पुणेरी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुणेरी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 एक जण पुण्यात हिंडताना जाम वैतागला होता.


त्याला एकाने विचारले "काय झालं?" 


तर म्हणतो 


"पुण्यातल्या लोकांचं एक काही धड नसतं"...


टिळक कर्वे रोडवर राहतात


कर्वे फडके रस्त्यावर राहतात


फडके लेले आळीत राहतात 


लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात


बापट दांडेकर पुलाजवळ राहतात


दांडेकर गोखले नगरला राहतात 


गोखले भांडारकर रोड वर राहतात


भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात


रानडे केळकर रस्त्यावर राहतात


आणि केळकर टिळक रस्त्यावर राहतात.


अरे, आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी..!

पुणेरी पाहुणचार

एकदा साठेंकडे एक दूरचा पाहुणा अचानक येतो. महाशय येतात, बसतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होते. तेवढ्यात चहा येतो.

पाहुणा गरम गरम चहाचा एक मस्त फुरका मारतो.
तेवढ्यात साठे पाहुण्याला विचारतात, “काय हो उपवास वगैरे धरता की नाही?”

पाहुणा : नाही हो. आपल्याला पोटभर दाबून जेवण लागतं. दिवसातून तीन वेळा.
साठे : बरं, बरं. आपण मांसाहारी की शाकाहारी?

पाहुणा मनातल्या मनात खुश होतो. त्याला वाटतं, आज मस्त मेजवानी मिळणार.

पटकन म्हणतो, “म्हणजे काय? चिकन-कोंबडी हा तर आपला न धरलेल्या उपवासाचा फराळ आहे फराळ.”

साठे : नाही. त्याचं काय आहे. हिने बनवलेल्या चहात माशी पडली होती. उगाच तुमचा उपवास मोडायला नको म्हणून विचारलं.