आठवण-कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आठवण-कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तुझी आठवण

कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ... ॥१॥

आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥२॥

वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥


संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,
माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली ...॥४॥

कुणीतरी आठवण काढतंय

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जतीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतयं, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही !!

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
बळेच लेकचर करणे ते पण डुलक्या मारत
लेकचर बंक करीत पोरीच्या मागे फिरत
पोरीने मात्र दगा करायचा मागच्या गेटने आत शिरत

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
जर्नल पूर्ण करत तेही नाईट मारत मारत
चेक तरी कराना म्हणून म्याडेम च्या पाया पडत
शेवटच्या दिवशी मात्र ATKT साठीतरी अभ्यास करत
तीन तास पेपर लिहीत तरी अवघड होता म्हणून बोमबा मारत

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
फर्स्ट क्लास हुकला म्हणून बसायचे रडत
ATKT तरी मिळाली म्हणून मात्र हसत हसत
जीवावर आले कॅम्पस सोडून जाताना डोळे पुसत
जगावे लागतेय आज कुणाच्या तरी पुढे नाक घासत

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत


-अशोक खेडकर

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरि
एकाएकी तूच पुढे

नसता मनिमानसी अशी ही
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे

दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे


कवी     - अनिल
संगीत  - पं. कुमार गंधर्व
स्वर     - पं. कुमार गंधर्व
राग      - भीमपलास

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

काही तरी मिसिंग आहे...

आज बरंच काही कदाचित खूप काही आहे माझ्या कडे ...
पण तरी काही तरी मिसिंग आहेच...

असून पैसे आज माझ्या कडे,
पण तो 'कुल्फीवाला मामा' मिसिंग आहे...

खूप मित्र आहेत माझे पण,
ती 'कंचे खेळायची जागा' आज मिसिंग आहे...

आज ही ती शाळा तिथेच आहे,
पण माझा तो 'बाक' आज मिसिंग आहे...

सकाळी तर दर रोज उठतो मी,
पण ती झोप मोडणारी 'चिमण्यांची जोडी' आज मिसिंग आहे...

आईच्या हातची आंघोळ,
ती आजीच्या गप्पांनी रंगलेली रात्र,
आज कुठे तरी मिसिंग आहे..

आज बरंच काही कदाचित खूप काही आहे माझ्या कडे ...
पण तरी काही तरी खरच आज मिसिंग आहेच...

सांग आठवतोय ना तुला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....

..... सांग आठवशील ना मला ?



सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?


कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?

अवघड वळणावरचा वेडा बहाणा


तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला

तुजवर रचलेल्या कवितांमधून


जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?

तुझी आठवण

मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास