एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे.

तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे.

तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते....

हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ  वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.....

आता तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "सर, किती किंमत आहे या बाहुलीची?"

दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने  विचारतो " बोल तू काय देशील ?"

मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?"
दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत.  ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो.
मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो.

हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता व त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?"

दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला,
"आपल्यासाठी हि केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हि शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.
सगळ्या बायकांना हात जोडून नमस्कार.

आजही बायका वडाच्या झाडाच्या फांद्या तोडताना दिसतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून त्याला दोरे बांधणाऱ्या या निरागस बायका बघितल्या की सांगावं वाटतं, बाई त्या फांदीच आयुष्य का संपवलं? वड जास्त कामाचा आहे. औषधी आहे. हजारो लोकांना सावली देतो. तुझा नवरा पगार तरी घरी देतो का? पण मी असं बोलत नाही. आणि मला माहित आहे असं बरच काही डोक्यात येऊन पण बायका सुद्धा शांत बसतात.

खरतर जगात कुठलाच अर्थशास्त्रज्ञ देशाची अर्थव्यवस्था सांभाळायला सल्ला देण्यापलीकडे काही करू शकत नाही. घराची आर्थिक घडी बसवण्यात मात्र स्त्रीचं योगदान शंभर टक्के असत. तरी अर्धे नवरे बायकोला म्हणतात. तू गप्प बस. तुला व्यवहारातल काही कळत नाही. बायकांना गाडी चालवता येत नाही हे दहा वेळी गाडी ठोकलेले पुरुषसुद्धा तोंड वर करून बोलतात. तरी कशा ऐकून घेतात बायका?

हे सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी मनापासून प्रार्थना करणाऱ्या बायकांनो, सात पिढ्यात एकदाही तुमच्या नवऱ्याच्या खानदानात कुणाचंही नाव पेपर मध्ये आलं नसलं तरी तो न चुकता रोज पेपर घेऊन अर्धा तास toilet ला जातो. तेंव्हा बाहेरून कडी लावून त्याला दिवसभर कोंडून ठेवावं वाटतं तुम्हाला. पण तुम्ही एवढ्या दयाळू की तसं कधी करत नाही. तुम्हाला बघायची असते मालिका. पण नवरा खुशाल क्रिकेट बघत बसलेला असतो पाय पसरून. रागात रिमोट घालावा नवऱ्याच्या डोक्यात असं डोक्यात येतं. पण तसं तुम्ही करत नाही.

कधी छान आभाळ आलेलं असत, बाहेर पडावं, नवऱ्यासोबत पावसाचे थेंब झेलावेत अंगावर असं तुमच्या डोक्यात येतं. आणि नवरा सोफ्यावर पडल्या पडल्या म्हणतो ‘ मस्त कांदा भजी कर गं जरा.’ तेंव्हा आज कांद्या ऐवजी नवऱ्यालाच बेसनाच पीठ लावून कढईत टाकावं असं वाटून जातं. पण तरी तुम्ही भजी तळता. खमंग. उभ्या राहता खिडकीतल्या पावसाचे थेंब झेलत. तुमच्या मनातलं आभाळ मात्र डोळ्यात येतं. नवऱ्याला पत्ता नसतो त्या भरून आलेल्या आभाळाचा. नवरा मग आठवेल तेंव्हा भजी छान झालीत म्हणतो. आणि तुम्ही पण सुखात न्हावून निघाल्याचा अभिनय करता. नाहीतरी तुमच्या पैकी कित्येक जणींना पिझ्झाचे डोहाळे वडा पाववर भागवावे लागलेले असतात.

