ऊर्मिला

त्या दाट लांब केसांचा 
वाऱ्यावर उडतो साज
दुःखांत अंबरें झुलती
कीं अंग झाकते लाज....

तरि हळू हळू येते ही
संध्येची चाहुल देवा
लांबती उदासिन क्षितिजें
पाण्यांत थांबल्या नावा....

देहास आठवे स्पर्श 
तूं दिला कोणत्या प्रहरीं 
कीं धुकें दाटलें होतें
या दग्ध पुरातन शहरी ....

सुख असें कळींतुन फुलतें 
व्यापतो वृक्ष आभाळ 
छायाच कशा दिसती मग 
आपुल्यापरी खडकाळ

आटले सरोवर जेथें
का मोर लागतो नाचूं ? 
तूं सोड ऊर्मिले आतां
डोळ्यांत बांधिला राघू....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा