मनोहररावांना बरेच दिवसांनी रजा मिळाल्याने ते फार आनंदात होते. त्यामुळे सक्काळी सक्काळी उठुन बाहेर फिरुन आले. घरी आल्यावर बायकोला उठवल व मस्त चहा केला दोघांसाठी.


बाहेरच्या खोलीत आल्यावर सोफ्यावर बसुन मोठ्ठ्या आवाजात आपल्या आवडिची गाणी लावली. गाणी इतक्या जोरात लावली होती कि शेजार्यां्नाही स्पष्ट ऎकू जावी !

थोड्या वेळाने शेजारचे रामराव आले व मनोहररावांना म्हणाले, “मनोहरराव तुम्हाला माझ्या TV चा आवाज ऎकू येतोय ?

मनोहरराव ,”नाही.”

रामराव,”मला पण नाही. तुमची गाणी जरा हळू वाजवाल काय ?”
   दोन महिन्यांपुर्वी आमच्या कंपनीत एक नविन साहेब आले. त्यांना ऑफिसचे प्रत्येक काम आपल्या सेक्रेटरीला सांगायची सवय असल्यामुळे कोणतीही मशिन चालवता येत नाही.
         परवा त्यांची सेक्रेटरी रजेवर होती व मला ते संध्याकाळी पेपरचे बारिक तुकडे करणार्‍या पेपर श्रेडर पुढे ऊभे दिसले. त्यांना बघुन मी विचारल ,"सर, काही मदत हविय का ?"

साहेब : हो, मला ही मशिन चालवता येत नाही. जरा मदत कर ना.

मी त्यांच्या हातातला कागद घेतला, मशिन मध्ये घातला व स्टार्ट बटन दाबली. बटन दाबताच कागद आत गेला.

कागद आत गेलेला बघुन साहेब मला म्हणाले," अरे, हा एक अतिशय महत्वाचा कागद आहे मला याच्या दोन कॉपी दे"

योग्य क्रम

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?

मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?

बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,"अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?"



पायलट म्हणाला, "खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही."
आपण वाढवावें आपण बुडवावें । ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥
पाळिल्या पोसिल्या विसर पाडावा । समर्थाच्या नांवा लाज येते ॥२॥
रंक मी भिकारी उच्छिष्ठाचा अधिकारी । काय भीड हरि माझी तुम्हां ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा । उगवा हा फांसा लवकरी ॥४॥


- संत कर्ममेळा
आम्ही सखे देवाजीचे । येका विठ्ठ्ल बीजाचे ॥
जन्म पाचही जहाले । बीज नाही पालटले ।
येकबीज आजीवरी । जन्म याच क्षितीवरी ।
दंड्कारण्य देशात । याची कलीयुगा आत ।
शकामाजी शालीवान । जन्म पाच जाले धन्य ।
तुकाविप्र पाचवीया । जन्म जाली गुरु दया ॥

या विठूचा गजर

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला ॥१॥

कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥

उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥

पंचतत्त्वांची गोफण, क्रोध पाखरें जाण ।
धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
केशवदास ह्मणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥


- संत केशवदास