तूं उदास मी उदास मेघही उदासले
स्मृतींतले विदग्ध नाद पैंजणांत सांडले
तुझ्या तनूंत चंद्रशिल्प सांजली निळीं जळें
जसा समुद्र आंधळा नि सूर्य दूर मावळे....
मंद मंद वाहते दिव्यांतली अनंतता
तुझ्या सुखांस गंधवीत लोचनीं निजे कथा....
अंगणांत ये सजून मृत्यु रोज एकला
पावसाळिं ये जसा नदीस पूर सावळा....
कुठें धुक्यांत चाललीस गर्दलें नभावरी
विश्वमंदल्या दिठींत रात्र थांबली जरी....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा