावर "All stamps are cancelled" चा शिक्का मारून त्यावर आपली सही करून त्या बाईला रुमाल परत करत सांगतो  "हे घ्या मॅडम आता रुमालावरचे सगळे स्टॅम्प कॅन्सल झालेत" 🫣


*स्टेट बँक ऑफ....*        


*..पुणे मेन ब्रँच* 


🤣😂🤣😂😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा