एका रेल्वे स्टेशन वर एक रेल्वे येऊन थांबते, जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता, तेवढ्यात एका शेठ ने त्याला आवाज दिला ये मुला, शेठ ने विचारल कितीला पाणी? मुलगा म्हटला २५ पैसे तर शेठ म्हंटला १५ पैशात दे, मुलगा गालात हसला व पाणी त्याने ज्या ग्लास मध्ये काढले होते ते जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले, हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिल, ते रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले तू #हसला का? 


मुलगा म्हंटला शेठला #तहान नव्हती लागली फक्त #किम्मत विचारायची होती, त्यावर त्या महाराजाने विचारल तुला कस माहीत शेठला तहान नव्हती लागली? त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले,

"जेंव्हा माणसाला खरच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे?"


 *एका घरात पाच दिवे लावले होते.*


*एके दिवशी एक दिवा म्हणाला,मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही.त्यामुळे मी विझुन जाणेच चांगले.. आणि तो विझून गेला.*


*तो दिवा होता उत्साहाचे प्रतिक...*

 

*हे पाहून  दुसरा दिवा होता, जो शांतीचे प्रतिक होता , त्यानंही हाच विचार करून तो सुद्धा विझून गेला!!!*



*उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्या नंतर तिसरा दिवा -जो हिंमतीचा होता, तो ही आपली हिम्मत हरला आणि विझून गेला!!!*


*उत्साह, शांती, हिम्मत हे विझल्या मुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझुन गेला!!*


*सगळे दिवे विझल्या नंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहीला.पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता.*


*जेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहिलं.. घरात एकच दिवा जळतोय. तो खूप खूश झाला. चार दिवे विझून सुद्धा तो खूश होता की, कमीत कमी एक दिवा तरी चालू आहे.!!!*


*त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले.*


*तो पाचवा दिवा कोण होता ?*

*तो होता उमेद.! तो उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा. इतर दिवे आपोआप प्रकाशित होतील.*

 *जेव्हा एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्याने पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते; वाचा पुर्ण किस्सा*



ही गोष्ट आहे साल १९७९ ची. संध्याकाळचे सहा वाजले होते. एक शेतकरी ईटावा जिल्ह्याच्या उसराहार पोलीस स्टेशनमध्ये मळलेला कुर्ता आणि चुरगळलेले धोतर घालून आला होता. त्याला त्याच्या हरवलेल्या बैलाची तक्रार नोंदवायची होती.

त्याने इन्स्पेक्टरला हरवलेल्या बैलाची तक्रार लिहून घेण्यासाठी विनंती केली. इन्स्पेक्टरने शेतकऱ्याला तीन-चार इकडचे तिकडचे प्रश्न विचारले आणि रिपोर्ट न लिहिताच जायला सांगितले. शेतकरी काहीच बोलला नाही तो खुर्चीवरून उठला आणि स्टेशनच्या बाहेर निघाला.

इतक्यात त्यातील एक हवालदार शेतकऱ्याला म्हणाला, बाबा रिपोर्ट लिहून घेतो पण काही पैसे द्यावे लागतील. शेवटी ३५ रुपयांमध्ये इन्स्पेक्टर तक्रार नोंदवायला तयार झाला. त्याकाळी ३५ रुपयांची किंमतही खूप होती. लेखापालने तक्रार लिहून घेतली आणि शेतकऱ्याला विचारले की, बाबा सही करणार की अंगठा लावणार?

शेतकरी म्हणाला सही करणार. मग लेखापालने शेतकऱ्याला रिपोर्टचा कागद दिला. रिपोर्टचा कागद घेतल्यानंतर शेतकऱ्याने पेनसोबत स्टॅम्प पॅडपण उचलले. हे पाहिल्यानंतर लेखापाल विचारात पडला की, ह्याला जर सही करायची आहे मग स्टॅम्प पॅडची याला काय गरज आहे?

शेतकऱ्याने सही करताना नाव लिहिले ‘चौधरी चरण सिंह’ आणि मळलेल्या कुर्त्याच्या खिशातून एक स्टॅम्प काढला आणि त्या निकालाच्या कागदावर मारला. स्टॅम्पवर लिहिले होते की, ‘प्रधानमंत्री भारत सरकार’. हा सगळा प्रकार पाहून पूर्ण पोलीस स्टेशन हादरले होते.

कारण जो माणूस मळलेला कुर्ता घालून पोलीस स्टेशनमध्ये बैल हरवल्याची तक्रार नोंदवायला आला होता ते दुसरे तिसरे कोणी नसून शेतकरी नेते आणि त्याकाळचे भारताचे प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह होते. त्यावेळी ते पोलीस स्टेशनमध्ये पाहणी करायला आले होते. आपल्या गाड्यांचा ताफा त्यांनी पोलीस स्टेशनपासून लांब उभा केला होता.

त्यांनी येताना आपल्या कुर्त्यावर माती लावली होती. जेणेकरून त्यांना कोणी ओळखू शकले नाही. त्यांनी त्या वेळेस उसराहारचे पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते. 

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिह यांच्या जन्मदिवस 23 डिसेंम्बर हा *राष्टीय किसान दिन* म्हणुन साजरा केला जातो.

 ✈ *विमान* ✈ 

****************


आकाशात विमानाची घरघर ऐकली की, सभोवतालच्या सर्वांच्या नजरा अगदी सहजच वर जातात. आवाजाचा कानोसा घेत विमान कुठे दिसते आहे, त्याचा शोध घेतला जातो. विमानांचा वापर सुरू होऊन इतकी वर्षे झाली तरी औत्सुक्य अजून टिकायचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाला पक्षाप्रमाणे भुर्रकन उडता उडणे शक्य नाही, हेच आहे. विमान प्रवास आता इतकी अपूर्वाईची गोष्ट राहिलेली नाही. पण हे आकर्षण टिकणार आहे.


 प्रत्येक विमानाची घडण सध्या ड्युरॅलियम धातूची असते. गोलाकार मुख्य भागाला फ्युसिलेज म्हणतात. मध्यावरती दोन्ही बाजूंना लांबलचक पंख पसरलेले असतात. काही विमानांचे पंख मागच्या बाजूला शेपटाकडे वळतात, त्यांना डेल्टा प्रकारचे पंख म्हणतात. या विमानांना शेपटीला पंख नसतात, तर फक्त त्रिकोणी उंचवटा मुख्य धडापासून शेपटापर्यंत जातो. (tail fin) इतर विमानांना शेपटालाही पंख असतात. आकार लहान एवढेच. पंखांचा उपयोग मुख्यत: हवेचा झोत मागे फेकतानाची झेप घेणे व तरंगणे यांसाठी केला जातो.


 विमानाची बांधणी हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. ड्युरॅलियमच्या सांगाड्यावरती पातळ पण कठीण पत्र्याचा सलग थर देत मध्ये पोकळी ठेवून एखाद्या ट्यूबसारखी ही बांधणी केली जाते. अतिशय पक्के पण हलके असे विमान त्यामुळे तयार होते. या पद्धतीला 'मोनोकॉक' पद्धत म्हणतात. विमानाची इंजिने पूर्वी मोटार इंजिनाप्रमाणेच पण अत्यंत वेगाने चालणारी असत. पण यासाठी मागेपुढे होणारा पिस्टन वापरावा लागे. त्याची झीज फार झपाट्याने होई व वेगावरही मर्यादा पडत. आजकाल तप्त वायूंचा फवारा अत्यंत दाबाने व वेगाने मागे फेकणारी इंजिने वापरतात. यामुळे विमान प्रतिक्रियेने पुढे फेकले जाते. या पद्धतीने पाहिजे तेवढा वेग वाढवणे शक्य होते.


 विमानांची प्रगती खऱया अर्थाने दुसऱया महायुद्धानंतरच्या दशकात सुरू झाली. जेट इंजिनांचा लांब पल्ल्यासाठी वापर सुरू झाला. प्रवाशांची संख्या, विमानाचा आकार व विमानाचा पल्ला या सर्वच गोष्टींत कल्पनातीत फरक पडत गेला. स्वनातीत (सुपरसॉनिक) प्रवासी विमान म्हणजे काँकॉर्डचा जन्म याच काळातला. तीन तासांमध्ये अटलांटिक समुद्र ओलांडून हे विमान (ध्वनीच्या दुप्पट वेगाने प्रवास करत) युरोपातून अमेरिकेत पोहोचू शके. पण याच दरम्यान वेगाचे वेड कमी होऊन सुरक्षितता व पैशांची बचत यांवर सगळ्या विमान कंपन्यांचे लक्ष केंद्रित होऊ लागले. त्यामुळे मोठ्या आकाराची बोइंग विमाने किंवा एअरबस यावर जास्त लक्ष देऊ लागले.


पूर्वापार पद्धतीप्रमाणे वैमानिकाने कंट्रोल्स वापरले की लगेच विमानाच्या हालचालींवर परिणाम अत्याधुनिक विमानात होत नाही. वैमानिकाच्या आज्ञा काँम्प्युटरकडे पोहोचतात व त्यानुसार कॉम्प्युटर स्वतःची 'बुद्धी' वापरतो. विमान उतरवणे, हवेत उडवणे वा सलग चालवणे याबाबतीत पायलटच्या हातून झालेल्या चुका 'सुधारून' घेऊन सर्वात उत्तम पद्धतीने तो सूचना देतो व त्यानुसार विमानाची हालचाल होते. याला 'फ्लाय बाय वायर पद्धती' म्हणतात.


 माणूस चुका करतो व करणारच. विमानाचे खूपसे अपघात वैमानिकांच्या चुकांमुळे होतात, या निष्कर्षावरून ही पद्धत शोधली गेली आहे. पण या पद्धतीने काम करणारी विमानेही अपघातात सापडून कोसळली आहेत. विमान प्रवास धोक्याचा अजिबात नाही. संख्याशास्त्रानुसार मोटारप्रवासापेक्षा कितीतरी पटीने तो कमी धोक्याचा आहे. फरक एकच, अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता जवळपास नाहीच.


गेल्या काही वर्षांत नागरी वापरासाठी हेलिकॉप्टर्सचाही उपयोग परदेशात मोठ्या प्रमाणावर होत आहे. विमानतळ शहरापासून खूप लांब. तेथे जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ वाचावा म्हणून एअर टॅक्सीसारखे हेलिकॉप्टर हल्ली वापरले जाते.


 अगदी नवीन मोठे बोइंग विमान जवळपास पाच मजल्यांएवढे उंच असते, तर वजनाने एकशेसव्वीस ते एकशेतीस टन असते. बत्तीस चाके असलेल्या या विमानात सहाशेपर्यंत माणसे बसू शकतात. सध्याची विमानविद्येतली प्रगती पाहता येत्या दशकात सुपरसाॅनिकच काय पण हायपरसाॅनिक म्हणजे आवाजाच्या तिप्पट वा चौपट वेगाने प्रवास करणारी विमाने वापरात आली तर नवल वाटायला नको.


 सुरुवातीच्या काळात विमानप्रवासाचा वेग जेमतेम ताशी १४० ते १६० नाॅट एवढाच होता. आजच्या जेट विमानांना त्यापेक्षा जास्त वेग घेतल्याशिवाय हवेत उड्डाणच करता येत नाही. हल्लीची जेट विमाने साधारण ६५० नॉट वेगाने व किमान पाच ते आठ किलोमीटर उंचीवरून प्रवास करतात. मुंबई ते दिल्ली बोईंग विमानाचा प्रवास असेल तर प्रवासाचा निम्मा वेळ उंची गाठणे व खाली उतरणे यातच जातो. ठराविक उंचीवरचा प्रवास जेमतेम निम्मा वेळच राहतो. सर्व जेट विमाने हवाबंद असून सर्वसाधारण हवेचा पुरेशा दाबाने पुरवठा त्यात केला जातो. जम्बोजेट विमान न थांबता पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास सहजपणे करू शकते. या विमानांमध्ये चार वैमानिक, एक नेव्हिगेटर व रेडिओऑफिसर असतो. फ्लाय बाय वायर पद्धतीत ही संख्या फक्त दोनवर येते. कुशल वैमानिकांची गरज इतकी कमी झाल्याने विमानांची किंमत वाढली, तरी वैमानिकांचा खर्च एकदम कमी होतो.


 प्रगत देशांमध्ये रेल्वेपेक्षा विमानप्रवास स्वस्त पडतो, यावर तुमचा विश्वास बसतोय काय ?


 नागरी विमान सेवेचा इतिहास:

१९०३ साली राईट बंधूंनी पहिले विमान उड्डाण केले.

१९१९ साली लंडन ते पॅरिस पहिली नागरी प्रवासी हवाईसेवा सुरू झाली.

१९२७ साली तब्बल तेहतीस तास प्रवास करून चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने अटलांटिक समुद्र पार करून दाखवला.

१९३९ साली हेंकेल जातीचे पहिले जेट विमान तयार झाले.

‍१९५२ साली डीसी कॉमेट हे नागरी जेट विमान वापरात आले.

१९६९ साली काँकाॅर्ड हे स्वनातीत विमान नागरी विमान सेवेत आले. सध्या त्याचा वापर थांबला आहे.

१९८३ साली फ्लाय बाय वायर पद्धतीची एअर बस वापरात आली.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

 *मोबाईल मूळे तयार झाल्या ह्या नवीन म्हणी*


१) स्वामी तिन्ही जगाचा, चार्जर विना भिकारी😳

२) बुडत्या बँटरीला चार्जरचा आधार😜

३) चेहेऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार ?😛

४) नको ते अँप आणि डोक्याला ताप 😳

५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर 🤔

६) आला मेसेज, केला फॉरवर्ड 😝

७) एक न धड आणि भाराभर ग्रुपमेंबर 😂

८) खाली मुंडी आणि whatsapp धुंडी .

😂😜😝😛😂😜😝😛

 खुप दिवसांपूर्वी मी ही 

राजकीय वात्रटिका लिहिली होती 


आजही परिस्थिती 

जैसे थे आहे


ना ‘शरदा’चे चांदणे

ना ‘सोनिया’चे दिस

‘घडय़ाळा’चे ओझे ‘हाता’ला

म्हणून ‘आय’ कासावीस

 

‘कमळा’च्या पाकळ्यांची

यादवी छळते मनाला

‘धनुष्य’ केव्हाच तुटलय

पण जाणीव नाही ‘बाणा’ला


 

' विळा, हातोडा अन् कंदिलाला'

आजच्या युगात स्थान नाही

डब्यांना ओढू शकेल एवढी

‘रेल्वे इंजिना’त जान नाही

 

मन आहे ‘मुलायम’

पण ‘माया’ कुठं दिसत नाही

‘हत्ती’वरून फिरणारा

‘सायकल’वर बसत नाही

 

कितीही उघडी ठेवा ‘कवाडे’

पण ‘प्रकाश’ आत जाणार नाही

विसरलेले ‘आठवले’ तरीही

‘गवई’ गीत ‘गाणार’ नाही

 

‘बंडखोर’ ‘पक्षां’चा थवा

‘पार्टी’साठी आतूर

कुंपणच खातंय शेताला

अन् बुजगावणही फितूर


काही नव्या ओळी


' स्वाभीमाना 'चे चिन्ह दिसेना

कुणाचे करावे पारायण ?

काय थट्टा चालवली 'नमो ' नमो

' नारायण '! नारायण !!


विनंती केली ईशारे दिले

तरी अवहेलनेची गाथा

कधी पावणार ' मुक्ताई ' ?

हुंदका आवरा ' एकनाथा '


ज्यांनी आणले 'स्वराज '

त्यांची 'मुरली ''मनोहर' वाटेना

संतापाने 'लाल' झाले 'कृष्ण '

ग्रहण सुटता सुटेना


अॅड, अनंत खेळकर

बिर्ला काॅलनी

जठारपेठ 

अकोला


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 रात्री सहजच नवरा बायकोला म्हणाला...


*नवरा*:-

पुन्हा जावे शाळेत 

पुन्हा ती दिसावी🙎‍♀

भले लागू दे शिकाया 📕

लसावि, मसावि 🔢


*बायकोचे उत्स्फूर्त उत्तर*:-

बनून आता गोसावी 👳‍♂

जी आहे ती सोसावी 🧕

विसरून आता लसावि, मसावि 😡

आठवणीने उद्या भांडी घासावी 

जमलंच तर फरशी पण पुसावी !!!


😬😉😬😝

 आई


आई माझा देव। आई माझा गुरू।

आई कल्पतरू। आई माझी॥ १॥


गर्भात तुझिया । वाढले निवांत ।

भासली ना भ्रांत । कशाचीच॥ २॥



थोर उपकार। आई जन्म दिले।

सोने माझ्या झाले। जीवनाचे॥ ३॥


आईचे वात्सल्य । जगाहून मोठे।

जीवनाच्या वाटे। अडले ना॥ ४॥


अमृताची धार। पाजलेस आई।

होऊ उत्तराई । सांग कशी॥ ५॥


प्राणाहूनी प्रिय। धन्य माझी आई।

नांव हो विजाई। आई माझी॥ ६॥


माझ्यासाठी देव। असे माझी आई।

आईची पुण्याई। लाभतसे॥ ७॥


स्वामी तिन्ही जगी। आईविना दीन।

सुवचन छान। सांगतसे॥ ८॥


कसं फेडू सांग। तुझे उपकार।

जीवना आकार। तुच दिले॥ ९॥


धन्य पुंडलिक। केली सेवा खरी।

पांडुरंग हरी। पाहतसे॥ १०॥


आईचे रे छत्र। सोन्याचे झालर।

मायेचा पदर। लाभलासे॥ ११॥


धन्य तोच जगी। आई ज्यास आहे।

डोळा भरू पाहे । माऊलीस॥ १२॥


आई माझी राही। थंडगार छाया।

अविरत माया । अखंडीत। १३॥


आईचे काळीज । तुटते लेकरा।

गाय रे वासरा। हंबरते॥ १४॥


संस्काराची खाण।आई रे महान

देगा देवा दान। जन्मभर॥ १५॥


वृद्धाश्रमी नका । पाठवू आईस।

आईच परीस। जीवनाची॥ 16

 🔔  *मंदिर /शाळा* 📖🖋


मंदीराचे कळस 

गगनाला भिडले

शाळेचे बांधकाम 

देणगीवाचुन अडले


दुधाचा अभिषेक 

दगडाच्या देवाला

शालेय पोषण आहार 

नुसताच नावाला


देवाचा दरवाजा 

चांदीने मढला

शाळेचा दरवाजा 

पाण्याने सडला


मंदीरातील झुबंराला 

हि-या मोत्यांचे खडे

शाळेच्या भिंतीना 

पडु लागलेत तडे


मंदीरात जाऊन 

लोक पोथी पुराण वाचतात

शाळेच्या ग्रथांलयात 

उंदीर मामा नाचतात


मंदीराच्या दानपेटीत 

गुप्तदान करतात

शाळेच्या देणगीची 

पावतीच मागतात


दरवर्षाला देवाची 

भरवतात यात्रा

पालक मेळाव्यात 

फक्त पालक सतरा


पुज्या-यांच्या गळ्यात 

सोन्या चांदीचे हार

कंत्राटी शिक्षकांची 

होऊ लागली उपासमार


न खाणाऱ्या देवाला 

पंचपक्वान्नाचा घास

शाळेत खीचडी भाताचा 

अहो येईना वास


आता तुम्हीच सांगा 

कधी संपेल इथला अंधविश्वास

शिकले - सवरलेले तरुण- तरुणीच

करु लागले आता उपवास


🙏🏻 *नवीन पिढीला समर्पित* 🙏🏻

 *"शेंगा आणि टरफलं"*

😂😂😂😂😂😂😂😂✌🏻✌🏻✌🏻



लोकमान्य टिळक 

लहानपणी म्हणाले होते:

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत,...

मी टरफलं उचलनार नाही"









आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा:


*महात्मा गांधी:*

"मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलनार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलनार"



*बाळासाहेब ठाकरे:*

"यांच्या बापाचा माल आहे काय?

शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली तर त्याला सरकार जबाबदार असेल" 

जय महाराष्ट्र!



*शरद पवार:*

"महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्याने कुणी कुणाला शेंगा खान्यापासून रोकू शकत नाही...

यात शेतकरयांचं भलं आहे आणि उरलेल्या टरफलांपासून alcohol बनवता येईल का याबद्दल विचार करण्यासाठी सरकार लवकरच समिति नेमेल"



*नरेंद्र मोदी:*

"मित्रोंssss....

शेंग खाने का वर्णन तो हमारे वेदों में भी किया हुआ है....

चाहे हिन्दू हो या मुस्लिम या सीख़ हो या ईसाई हो सबने शेंग खानी चाहिए...

और सबने अपने आसपास का टरफल उठा के भारत को स्वच्छ रखना चाहिए"



*सोनिया गांधी:*

"अमने चार साल पहले एक सपना देका ता की देश के हर एक नौजवान को शेंग खाने का मौका मिलना चाइये...

और कांगरेस ने ये सपना पूरा किया.

और "

दिग्विजय जी ये तरफल कौन सा फल होता है??"

दान्यवाद...



*मनमोहन सिंह:*

"..........

...........

...........

...........

...........

............

.....!!!"



*देवेन्द्र फडणवीस:*

"हे बघा....

महाराष्ट्रात शेंगा खायच्या की नाही याचा निर्णय आम्ही आदरणीय मोदीजींना विचारून उदया जाहिर करू आणि टरफलांबाबत नाथाभौ काय ते लवकरच सांगतील"



*नितिन गडकरी :*

"विदर्भाच्या लोकांवर वेळोवेळी अन्याय झाला आहे त्यामुळे आता आम्हाला खाण्यासाठी आमच्या वेगळ्या शेंगा पाहिजेत आणि टरफलांपासून आम्ही ऊर्जा निर्मिति करता येईल का याचा विचार करू "



*किरीट सोमय्या:*

"या चेंगा काण्याच्या कामात प्रछंड ब्रष्टाचार जाला आहे असा माजा पश्त आरोप आहे आणि प्रमाणा पेक्चा जास्त तरफलं जमा केल्याबद्दल बुजबलांना अटक ज़ालीच पायजे"



*छगन भुजबळ:*

"या शेंगा आमच्या वडिलोपार्जित असुन माझ्याकडे सर्व शेंगा आणि टरफलांचा हिशोब आहे आणि शेंगा खायचा निर्णय सर्वांचा असताना मला एकट्यालाच लक्ष्य केले जात आहे तरीही मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे"



*अण्णा हजारे:*

"हे पहा असं आहे की .... 

 या शेंगांच्या कामात खुपच अनियमितता आढळून येत आहे ,एका शेंगेत एकच दाना दुसऱ्या शेंगेत तीन तर तिसरीत दोन....

आणि टरफलं पण अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत....

तर असं आहे आणि याची चौकशी तर झालीच पाहिजे नाहीतर मी उपोषणाला बसणार"



*उद्धव ठाकरे:*

"आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांचे पालन आम्ही करू आणि सर्व शिवसैनिकांना शेंगा खाने बंधनकारक करू आणि टरफलां बाबत संजय राउत "सामना" मध्ये लिहितील"

की आम्ही टरफले उचलायला तयार आहोत पण टरफलांची तयारी आहे का उचलून घ्यायची,

शेंगा खाणे एक कला आहे आणि टरफले उचलणे एक शास्त्र.



*राज ठाकरे:*

"या सर्व परप्रांतियांनी इथे येऊन शेंगांचे भाव वाढवून ठेवलेत आता काय करायचं आपल्या मराठी मुलांनी, सरकारला मराठी मुलांसाठी शेंगा राखीव ठेवल्याच् पाहिजेत नाहीतर राज्यभर खळ्ss खट्याक होईल....

आणि टरफलं फेका त्या अबु आजमी च्या बंगल्या बाहेर...

जय महाराष्ट्र"



*अबु आजमी:*

"देखिये इस्लाम में किधर भी नहीं लिखा है की मुस्लिमो ने शेंग खाना जरुरी है.....

और ये टरफल क्या होता है 

मुझे नहीं पता"



*अजित पवार:*

"ज्या शेतात या शेंगा आढळून आल्या, ते शेत माझ्या मालकीचं असल्याचा खोटा नाटा आरोप उगाचच होतोय...

आरोप सिदध झाल्यास शेंगा खायच् सोडून देईल"



*तटकरे:*

"जसं दादा म्हणतिल, 

 तसं"



*राहुल गांधी:*

"देखो भैया...

आज देश का गरीब क्या चाहता है ...

वो खाली शेंग ही तो खाना चाहता है ...

और ये सरकार क्या कर रही है ...

हमारे सामने टरफल फेक रही है ....

हमे इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए....

बोलो हाँ - आवाज उठाना चाहिए ..."



*रामदास आठवले:*

"मी नक्की खानार शेंगाsss...

"मी नक्की खानार शेंगाsss...

कॉँग्रेस-राष्ट्रवादीला देणार ठेंगा...

और किसीने टरफलं नहीं उचल्या...

और किसीने टरफलं नहीं उचल्या...

तो विनाकारण करुंगा मैं दंगा ."



*साध्वी प्राची:*

"हर हिंदु ने चार चार गोनी शेंग खानी ही चाहिए और जिसको नहीं खानी वो पाकिस्तान चला जाये"



*अरविंद केजरीवाल:*

"सुनो भई....

ये शेंग खाने का सवाल नहीं है ...

ये आम आदमी के हक़ का सवाल है ..

और कोई अगर आपको दिल्ली में शेंग खाने के लिए मना करे तो हमारे helpline पर फोन करो...

और इस काम में अण्णाजी भी हमारे साथ है"



*निखिल वागळे:*

"भाई जगताप तुम्ही शांत रहा....

मी शेंगा खायच्या की नाही याबाबत प्रेक्षकांची मतं मागवनार आहे आणि टरफलांचा विषय आपण ब्रेक नंतर घेऊ...

पाहत रहा point blank"



*प्रसन्न जोशी:*

"एकूणच काय...

तर शेंग खान्यापासून सुरु झालेला हा विषय गंभीर वळणावर येऊन पोचलाय, बघुया सरकार काय करतय ...

तुर्तास येथेच थांबूया,

 " एकदा असं झालं की उत्तर भारतातनं एक खानसामा फिरत फिरत पोटासाठी नौकरीच्या शोधात कोल्हापूरला आला. येऊन असाच कुठंतरी राहिला असेल, महाराजांची भेट व्हायची वाट बघत होता. तो अतिशय निष्णात होता. त्याच्या हाताला मोठी चव होती. नबाब रईसांच्या हवेल्यातल्या रसोईखान्यात बरीच वर्षे त्याने इमानेइतबारे काम केलं होतं. पदार्थाच्या नुसत्या वासानं तो सांगू शकत होता की त्यात काय कमीजास्त झालेय ते.

           तरूणपणी त्यानं नवाब, खानदानी रईस यांच्या दरबारात हवेल्यात मोगलाई पद्धतीचे अस्सल जेवण तो बनवायचा.

       त्याच्या या गुणामुळे एका नवाबाची एक चिठ्ठी घेऊन तो कोल्हापूर दरबारात काम मिळतेय काय ते बघायला आला होता.

     त्याच्या या गुणामुळे कुणीतरी त्याला मग महाराजांकडे नेले. हत्तीखान्याच्या समोरच्या मोठ्या दरवाजासमोर खुर्चीत नेहमीच्या लोकांबरोबर महाराज बसले होते.

     खानसाम्याने मुजरा केला... "आदाब महाराज, मी उत्तर भारतातून आलोय. महाराजांची कृपा झाली तर मला कोल्हापूर संस्थानची सेवा करण्यात धन्यता आहे. पोटासाठी फिरतोय. मी कोणत्याही प्रकारे हुजुरांची इतराजी करणार नाही...."

     " बरं बरं

      काय काय करतोस तु??"

       महाराजांनी त्याच्याकडे निरखून पाहत विचारले.

    " महाराज, मी कोणत्याही प्रकारचे अस्सल चवीचे पदार्थ बनवू शकतो. शाकाहारी, मांसाहारी, गोड पदार्थ, मोगलाई चवीचे अस्सल मोगल दरबारातल्या पंगतीसारखे... "

   " बरं बरं उद्या संध्याकाळी करा मग बेत सगळ्यांसाठीच.. ह्यासनी घेऊन जावा आपल्या मुदपाकखान्यात अन काय लागंल ते द्या... जेवल्यावरच ठरवू.... या आता... "

  " आदाब महाराज येतो "

.

    दुसऱ्या दिवशी खानसाम्याने आपले पाककलेचे कौशल्य पणाला लावले. पहाटेपासून कामाला लागला. त्याने सांगेल ते ते सगळे पदार्थ मागवले गेले. मटनाचा, शाकाहारी, गोडाचा असे सगळे पदार्थ त्याने रांधले.

     मग पंगत बसली.

  सगळे लोक नुसत्या वासाने दंग झाले असा दरवळ सुटला होता. कधीच न खाल्लेले जायकेदार पदार्थ खानसामा वाढू लागला. प्रत्येकाने एखादा घास खाल्ला की खानसामा उत्सुकतेने बघायचा मग वाहवा मिळाली त्याचा चेहरा फुलून यायचा.

      महाराजांचेही ताट वाढले, एक - दोन वाट्यात बोटं बुडवून महाराजांनी चव घेतली. अगदी थोडा गोडा पदार्थ खाल्ला "हं झ्याक"

   खानसाम्याचा चेहरा उजळला.

पण लगेचच महाराजांनी ताटाला हात लावून नमस्कार केला व ताट पुढे सरकवले...

     "महाराज घ्या, काय झालं???"

    महाराजांनी हातानेच काही नाही या अर्थी खुणावले.

  तोवर रोजचा माणूस महाराजांचे ताट घेऊन आला, आणि मग खरं महाराज जेवायला बसले.

    ज्वारी बाजरीची भाकरी अन तांबडा, पांढरा रस्सा...

    एकदम साधा जेवण....

   महाराज पोटभर जेवले.

        तोवर सगळ्यांचे जेवण उरकले.

   सगळे पुढे आले. "महाराज, असं जेवण कधी झालं नव्हतं. याला आपल्या मुदपाकखान्यात ठेवून घेतलेच पाहिजे....."

     महाराजांनी त्या खानसाम्यास बोलावले " ह्यांचा फेटा बांधून सत्कार करा अन योग्य ती बिदागी देऊन पाठवणी करा..."

  " पण महाराज माझं काय चुकलंय का??

   मला नोकरीत घ्या."

 " नाही तुमचं काय चुकलं नाही.. "

   असं म्हणत महाराजांनी खिशातनं एक लांबलचक यादी काढली ज्यावर काल मागवलेल्या पदार्थांची नावे अन किमती होत्या.

   " मी या संस्थानचा सेवक आहे अन माझ्या लोकांसाठी कामे करताना आम्हाला हे मोठे चोचले पुरवणे सोपे नाही. एवढा खर्चात माझ्या संस्थानातील कितीतरी कष्टकरी लोक खाऊन निघतील. आम्हाला हे परवडणारे नाही. या आता....."

.

#शाहू_जयंती

#अभिवादन........

 *मी हा प्रयत्न करू शकतो का?*



     आपण रोज सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन आपली पूजा, प्रार्थना करतो, पण खरोखरच आपले मन त्यावेळी एकाग्र असते का? उद्या सकाळी पूजा करताना आठवून पहा, त्यावेळी तुमच्या डोक्यात कितीतरी वेगवेगळे विचार कसे रुंजी घालत असतात, ते!


किमान मिनटभर तरी आपण आपले चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करू शकतो का? विचार करा…


*इतर व्यक्तींबरोबर बोलताना तुम्ही अतिशय सौम्य आवाजात, हळुवारपणे बोलता.*

 पण तीच सौम्यता आणि हळूवारपणा तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर बोलताना दाखवता का? नीट आठवून पहा, तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचदा तुम्ही त्यांच्याशी कठोरपणे आणि रागीट आवाजात बोलत असता.


आपल्या कुटुंबियांबरोबर देखील तसाच व्यवहार करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


*तुम्ही तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा नेहमीच सन्मान करता आणि त्यांना आदराची वागणूक देता.*


 पण ते निघून गेल्यावर त्यांना दूषणे देता, त्यांच्या स्वभावाची, बोलण्याची टिंगल करता!


आपल्या स्वभावातील हा दुटप्पीपणा दुर करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


*बरेचजण, रोज धार्मिक पुस्तकांचं वाचन करतात, कीर्तन ऐकतात, तासनतास पूजा करतात!*

 पण नंतर दिवसभरात इतरांना शिव्या देतात, दूषणे देतात, त्यांचा अपमान करतात!


*हे दुहेरी जीवन जगण्याचा अट्टाहास सोडण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*


आपण इतरांना अडचणीच्या काळात मदत करतो. पण बऱ्याचदा ही मदत, त्या बदल्यात काहीतरी मिळविण्याच्या हेतूने केली जाते, आपण हे सर्व नि:स्वार्थपणे करत असल्याचा आव आणत!


*आयुष्यात प्रत्येक गोष्टीला पैशाचं लेबल न लावण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*


बऱ्याचदा आपण इतरांना पुष्कळ गोष्टींत सल्ले देत असतो  एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कसे वागावे, याचे! पण जेव्हा तीच पाळी आपल्यावर येते, तेव्हा मात्र आपण नेमकं यांच्या विपरीत वागतो!


"लोका देती ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण" ही उक्ती स्वतःला लागू न करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


*जेव्हा तुम्हाला इतरांची मते आवडत नाहीत, तेव्हा तुम्ही त्यांचा द्वेष करता, त्यांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करता!*


इतरांनाही आपल्या सारखीच स्वतंत्र मते असू शकतात हे उमजून घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


एखाद्याच्या केवळ बाह्य व्यक्तिमत्वावरून आपण त्याला जोखतो, स्वतःला त्याच्यापेक्षा मोठे समजू लागतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.


*"जे दिसतं, तितकंच नसतं" हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*


आपण सर्वच ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमणा करत आहोत. म्हटलं तर आयुष्य खूप मोठं आहे आणि इतका मोठा रस्ता पार करताना थोडेबहुत अडथळे तर येणारच! पण जर हे अडथळे अंतर्गत अथवा मानसिक असतील, तर ते सोडविण्यासाठी माझ्या इतका सक्षम माणूस दुसरा कोणीच नसेल!

🙂🙏🏻🙂

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

 *लुगड्याची गोष्ट .*


रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.


सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..


 ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. 


",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "

 

"सावीत्रीबाई:-आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." 


"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,


मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........



ज्योतिराव:-

ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, 

तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',


सावित्रीबाई-

आहो, हा ताप औषधाने नाही जायचा.


" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.--मग?

                                 सावित्रीबाई म्हणाल्या:-" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." 


ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.


त्यांचे विचारचक्र सुरु झाले.

लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........


मग सावित्री असे का बरं बोलली?..........


तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........


आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....


बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............


पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........


विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.


दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.


बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........


लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार, 


कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......


सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.

त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.


ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........


लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............


ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होत्या त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.


त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.


बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण ,चिखलाचे डाग, धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात. 


त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.


परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .


त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."


आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं.. 


सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!

 *राग आणि त्यांच्य श्रवणाचे लाभ*

*MUSIC IS MEDICINE*

१ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.


२ राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.


३ राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.


४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.


५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.


६ राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.


७ राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.


८ राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.


९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.


१०  राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.


११  राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.


१२ राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.


१३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.


१४ राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.


१५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.


१६ राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.


१७ राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.


*संगीतोपचार*


*विशेष सूचना:-*


डाँक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.


*हृदयरोग* 


राग दरबारी व राग सारंग


१) झनक झनक तोरी बाजे पायलिया....८:१६

( मेरे हुजूर )

२) तोरा मन दर्पण कहलाए....६:०६   ( काजल )

३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम....४:२४

( साजन )

४) जादूगर संय्या छोडो मेरी ३:०६।    ( नागिन).


*विस्मरण*


 लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा 


१) मेरे नयना सावन भादों ....५:०६

 ( मेहबूबा )

२)ओ मेरे सनम....५:०९ ( संगम )

३)दिल के झरोखे मे तुझको बिठाकर ....४:४१

( ब्रह्मचारी )

४) जाने कहा गये वो दिन ....६:५३

( मेरा नाम जोकर )


*मानसिक ताण, अस्वस्थता*


ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत 

१) पिया बावरी....४:०२ ( खूबसूरत )

२)मेरे सूर और तेरे गीत ....३:११

( गूँज उठी शहनाई )

३)मतवारी नार ठुमक ठुमक चली ....६:२९

( आम्रपाली )

४) तेरे प्यार मे दिलदार ....४:०४

( मेरे मेहबूब )


 *रक्तदाब*


हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची ,तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात 


 *उच्च रक्तदाब*


१) चल उड़ जा रे पंछी ....४:३५

( भाभी )

२) चलो दिलदार चलो ....३:३२

( पाकीजा )

३) नीले गगन के तले....४:१३

( हमराज )

४) ज्योती कलश छलके ....३:३०

( भाभी की चूड़ियाँ )


 *कमी रक्तदाब*


१) जहाँ डाल डाल पर ....७:२०

( सिकंदरे आज़म )

२) पंख होती तो उड़ आती रे ....४:३२

( सेहरा )

३) ओ निंद ना मुझको आये ४:०८

( पोस्ट बॉक्स नं. ९०)


*रक्तक्षय, अनिमिया* 


अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.


१) खाली शाम हाथ आई है ....४:५५

( इजाजत )

२) आज सोचा तो आँसू भर आये ....४:२७

( हँसते जख्म )

३)नदियाँ किनारे ....३:३४

( अभिमान )

४) मैने रंग ली आज चुनरिया .....५:३४

( दुल्हन एक रात की)


 *अशक्तपणा*


शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी 


१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ....

( उड़न खटोला )

२) मनमोहना बड़े झूठे....३:५८

 ( सीमा )

३) साज हो तुम आवाज हूँ मै 

....५:३७

( चंद्रगुप्त 


 *पित्तविकार, अॅसिडीटी*


अॅसिडीटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत 


१) छूकर मेरे मन को ....२:३५

( याराना )

२) तुम कमसीन हो नादा हो ....४:२९

( आई मिलन की बेला )

३) आयो कहाँ से घनश्याम....२:५९

( बुढ्ढा मील गया )

४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये .....३:४४

( सेहरा )


*चित्रपटगीते सर्वपरिचित आहेत म्हणून वर दिली आहेत. रागाची चव कळावी म्हणून. पण प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.*

 *बिनधास्त जगा मित्रांनो*


●एकदा का चाळिशी पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...

(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)


●पन्नाशीनंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच 

(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )


●साठीनंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच

(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)


●सत्तरी पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच

(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)


●ऐंशीनंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच

(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )


●नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच

(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)


अजुन शंभरी पार करायची ईच्छा आहे का ?


जीवन साधे-सरळ-सोपे आहे...उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणू नका.


*एक लक्षात ठेवा...लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा.

 *जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला* 


१५० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो इंग्रजी राज्यसत्तेचा काळ होता. गुजरातच्या काठियावाड प्रांतात जामनगर संस्थानमध्ये राजवैद्य होते विठ्ठल भट. आयुर्वेदाचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांचा हातगुण चांगला होता. त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत पसरलेली होती.


त्यांच्या मुलाचं नाव करुणाशंकर भट. पण त्याला झंडू भटजी म्हणून ओळखायचे.

हे झंडू भटजी देखील आयुर्वेदाचार्य होते. वैद्य विठ्ठल भट यांच्या हाताखाली ते तयार झाले होते. बाप से बेटा सवाई अशी त्यांची ख्याती झाली होती. स्वतःची औषधे तयार करण्यासाठी त्यांना रसशाळा सुरू करायची होती.


जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्टजी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले,त्यांनी आपल्या संस्थानात रंगमती नदीच्या किनाऱ्यावर थोडीशी जमीन झंडू भट्टजींना बहाल केली.


येथेच १८६४ साली झंडू भट्टजींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली


आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला.

झंडू भटजींची औषधे फक्त जामनगर नाही तर अख्ख्या काठियावाड मध्ये फेमस होती. दुरदूरहून लोक त्यांच्याकडे आपल्या रोगाचे निदान होईल या आशेने येत असत. झंडू भटजींची रसशाळा भारतभर गाजू लागली होती.


या भट्ट कुटुंबाच्या ज्ञानाला आधुनिक रुपात आणायचे श्रेय मात्र त्यांचा नातू जुगतराम वैद्य यांना जाते.


झंडू यांचे नातू जुगतराम वैद्य यांनी केमिस्ट्री व फिजिक्सचे आधुनिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राजकोट मधील ब्रिटिश प्रोफेसर ली यांच्या लॅबमध्ये काम केलं होतं. आपली पारंपरिक औषधे जर आधुनिक रुपात आणली तर ती जगभरात पोहचवता येईल हे जुगतराम वैद्य यांच्या लक्षात आलं.


पण आजोबा झंडू भटजी यासाठी तयार होत नव्हते.

एवढंच काय त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नव्हतं. फक्त एकजण तयार झाला ,


झंडू यांचा जावई प्रभाशंकर पट्टानी


हे प्रभाशंकर पट्टानी म्हणजे भावनगरच्या राजाचे पंतप्रधान होते. खरंतर त्यांचं देखील आडनाव भट्ट होतं. पण सुरवातीला त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्याकाळी डॉक्टर व्हायचं म्हणून ते मुंबईला गेले पण ते जमलं नाही.


राजकोटला परत आल्यावर मास्तरकी सुरू केली.

झंडू भटजींच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं पण सासर कडच्या कोणीतरी त्यांचा डॉक्टर न झाल्यावरून अपमान केला व प्रभाशंकर यांनी पट्टानी हे आडनाव धारण केल.


प्रभाशंकर मुळात हुशार होते. राजकोटमध्ये शिकायला आलेल्या भावनगरचा राजकुमार भावसिंग याला त्यांची खाजगी शिकवणी लावण्यात आली.


हा भावसिंग कायम डोकेदुखीने त्रस्त असायचा. त्यामुळे चिडचिड होऊन स्वभाव रागीट बनला होता.


त्याच्या प्रकृतीचा पट्टानी यांच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. त्याला बरे करण्यासाठी प्रभाशंकर यांनी आपल्या सासऱ्यांना सांगून बनवलेलं एक खास बाम आणून दिल.


ते बाम लावल्यावर राजकुमाराची डोकेदुखी पळून गेली. तेच ते आजचे सुप्रसिद्ध झंडू बाम.

त्यानंतर भावसिंग यांचा प्रभाशंकर यांच्या वरचा विश्वास वाढला. पुढे ते जेव्हा भावनगरच्या राजेपदी आले तेव्हा या आपल्या गुरूला पंतप्रधान बनवलं.


प्रभाशंकर पट्टानी यांनी पुढची तीस चाळीस वर्षे काटेकोरपणे राज्यकारभार चालवला. भारताच्या राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे वजन होते.


अगदी महात्मा गांधीजींचे ते खास मित्र होते.


अस सांगितलं जातं की जेव्हा असहकार आंदोलनावेळी चौरीचौरा प्रकरण घडलं तेव्हा पट्टानी यांनी गांधीजींचे तुमच्या आंदोलनात हिंसा होत आहे असं सांगून कान धरले व त्याचाच परिणाम गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्धच असहकार आंदोलन मागे घेतले.


ज्या जावयाचा झंडू भटजींच्या कुटूंबाने अपमान केला त्याचीच मदत घ्यायची वेळ त्यांच्या नातवावर आली.

पण मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रभाशंकर यांनी जुगतराम वैद्य यांना राजाकडून सर्वोतोपरी साहाय्य मिळवून दिले व या दोघांनी मिळून १९१० साली झंडू फार्मसिटीकल कंपनीची स्थापना केली.


अगदी काही काळातच झंडू बाम तुफान फेमस झाले. डोकेदुखी पासून अंगदुःखी पर्यंत प्रत्येक गोष्टीवरील रामबाण उपाय म्हणून त्याला पाहिलं गेलं.


पुढच्या ९ वर्षात ही कंपनी शेअर बाजारात देखील आली.

झंडू भटजींनी रस शाळा सुरू केली त्याला जवळपास १५० वर्षे झाली, या कंपनीचा विस्तार शेकडो कोटींचा बनला आहे. आता या कंपनीची मालकी झंडू भटजींच्या कुटुंबाकडे राहिलो नाही पण फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्यांची उत्पादने पोहचली आहेत.


दबंग मधली मलायका अरोरा देखील झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए जेव्हा म्हणते तेव्हा या आयुर्वेदिक औषधीचा संबंध भारतीय समाजावर झालेला परिणाम दिसून येतो.


डॉक्टरच्या आधी मदतीला येणारा, प्रत्येक घरात हमखास दिसणारा झंडू भटजींचा झंडू बाम १५० वर्षांचा झाला तरी त्याचा इफेक्ट कमी झाला नाही हे नक्की.

 व. पु. काळे यांचे 29 विचार वेळ मिळाला तर जरुर वाचा !!


1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!!


2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !! 


3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!

 कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !!

म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !!


4) जाळायला काही नसलं तर पेटलेली 

 काडीसुद्धा आपोआप विझते .... !!


5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब 

 लागला नाही की मग त्रास होतो .... !!


6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , 

कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !!


7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींचंही तसंच आहे .... !!


8) शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी 

 घाबरलेला असतो , बरा झाल्यावर

 शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो .... !!


9) घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते .... !!


10) माणूस अपयशाला भीत नाही .अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर ....? याची त्याला भीती वाटते .... !!


11) बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण .... !!


12) कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे . ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे . 


13) पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते .... !!


14) वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं . ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात !! वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा .... !!


15) कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही , पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .... !!


16) आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो . त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो .


17) समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो . पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते .... !!


18) संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला .... !!


19) ''अंत " आणि '' एकांत " ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो .... !!


20) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं .... !! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस .... !!


21) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते . सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते .... !!


22) सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो .... !!


23) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस .... !!


24) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते .... !!


25) औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या

 गरजेपेक्षा कमी घेणं .... !!


26) गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले .... !!


27) अत्यंत महागडी , न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे " आयुष्य " ..... !!


28) भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती ,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती .... !!


29) आपण किती पैसा मिळवला यापेक्षा , तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले , हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो .... !! ..... !!

 A forward...


आजकाल *देवांची* व *देवस्थानांची* अवस्था सुद्धा *डॉक्टरांसारखीच* झालीय,


म्हणजे *गावातला देव* किंवा *मंदीर* म्हणजे *BHMS* किंवा *BAMS* डॉक्टर.

किरकोळ सर्दी, पडसं, थंडीताप, छोटे मोठ्या तक्रारी अडचणी असतील तर या डॉक्टर कडे जायचे.


जरा *मध्यम आजार* असेल तर *अष्टविनायक,* *गणपती पुळे,* *पावस,* *चाफळ* वगैरे ठिकाणी गेलं म्हणजे कसं *MBBS* वाल्याकडं गेल्यासारख वाटतं.


 जरा *कडक आजार* असेल तर *मांढरदेवी,* *जेजूरी,* *पाली,* *शनी शिंगणापुर* असे जरा *प्रयोगशील डॉक्टरर्स,* डिग्री मोठी नसताना पण धाडसानं प्रँक्टीस करणाऱ्या डॉक्टरां सारखेच.


*शिर्डी,* *सिद्धीविनायक,*

*दगडूशेठ,* *लालबाग,*  म्हणजे *MS,* *MD.* थोडा खर्च जादा पण *स्पेशालिस्टकडे* गेल्यासारखा अनुभव येतो.


*तिरूपती,* *अमरनाथ,* *वैष्णवीदेवी,** म्हणजे *फॉरेन रिटर्न डॉक्टरच!* हे शक्यतो पैसेेवाल्यांचे डॉक्टर. पैसा कितीही गेला तरी चालेल पण गुण एकदम झकास आला पाहिजे. सगळे आजार बिजार एकदम गायबच झाले पाहिजेत. इथे सामान्य पेशंटना सहजासहजी प्रवेश नाही.


आणि एकीकडे


*पंढरीचा पांडूरंग* म्हणजे आपला *सरकारी डॉक्टर,*

कमी पैशात सगळ्या गोरगरीबांची दुखणी बरी करणार. कधीही जावा, कधीही उठवा, रागावणार नाही का आधी पैसे भरा मगच उपचार सुरू करू असली भानगड नाही. पैसे द्या अथवा देवू नका, दारात येईल त्याच्यावर औषधोपचार करणार...

🙏🏻🌞शुभ सकाळ🌞🙏🏻

   🌹🙏आजची गोड सुरवात 🙏🌹


🌹🙏जय सदा आनंद 🙏🌹

        


अती कोपता कार्य जाते  लयाला, 

अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।


अती लोभ आणी जना नित्य लाज,

अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।

सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।


अती मोह हा दु:ख शोकास मूळ, 

अती काळजी टाकणे हेही खूळ ।

सदा चित्त हे सद्विचारे कसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।


अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,

अती खेळणे हा भिकेचाच पाया ।

न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।


अती दान तेही प्रपंचात छिद्र, 

अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।

बरे कोणते ते मनाला पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।


अती भोजने रोग येतो घराला, 

उपासे अती कष्ट होती नराला ।

फुका सांग देवावरी का रुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।


अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, 

अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।

अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।


अती आळशी वाचुनी प्रेतरूप, 

अती झोप घे तोही त्याचाच भूप ।

सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।


अती द्रव्यही जोडते पापरास, 

अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।

धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।


अती भाषणे वीटती बुद्धिवंत, 

अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।

खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।


अती वाद घेता दुरावेल सत्य, 

अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।

विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।


अती औषधे वाढवितात रोग, 

उपेक्षा अती आणते सर्व भोग ।

हिताच्या उपायास कां आळसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।


अती दाट वस्तीत नाना उपाधी, 

अती शून्य रानात औदास्य बाधी ।

लघुग्राम पाहून तेथे वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।


अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, 

अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।

ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।


अती भूषणे मार्ग तो संकटाचा, 

अती थाट तो वेष होतो नटाचा ।

रहावे असे की न कोणी हसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।


स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, 

अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।


अती भांडणे नाश तो यादवांचा, 

हठाने अती वंश ना कौरवांचा ।

कराया अती हे न कोणी वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।। 


अती गोड खाणे नसे रोज इष्ट, 

कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।

असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।


जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, 

नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।


सदा पद्य घोकोनियां शीण येतो, 

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।

कधी ते कधी हेही वाचीत जावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।


🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹 

 *मराठी माणूस "मागे"*

*असण्याची २२ कारणे...*


मराठी माणूस आजच्या स्पर्धेच्या युगात मागे का पडतो ? आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होतोय ? मराठी माणसातचं बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे ? त्यावर केलेले *'संशोधन'* व *"निरीक्षणाअंती २२ कारणे* दिसून आली, जी *मराठी माणसांनी "स्वतःला" विचारावीत व त्यावर "स्वतःच" उपाय योजना* करावी. ह्या बाबी *प्रत्येक मराठी माणूस 'सकारात्मकतेने'* घेईल हिच अपेक्षा...! (वाद नको.! कारण, *'नाहक वादविवाद'* मराठी माणूसचं घालतो..!!)


*हिच ती २२ कारणे : -*


१) *कमी प्रवास -* प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही.


२) *अति राजकारण -* मराठी समाज राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का ? 


३) *दोनच हाथ कमवणारे -* सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. 


४) *सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला -* कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.


५) *खोटं बोल पण रेटून बोल -* सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते.


६) *आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष -* आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, देशी व थातुरमातुर उपचार केले जातात.


७) *आर्थिक निरक्षरता -* पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते. 


८) *दूरदृष्टीचा अभाव -* पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात. 


९) *ऐतिहासिक स्वप्नात -* अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. तेव्हा सत्य परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे. 


१०) *गृहकलह, कोर्टकचेरी -* गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.


११) *समाज अर्थपुरवठा पद्धत -*  नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, मारवाडी, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही. 


१२) *जनरेशन गॅप -* खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही. 


१३) *ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट -* प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे. काहीही करून पदवी मिळवायची. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार.... व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो. 


१४) *धरसोड वृत्ती -* हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी... कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती... अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.


१५) *कष्टाची लाज -* विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. Easy Money चे खुळ डोस्क्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरात कामं करण्यास लाजं वाटते. 


१६) *फालतू बाबींना महत्व -* एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला... पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, अशा फालतू बाबींमध्ये अडकला आहे. 


१७) *दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद -* भावाचा ऊस जळाला, त्याला पाण्याची  नाही दिली, त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात... अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे *"आश्चर्य"...!!!*  मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहे...!!! 


१८) *इंग्रजी कच्चे -* मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे. अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. 


१९) *संवादकौशल्याचा अभ्यास -* जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.


२०) *चाकोरी मोडत नाही -* अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी - पंचायत - ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.


२१) *जाती प्रथा -* (फालतू प्रथा) जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म - पंथ - जात - पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. 


२२) *वेळेची किंमत -* वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.


*हिच आहेत मराठी माणूसं मागे असण्याची २२ कारणे...!

 1)  मंथरा सारख्या शुल्लक दासीने कैकयी चे कान भरले,आणि प्रभू रामचंद्रांना वनवासात जावे लागले.

२)  वनवासात असतांना मारिच नावाच्या राक्षसाने घेतलेल्या सुवर्णमृगाच्या" आकर्षणास सीता माता बळी पडतात आणि श्रीरामास त्याच्या शिकारीस पाठवतात

3)  साधुच्या वेशात आलेला रावण, सीतेला लक्षमण रेषा पार करायला भाग पाडतो, आणि तिचे अपहरण करतो

४)  आणि सर्वात कहर  म्हणजे, एका गणू नावाच्या सामान्य नागरिकाच्या वक्तव्याने व्यथित होऊन, *"लोक काय म्हणतील"* या भावनेने श्रीराम *परत* आपल्या प्राणप्रिय सीतेचा त्याग करतात

५)  अंतिमतः स्वतःचे पावित्र्य सिध्द करण्यासाठी सीतामाता धरणीभंग करून त्यात स्वतःला झोकून देते, तर पुढे तिच्या विरहाने प्रभू रामचंद्र नदी मध्ये प्राणत्याग करतात.


 *लोकांच्या नादी लागून देवाची ही दशा होऊ शकते, तर आपणा सामान्यांची काय गत होत असेल.  ?  ? ?* 


*आयुष्य एकदाच मिळते, आपल्या आयुष्यातील मंथरा मारिच रावण आणि गणू ओळखायला शिका*,


 *गैरसमज पुर्वग्रह व अनठायीभिती  टाळुन मोकळा संवाद साधा हीच जगण्याची खरी रीत.😊*

 *प्रगल्भता म्हणजे काय ?*

(MATURITY)


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.      


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.    


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो. 


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता. 


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.   


आणि शेवटी अती महत्वाचे 


*प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.*


🌸 ( संग्रहालयातील)

 काय चूक काय बरोबर......?

=================

काही दिवसांपूर्वी दोन मुलाखती वाचण्यात आल्या होत्या. 

एक सौ.नीता अंबानी आणि दुसरी श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची.

पहिली मुलाखत नीता अंबानी ह्यांची होती,ज्यात त्यांच्या श्रीमंती आवडीनिवडी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ - त्या तीन लाख किंमत असलेल्या कपातून चहा पितात.

लाखाच्या वरती ज्यांच्या किमती आहेत आणि ज्याच्यावर हिरे जडलेले असतात अशा पर्सेस त्या वापरतात,.


एकदा वापरलेली लाखांच्या घरात असलेली चप्पल त्या पुन्हा वापरत नाहीत आणि करोडोंमधे किंमत असलेली अगणित घड्याळांचा त्यांना शौक आहे आणि अजून बरच काही......

दुसरी मुलाखत होती इन्फोसिस च्या श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची

मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही करोडोंच्या मालकीण आहात, पण तो पैसा तुम्ही गरजू लोकांकडे वळवता... ....!


गेल्या पंधरा वर्षात स्वतःसाठी एकही नवीन वस्तू तुम्ही घेतली नाहीत.

तुम्ही एका साध्या घरात रहाता, प्रवासही नेहमी रेल्वेच्या जनरल बोगीतून करता तुम्हाला कधी श्रीमंत आयुष्याचा मोह नाही होत का ? एकीकडे लोक स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी काय काय प्रकार करतात, मग तुम्ही इतकं साधं आयुष्य कस काय प्रिफर करता ? त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिल ते अस :-


त्या म्हणाल्या, 

समाजातील प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र बेट असते आणि तुम्ही त्याच्याशी फक्त एकाच ब्रिजद्वारे रिलेट होऊ शकता तो ब्रिज म्हणजे त्यांच्याशी तुमचा भावनिक संवाद.......!

नातं निर्माण होण्यासाठी नेहमीच पैसा उपयोगी पडत नाही तर त्यासाठी गरज असते ती संवेदनशीलता आणि प्रेमळ शब्दांची.

पैशापेक्षा तुम्ही कुणाचं दुःख जेव्हा सहानुभूतीपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची ठरते


मी एका उच्च शिक्षित पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आणि नंतर समाज सेवेत रुजू झाले. मी समाजातील इतकी दुःख बघितली की माझी पैशा प्रतीची आसक्ती निघून गेली. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात समाजसेवेतून समाधान मिळत. मला श्रीमंतीच प्रदर्शन करण्याची गरजच वाटत नाही. अशा प्रदर्शनातून काय दाखवायचं आणि कुणाला दाखवायचं आहे ? जीवनाकडे मृत्यूच्या नजरेतून बघितलं पाहिजे. आपल्या हिंदू  धर्मात भगवत गीतेत  आणि गौतम बुद्धांनीही सांगितलं आहे की जग आणि जीव नश्वर आहेत. मग जे नश्वर आहे त्याचा मोह कशासाठी......!


एकीकडे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणारी एक स्त्री जी त्या श्रीमंतीचं स्टॅंडर्ड मेंटेन करताना लाखोंचा चुराडा सहज करते. 

एकदा घातलेली लाखोंची चप्पल ती पुन्हा वापरतही नाही. आणि दुसरीकडे काही हजारांसाठी देशातील गरीब शेतकरी आणि त्यांचं कुटुंबीय स्वतःच आयुष्य संपवतात. 

एकीकडे एक वेळ जेवून उपासमार सहन करणारा समाज तर दुसरीकडे पैशाचा अक्षरशः अपव्यय करत जगणारी मंडळी.


माननीय श्रीमती सुधा मूर्ती ह्या खरोखरीच आदरणीय आहेत

कारण आज त्यांच्याकडे येणारा प्रत्येक पैसा त्यांची समाज हिताकडे वळवला आहे. त्यांच्यासारखी अनेक मंडळी आहेत जी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी आचरणात आणून जगत आहेत.. ....


आपल्याच देशात असलेल्या ह्या दोन परस्पर विरुद्ध विचारसरणीच्या स्त्रियांना वाचून मन विचारात पडलं..........!!

क्षणभर काय चूक काय बरोबर हा प्रश्न पडला........!

मग एकच मनात आलं की

माझं उर्वरित आयुष्य श्रीमती सुधा मूर्ती यांच्या सारख जगण्याची बुद्धि दे.

त्यांचे जीवन हे "चरित्र" आहे. ते पाठ्यपुस्तकात "धडा" रुपाने पुढील पिढीला "ज्ञात" होवो हिच अपेक्षा.

*🔥!!भेटी लागे जिवा!!🔥*

    *आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला...*

     *या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले,*

     *"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."*

     *मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत...*

*त्यावर मुक्तानं विचारलं,*

     *"दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही...?"*
*तुम्ही म्हणता,*

     *"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.." तसं इतर लोकांना का वाटत नाही...?*

*त्यावर ज्ञानोबा म्हणाले,*

     *"मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."*

      *अगं मुक्ता, "पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..." म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल...*

     *तुला सांगतो, "सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे... हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."*

      *हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात,* 
 *"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे.."*

     *हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते...*
     *तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, "आनंदाचे डोही आनंद तरंग.."*

      *नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,"*

*"सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली...’"*

       *संत अमृतराय म्हणतात, "अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..."*

*संत सेना महाराज म्हणतात,*

     *"जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची..."*

     *आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो...*

     *असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात,*

     *"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे..."*
    *संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते...*

    *म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती...."*

      *🌸रामकृष्णहरी🌸*

*रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा ऊल्लेख आजपर्यंत फार कमी झाला*

 ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही, वाचनात आली म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला


त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे.

रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा http://ift.tt/2xchNIX


सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले.


झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला. रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.


रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही. रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते. पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते.


मात्र रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, "हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही."


आता सभोवती असलेल्या लोकांचे लक्ष श्रीराम ह्यावर काय उत्तर देतात ह्याकडे लागले - राम काय उत्तर देणार ह्यावर?

अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, "पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.


ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता. रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे, पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस."


ह्या दोघांमधील संवाद ऐकणारे आसपासचे सारे लोक चकित होऊन त्यांच्यातील धर्मसंवाद ऐकत होते आणि दोघेही एकमेकांना पुरून उरणारी शास्त्रचर्चा न्याहाळीत होते. आता रावणाच्या या प्रस्तावावर राम काय उत्तर देणार ह्याकडे ते सारे उत्कंठेने पाहू लागले. रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला "विजयी भव" असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान.


रामाने रावणालाच विचारले," रावणा, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी." आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही अगदी रामाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्वकारण्याचा प्रश्नच नव्हता. पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता. दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला,"हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एव्हढीच मागणी करतो की माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य कांहीही नको."


आणि म्हणूनच रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!


विद्यमाने : The Awakening Times

स्त्रोत: Veda Vyasa Ramayana 

 *भारताचे संविधान कुणी लिहिले ???* 


या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्वमान्यच आहे ते म्हणजे... *भारताचे संविधान आंबेडकरांनी लिहिले*

परंतु सहज माझ्या मनात आलं "एकाच व्यक्तिनी" इतकं मोठं, तर्कसंगत, सुटसुटित, कायदेशीर लिखाण केले आहे काय?... ते पण केवळ ३ वर्षाच्या कालावधीत ..... म्हणजेच संवैधानिक सभेच्या स्थापने पासून (९ डिसेम्बर १९४६) ते संविधान अंगीकृत करेपर्यंत (२६नोहेम्बर १९४९).

मला हे पूर्णपणे पटत नव्हतं की केवळ आंबेडकरांनीच संविधान लिहिलं. त्यामुळे इतिहास शोधण्यास सुरुवात केली व खालील माहिती माझ्या हाती लागली ती तुमच्यासोबत share करतोय...

*१९४७ ची फाळणी योग्य रितीने व अहिंसेने व्हावी* यासाठी ब्रिटिशांनी *द इंडिपेंडेंस एक्ट 1947* भारत व पाकिस्तानला दिली, ज्यानुसार दोन्ही देशांना आप-आपली संविधान बनवन्यासाठी स्वतंत्र संवैधानिक सभा (constituent assembly) बनवण्याचे अधिकार दिले.

यानुसार भारताने आपली संवैधानिक सभा ९ डिसेम्बर १९४६ ला बनवून पहिली बैठक घेतली.

या संवैधानिक सभेत असं ठरवण्यात आलं की संविधान *"लिहण्याच काम" एका व्यक्तीच्या आवाक्या बाहेरचं आहे, त्यामुळे खालील प्रमाणे 5 वेग-वेगळ्या समित्या स्थापित केल्या...* 

१) *संघ शक्ति समिती-* चेअरमन- *जवाहरलाल नेहरू* ... मेंबर संख्या-९


२) *मूळ अधिकार व अल्पसंख्यक समिती-* चेअरमन- *वल्लभभाई पटेल.* .. मेंबर संख्या-५४

३) *कार्य संचालन समिती-* चेअरमन- *डॉ के. एम. मुंशी...* मेंबर संख्या-३

४) *प्रांतीय संविधान समिती-* चेअरमन- *वल्लभभाई पटेल ...* मेंबर संख्या-२५

५) *संघ संविधान समिती-* चेअरमन- *जवाहरलाल नेहरू...* मेंबर संख्या-१५

".... म्हणजे पाच समित्या मिळून १०६ मेम्बर्सनि अथक मेहनत करुन आपल्या संविधानातील प्रत्येक कलमं लिहिली..."

पुन्हा माझ्या मनात प्रश्न, की फ़क्त *आंबेडकरांना 'संविधानाचे शिल्पकार' का म्हणावे...??* 

पुढे अभ्यास केला तर कळाले की...

या पाच समित्यांनी संविधान लिहून पूर्ण केल्यावर *२९ ऑगस्ट १९४७* ला *७ सदस्यीय* *"ड्राफ्टिंग समिती"* बनवली, या समितीचे कार्य होते... लिहिलेल्या संविधानाचे अभ्यास करणे व गरज असल्यास नवीन कलम 'सूचवणे'. व शेवटी ड्राफ्ट तैयार करुन प्रस्तुत करने.

या ड्राफ्टिंग समितीचे चेअरमन *सर अल्लादि कृष्णास्वामी* होते, ड्राफ्ट तैयार केला होता तो *सर बी. एन. राव* यांनी.... आणि हा सम्पूर्ण तैयार झालेला ड्राफ्ट सभेसमोर (अर्थात देशसमोर) " *प्रस्तुत* " करण्याच् काम *डॉ आंबेडकरांना* सोपवण्यात आले, कारण १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० पर्यंत ते कायदेमंत्री होते, व कुठलाही कायद्या सम्बन्धिचा ड्राफ्ट प्रस्तुत करण्याच् काम *कायदेमंत्र्यांचे* होते.

भारताचे संविधान  लिहिण्यासाठी २ वर्ष,११ महिने,१८ दिवस लागले आणि ते " संविधान " २६ नोव्हेंबर १९४९ ला *संविधान मसुदा समितीला* बाबासाहेबांनी दिले.

 🙏🌹🙏🌹🙏


*काट्याच्या अणीवर वसले तीन गाव*


🕉🕉🕉🕉🕉🕉


काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।

दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥


वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे एका घडेचिना ॥२॥


घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥


भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।

दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥


शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥


जेवेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या।

दोन हुकल्या एक लागेचिना ॥६॥


ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्‌गुरूवाचुनि कळेचिना ॥७॥


ज्ञानदेवांचे हे भारुढ [बहुरुढ] आध्यात्मिक छटा असलेले आहे.


काळ नावाच्या काट्यावर स्थूल , सूक्ष्म व लिंगदेह ही तीन गावे वसवली. 

स्थूल व सूक्ष्म हे देह नाशवंत म्हणून ओसाड.

लिंगदेह हा अदृष्य 

अनाकलनीय म्हणून वसेचिना..


तीन कुंभार म्हणजे 

*ब्रह्मा विष्णू महेश्वर*

पण... विष्णू आणि महेश्वर हे निर्मिती बाबत तटस्थ. 


एक कुंभार ब्रह्मा याचे कडे निर्मिती,  पण तो वसवतो ते आत्मतत्व.  याच आधारावर जो त्याचाच आधार आहे .


त्याने घडवलेली तीन मडकी. म्हणजे स्थूल सूक्ष्म देह नाश पावणारी कच्ची मडकी.


या लिंगदेहात अविनाशी आत्मतत्व.  यावर अग्नीचा परिणाम नाही म्हणून भाजण्याचा प्रश्नच नाही.

 

त्यात सत्व रज तम हे तीन मूग रांधण्याचा प्रयत्न.  


रज तम हे हिरवे कधीच पक्व न होणारे. पण सत्व मात्र रांधण्याचा प्रश्नच नव्हता.


तीन काळ हे तेथील पाहुणे. 


भूतकाळ रुसून बाजूला झाला. वर्तमान प्रत्येक क्षणाला रुसून मागे जात आहे. भविष्य अजून नंबर न लागल्यामूळे जेवत नाही म्हणून कर्म अद्याप उदित व्हायचे आहे.


न जेवणारा भविष्य काळ याला क्रियमाण , संचित, व प्रारब्ध या तीन म्हशी.  या पैकी संचित व प्रारब्ध यांचा नवनिर्मितीचा काळ संपलेला व क्रियमाणाचा  कर्म झाल्या शिवाय कसा फळणार.


गुरुकृपा झाली व भक्ती पक्व झाली तर काय घडते ?


संत म्हणतात : 

प्रारब्ध, संचित क्रियमाण l

भक्तालागी नाहीत जाण I


या संचित क्रियमाणाला गुरु हे  'प्रत्येकी एक' म्हणजे 'तीन बुक्या' मारतात. पण ते आधीच नष्ट झाल्यामुळे हुकणे न लागणे हे घडणारच. 


हा अनुभव गुरु वाचून येणार नाही याचा अर्थ गुरुकृपेशिवाय देहभावनेतून देवभावनेत जाता येणार नाही व त्या शिवाय त्रिगुणातीत होता येणार नाही. 

नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला - 

मी कसा दिसतो ते सांग 


बायको म्हणाली — 


मेघनादरिपु तात वधी ज्या नराला । 

ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। 

त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। 

तैसे तुम्ही दिसता मजला मनी। 


🤔🤔🤔


नवर्‍याला याचा अर्थ काही कळेना म्हणून त्यांने एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यानी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.


मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ? 

तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ.

दशरथाच्या हातून अजाणता कोण मारल्या गेला ? 

तर श्रावणबाळ ( मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण ) श्रावण महिन्याच्या अमावस्येला ( संहिता म्हणजे अमावस्या ) कोणता सण असतो ? 

तर पोळा . पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची .( त्या दिवशी बैलाला सजवतात ) 

त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात.


😂😂😂

*(नवरा मानसिक धक्क्यातून अद्यापही सावरलेला नाही)* 

 ________कायदा  माझ्या  भारतीय घटनेचा_____  


कलम १- कायद्याचे नाव.

कलम २- भारतात केTलेल्या अपराधास शिक्षा.

कलम ३- भारताच्या हद्दी बाहेर केलल्या अपराधाची चौकशी / शिक्षा.

कलम ४- परमुलकी अपराधास हा कायदा लागू.

कलम ५- अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही.

कलम ६- ह्या कायद्यातील लक्षणांस अपवाद.

कलम ७- अर्थपूर्ण शब्द.

कलम ८- लिंग.

कलम ९-वचन.

कलम १०- पुरूष - स्त्री हया शब्दाचा अर्थ.

कलम ११- मनुष्य.

कलम १२- साधारण सर्व लोक.

कलम १३- हुकुमशाही / राजेशाही  रद्द .

कलम १४- शासकीय सेवक.

कलम १५/१६- रद्द.

कलम १७- सरकार.

कलम १८- भारत.

कलम १९- जज्ज.

कलम २०- न्यायाचे कोर्ट.

कलम २१- लोकसेवक.

कलम २२- जंगल मालमत्ता.

कलम २३- गैरलाभ / गैरहानी.

कलम २४- लबाडीने.

कलम २५- कपटाने.

कलम २६- समजण्यास कारण.

कलम २७- बायको.

कलम २८-नकली पदार्थ.

कलम २९- दस्तावेज.

कलम २९(अ)- विदूत नोंदी.

कलम ३०- मुल्यवान रोखा.

कलम ३१- मृत्यूलेख.

कलम ३२- कृत्याच्या करण्यास / वर्जनास लागू शब्द.

कलम ३३- कृती, अकृती.

कलम ३४- सामायिक इरादा.

कलम ३५- गुन्ह्याच्या इराद्यानं कृत्य.

कलम ३६- अंशतः समजून कृत्य.

कलम ३७- अपराधांना सामील होणे.

कलम ३८- अपराधांचा दोष येणे.

कलम ३९- आपरकशीने / इजापुर्वक.

कलम ४०- अपराध.

कलम ४१- विशेष कायदा.

कलम ४२- स्थलविशेषाचा कायदा.

कलम ४३- गैरफायदा, कायद्याने करणे पात्र.

कलम ४४- क्षती / हानी.

कलम ४५- जीव.

कलम ४६- मरण.

कलम ४७- प्राणी.

कलम ४८- नाव.

कलम ४९- वर्ष.

कलम ५०- कलम.

कलम ५१- शपथ.

कलम ५२- इनामाने / शुद्ध हेतूने.

कलम ५२(अ)- आसरा देणे / आश्रय अपवाद.

कलम ७६- कायदेशीर बांधील असलेल्या व्यक्तीने

                 तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेली कृती

                 अपवाद होत नाही.

कलम ८२- सात वर्षे वयाखालिल बालकाने केलेली

                 कृती.

कलम ८३- सात वर्षावरील व बारा वर्षा खालील.

                अपरिपक्व समजशक्ती असलेल्या

                 बालकाने केलेली कृती.

कलम ८४- वेड्या मनुष्याने केलेले कृत्य.

कलम ९०- भीतीमूळे दिलेली संमती.

कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याचा अोघात

                 केलेली गोष्ट.

कलम ९७- शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या 

                 बचाव करण्याचा हक्क.

कलम १००- शरीराचा खासगीरीत्या बचाव 

                   करण्याचा हक्क हा मृत्यू घडून

                   आणण्याईतपत केव्हा व्यापक

                    असतो.

कलम १०१- असा हक्क मृत्यूहून अन्य अपाय

                   करण्याइतपत केंव्हा व्यापक

                    असतो.

कलम १०२- शरीराचा खासगीरीत्या बचाव

                   करण्याचा हक्क सुरू होणे व

                   चालू राहाणे.


******साह्य करण्या विषयी. *******     


कलम १०७- एखादे कृत्य करण्या विषयी साह्य.

कलम १०८- अप्रेरक.

कलम १०९- अपप्रेरकामूळे परिणामत: .

कलम ११४- अपराधाचे वेळी साह्य करणारा

                   जवळ असणे. 

कलम १४१- बेकायदेशीर जमाव.

कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक असणे.

कलम १४३- शिक्षा.

कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासह बेकायदेशीर

                   जमावात सामील होणे.

कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा

                   आदेश झाल्याने माहीत असूनही 

                    सामील होणे.                          