हे देशातल्या तमाम सोशिक बायकांनो,

कधी तुम्ही खूप राबून मोठ्या कौतुकाने सुरमई बनवलेली असते. वाटत असतं वासानेच वेडा होऊन मिठी मारेल नवरा. आणि दार उघडत तेंव्हा फक्त दारुचाच वास पसरलेला असतो घरभर. तेंव्हा सुरमईचा काटा काढावा त्या सहजतेने या नालायकाचा काटा काढावा असं वाटून जातं. पण असं काहीच तुम्ही करत नाही म्हणून आभारच मानले पाहिजेत. नवरे खुशाल म्हणतात ‘आजकालच्या बायका साधा फराळ पण करत नाहीत दिवाळीत. माझी आई काय काय बनवायची फराळाला.’ तेंव्हा तुम्ही ‘ तुमची आई फराळ बनवायची कारण तुमचे वडील रोज बिअर बार मध्ये चखन्याला शेव आणि चकली खाऊन येत नव्हते.’ असं का म्हणत नाही? तुम्ही रविवारी आराम करायचा ठरवलेलं असत. पण चार मित्र जमल्यावर पत्ते खेळता खेळता नवरा मोठ्या थाटात ‘ चहा टाक गं चार पाच कप आणि खायला दे काहीतरी..’ असं सांगतो. ओठावर येतं ‘नौकर आहे का मी?’ पण ते तुम्ही ओठातच ठेवता. का? आणि तरी सगळं जग म्हणत बायकांच्या पोटात काही रहात नाही. खरंतर ही पुरुषांनी सोयीस्करपणे स्वतःची समजूत घातलेली आहे. बायकांनी आपले काय काय अपराध पोटात घातलेत, बायकांचं नवऱ्या बद्दल खरं खरं मत काय आहे? हे जर त्या स्पष्ट बोलल्या तर कित्येक पुरुषांना पुन्हा आईच्या पोटात परत जावं वाटेल. या जगाला पुन्हा कधीही तोंड न दाखवण्यासाठी. तरीही हे सहिष्णू बायकांनो, मला खात्री आहे एक दिवस तुम्ही हे मनात साचलेलं नक्की बोलणार. पण आज एक पुरुष म्हणून मनापासून माफी मागतो तुम्हा सगळ्यांची. सगळ्या पुरुषांच्या वतीने.

ता.क. काही बायका म्हणतील मी असली बाई नाही. मी नाही ऐकून घेत. सरळ शिव्या देते नवऱ्याला. एकदा तर थोबाडीत पण ठेवून दिली. तर कृपया गैरसमज नसावा. हे पत्र तुमच्यासारख्या रणरागिणी साठी नाही. तमाम सोशिक, सहनशील आणि चोवीस तास घरात बिन पगारी राबणाऱ्या गृहिणींसाठी.

- अरविंद जगताप.
एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो.

शेजारचे काका : काय बेटा, पुढे काय करायचे ठरवले आहे?

मुलगा  : काही नाही काका, टाकि भरली की मोटार बंद करीन.

जमलेच नाही

एकटे राहणे जमलेच नाही
माणसांना टाळणे जमलेच नाही.

कष्टाची भाकरी गोड लागली
लुटावे कुणाला कधी जमलेच नाही .

चेहरा आरशासारखा स्वच्छ होता
मुखवटा लावणे जमलेच नाही .

जे लाभले ते  आनंदाने स्वीकारले
कष्ट नाकारणे जमलेच नाही .

जिंदगी साधी सरळ होती
भूल थापा मारणे जमलेच नाही
अंदमान  वर जाताना दोनरांगा  लागले होते. ..

वीणा वर्ल्ड वाले senior citizens. .आणि make-my-trip वाले  हनिमून  couples. ..

त्या वेळेचा एक उत्स्फूर्त विनोद . ..

" केसांना मेंदी लावलेले या बाजूला या. .. हाताला मेंदी लावलेले..त्या बाजूला जा... "

फक्त हिमतीने लढ👊

घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही 🐅

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?🎭

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?🕴

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
🐕
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂

कष्टकर्याची  जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे🤕

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧

🐝मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग😎

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?🌊💦

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊
मुंबईहून पुण्याला येताना नेमकं काय  होत❓













तापमानात घट होते...

आणी

अपमानात वाढ होते.