कलम १४६- दंगा भरणे.

कलम १४७- दंगा करण्याबद्दल शिक्षा.

कलम १४९- विधिनीयूक्त जबाबदारी.

कलम १५१- ५ किवा अधिक व्यक्तींना पांगण्याचा

                   आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक

                    थांबून राहणे.

कलम १५३(अ)- धर्म, वंश,जन्म, निवास, भाषा ई.

                      कारणावरून निरनिराळ्या गटांमध्ये

                      शत्रुत्व वाढविणे.

कलम १५९- दंगल.

कलम १६०- दंगली बद्दल शिक्षा.

कलम १७०- लोकसेवकाची बतावणी करून

                   तोतयागीरी करणे.

कलम १७१- लोकसेवक वापरतो तशी गर्दी किवा

                   अोळख चिन्ह कपट करण्याच्या 

                    उद्देशाने वापरणे परिधान करणे.


*****लोकसेवकांच्या कायदेशीर अधिकाराच्या

           अपमाना विषयी *******


कलम १७२- समन्सची बजावणी किवा इतर

                  कारवाई टाळण्यासाठी फरारी होणे.

कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर शपथेवर

                  खोटे कथन करणे.

कलम १८८- लोकसेवकाने जारी केलेला आदेश न

                   माणने.


***** खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या

             विरोधी अपराध *****


कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी

                    अपराध्याचा पुरावा नाहीसा करणे

                    किवा कोटी माहिती देणे.

कलम २२३- लोकसेवकाने हयगयीने कोणास

                  कैदेतून पळून जाऊ देणे.

कलम २७९- सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर

                  वाहन चालविणे.

कलम २९२- अश्र्लिल पुस्तके ई. विक्री करणे.

कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान

                   करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे

                   नुकसान करणे किवा ते अपवित्र करणे.

कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किवा

                    धार्मिक श्रद्धांचा अपमान करून 

                    धार्मिक भावनांवर अत्याचार 

                    करण्याचा उद्देशाने कृती करणे.

कलम २९८- धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने

                   जाणीव पुर्वक शब्द उच्चारणे.

कलम २९९- सदोष मनुष्यवध.

कलम ३००- खून.

कलम ३०२- खुना बद्दल शिक्षा.

कलम ३०४- सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा.

कलम ३०४(अ)- हयगयीने मृत्यूस कारण.

कलम ३०४(ब)- हुंडाबळी.

कलम ३०६- आत्महत्येला अपप्रेरणा देणे.

कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे.

कलम ३२३- इच्छापुर्ण दुखापत पोहोचण्या बद्दल

                   शिक्षा.

कलम ३२४- घातक हत्त्याराने किवा साधनांनी 

                   इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे.

कलम ३२५- इच्छापुर्वक जबर दुखापत

                  पोहचवण्याबद्दल शिक्षा.

कलम ३२६- घातक हत्त्याराने किवा साधनांनी

                   इच्छापुर्वक जबर दुखापत

                   पोहचवीणे.

कलम ३२६(अ)- अॅसिड ई. वापर करून इच्छापुर्वक

                     जबर दुखापत पोहचवीणे.

कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक अॅसिड फेकणे अथवा

                    फेकण्याचा प्रयत्न करणे.

कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने विष ई.

                  सहाय्याने दुखापत करणे.

कलम ३३०- कबुलीजबाब जबरीने घेण्यासाठी,

                   गेलेला माल परत घेण्यासाठी 

                  इच्छापुर्वक दुखापत करणे.

कलम ३३२- लोकसेवकाला धारकाने त्याच्या

                  कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी

                  इच्छापुर्वक दुखापत करणे.

कलम ३३६- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत

                  सुरक्षितता धोक्यात आणणारी

                  कृती.

कलम ३३७- इतराचे जीवित किवा व्यक्तीगत

                   सुरक्षितता धोक्यात आणणार्या

                    कृतीने दुखापत पोहचवीणे.

कलम ३३८- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत

                   सुरक्षितता धोक्यात आणणार्या

                    कृतीने जबर दुखापत पोहचवीणे.

कलम ३३९- गैरनिरोध / अन्यायाने प्रतिबंध 

                    करणे.

कलम ३४०- अन्यायाने कैदेत ठेवणे.

कलम ३४१- गैरनिरोधाबद्दल शिक्षा.

कलम ३४२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.

कलम ३४९- बलप्रयोग.

कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग.

कलम ३५१- हल्ला / अंगावर जाणे.

कलम ३५२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.

कलम ३५३- लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून

                  धाकाने प्रारूप्त करण्यासाठी फौजदारी

                   पात्र बलप्रयोग करणे.

कलम ३५४- स्त्रिची विनयभंगकरण्याच्या उद्देशाने

                   तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र

                   बलप्रयोग.

कलम ३५४(अ)- लैगिक छळाबद्दल शिक्षा.

कलम ३५४(ब)- निर्वस्त्र करण्याच्या उद्देशाने

                     तिच्यावर हमला किवा फौजदारी

                     बलप्रयोग करणे.

कलम ३५४(क)- चोरून अश्लील चित्रण करणे.

कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे.

कलम ३४९- अपहरण / मनुष्य चोरून नेणे.

कलम ३६२- अपहरण / पळवून नेणे.

कलम ३६३- अपहरणाबद्दल शिक्षा.

कलम ३७०- व्यक्तीचा गुलाम व्यापार करणे.

कलम ३७५- बलात्कार.

कलम ३७६- बलात्काराबद्दल शिक्षा.

कलम ३७७- अनैसर्गिक संभोग शिक्षा.

कलम ३७८- चोरी.

कलम ३७९- चोरीबद्दल शिक्षा.

कलम ३८०- राहते घर वैगेरे ठिकाणी चोरी.

कलम ३८३- जुलमाने घेणे.

कलम ३८४- शिक्षा.

कलम ३९०- जबरी चोरी.

कलम ३९१- दरोडा.

कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शिक्षा.

कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे.

कलम ३९५- दरोड्याबद्दल शिक्षा.

कलम ४०५- फौजदारी विश्र्वासघात.

कलम ४०६- शिक्षा.

कलम ४०९- लोकसेवकाने, सावकार,एजेंट यांनी

                   अन्यायाने विश्र्वासघात करणे.

कलम ४१०- चोरीची मालमत्ता.

कलम ४११- अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता

                   स्वीकारणे.

कलम ४१५- ठगवणूक.

कलम ४१७- ठगवणूक करण्याबद्दल शिक्षा.

कलम ४२०- ठगवणूक करणे आणि मालमत्ता

                   देण्यास नकार देणे.

कलम ४२५- अपक्रीया.

कलम ४२६- अपक्रीया बद्दल शिक्षा.

कलम ४३५- १००रू. पर्यंतच्या किवा शेतमालाच्या

                    १०रू.किमतीच्या नुकसान करण्याच्या

                    उद्देशाने स्फोटक पदार्थ अथवा विस्तव

                   याद्वारे आगळीक करणे.

कलम ४४१- फौजदारी पात्र अतिक्रमण किवा

                    घराविषयी आगळीक.

कलम ४४२- गृह अतिक्रमण किवा घराविषयी 

                   आगळीक.

कलम ४४३- चोरटेगृह अतिक्रमण.

कलम ४४४- रात्रीच्यावेळी चोरटेगृह अतिक्रमण

                    करणे.

कलम ४४५- घरफोडी.

कलम ४४७- फौजदारी पात्र अतिक्रमणाबद्दल शिक्षा.

कलम ४४८- घर अतिक्रमणाबद्दल शिक्षा.

कलम ४५२- दुखापत, हमला,करण्याची पूर्वतयारी

                   करून नंतर गृह अतिक्रमण करणे.

कलम ४५४- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या

                   अपराध करण्यासाठी चोरटेगृह

                    अतिक्रमण किवा घरफोडी करणे.

कलम ४५७- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या

                    अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी

                     चोरटे गृह अतिक्रमण किवा घरफोडी

                      करणे.

कलम ४६३- बनावटी लेख करणे.

कलम ४६५- बनावटी करण्याबद्दल शिक्षा.

कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी बनावटी करणे. कलम ४९८(अ)- एखाद्या स्त्रीच्या पतीने किवा

                      नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे. कलम ५०४- शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान

                    करणे.

कलम ५०६- फौजदारी पात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा.

कलम ५०९- विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव

                   किवा शब्दचोर करणे.

कलम ५११- अाजिवन कारावासाच्या किवा अन्य

                   कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले

                    अपराध करण्याचा प्रयत्न करण्या

                    बद्दल शिक्षा.

          

                   अशी घटने मध्ये कायदयाची तरतुद केली .डॉ. भिमराव आंबेडकरानी श्रिमंतांपासून गरीबांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना समान कायदा देऊन, कायद्यापुढे सर्व समानता,ह्या भारताला जगातील सर्वात मोठे, धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र बनवून संविधान बहाल कले.        

                    म्हणूनच तर भारताच्या संविधानाचा जगात जय-जय कार होतो.हे अलीकडच्या काळात नेपाळ या देशाने भारताचा आदर्श ठेवून लोकशाही राष्ट्र घोषित केले हे उत्तम उदाहरण आहे. जगातील सर्वात बुद्धीमान , दुर दुष्टी .असलेले महामानवाची भारताला लाभलेली देणगी म्हणजे भारतीय घटना होय


..........जय भारत ....

 कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे.  तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे. इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

___________________________

क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.


च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते. 

एकदा करून बघा 


ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा. 


त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.

एकदा म्हणून बघा.


प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .

_____________________________


आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.


जय मराठी !

क,ख,ग काय म्हणतात बघू जरा ....

•••••••••••••••••••••••••••••••••••

क - क्लेश करू नका 

ख- खरं बोला

ग- गर्व नको 

घ- घमेण्ड करू नका  

च- चिँता करत राहू नका

छ- छल-कपट नको 

ज- जवाबदारी निभावून न्या

झ- झुरत राहू नका  

ट- टिप्पणी करत  राहू नका

ठ- ठकवू नका  

ड- डरपोक राहू नका

ढ- ढोंग  करू नका

त- तंदुरुस्त रहा 

थ- थकू नका 

द- दिलदार बना 

ध- धोका देऊ नका  

न- नम्र बना 

प- पाप करू नका  

फ- फालतू कामे करू नका  

ब- बडबड कमी करा

भ- भावनाशील बना 

म- मधुर बना 

य- यशस्वी बना 

र- रडू नका 

ल- लालची बनू  नका

व- वैर करू नका

श- शत्रुत्व करू नका

ष- षटकोणा सारखे स्थिर रहा 

स- सत्य बोला 

ह- हसतमुख रहा 

क्ष- क्षमा करा 

त्र- त्रास देऊ नका 

ज्ञ- ज्ञानी बना  !!