ट्रेनर

एका प्रसिद्ध मासिकासाठी काम करणार्‍या फोटोग्राफरला एकदा जंगलात लागलेल्या आगीचा चांगला फोटो काढायचा होता. त्याने बराच प्रयत्न केल्यावरही चांगला फोटो मिळेना, प्रत्येक फोटोत आग दिसण्या ऎवजी धुरच दिसायचा, तेंव्हा त्याने आपल्या संपादकांना फोनवरुन कळवले कि जंगलात आग लागली आहे व आगीचा फोटो विमानातुनच काढणे शक्य आहे तर लौकरात लौकर विमानाची व्यवस्था करा.
संपादक म्हणाले लगेच करतो तु विमानतळावर जा.
फोटोग्राफरला घाई झाल्याने त्याने विमानतळावर पोहोचल्यावर सोपस्कार पूर्ण केले व एका लहान विमानात जाऊन बसला व पायलटच्या जागेवर बसलेल्याला म्हणाला चल लगेच उडूया.
पायलटने विमान आकाशात नेल्यावर त्यांनी आगीच्या दिशेने ते वळवले.
फोटोग्राफर म्हणाल चल आता विमान जरा खाली घेऊन ३ ते ४ फेर्‍या मार.
पायलट म्हणाला," का ?"
फोटोग्राफर," मी फोटोग्राफर आहे, मला या आगीचे जवळून फोटो काढायचे आहेत."
"अरे बापरे, मला वाटले तुम्ही नविन ट्रेनर आहात व मला आज विमान कसे उतरवायचे हे शिकवणार आहात.", 

लग्नापूर्वी-लग्नानंतर...

लग्नाआधी 'तो' आणि 'ती' लग्नानंतर 'तो' आणि 'ती'
लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात, पण लग्नानंतर
त्यांच्यातला संवाद बदलतो... कसा?... असा...
लग्नापू वी र्...
तो : हुश्श! किती वाट पाहात होतो मी या क्षणाची.
ती : मी जाऊ का निघून?
तो : छे गं! तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस.
ती : तुझं प्रेम आहे माझ्यावर?
तो : अर्थातच!
ती : तू कधी माझी फसवणूक तर नाहीस ना केलेली?
तो : नो, नेव्हर! असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो?
ती : तू माझं चुंबन घेशील?
तो : हो तर.
ती : तू मला मारहाण करशील?
तो : अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुष नाही.
ती : मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का?
तो : हो.
लग्नानंतर...

लग्नानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी नवा संवाद लिहिण्याची गरज नाही...
फक्त हाच संवाद खालून वर वाचत जा!

ओळख

बसमध्ये सुरेश सारखा त्या मुलीशी बोलण्याचा व काही ओळख निघते का ते पाहण्याचा प्रयत्न करत होता.

“तुम्हाला कुठं तरी पाहिलयं, पण नक्की आठवत नाही…..आपले वडील काय करतात ?

“ते डॉक्टर आहेत”,

वैतागून मुलगी म्हणाली.

“तरीच………..”,

सुरेशचा धीर वाढला, “…..आता मला आठवल,

मी एकदा आजारीपडलो, तेव्हा त्यांनी औषध दिलं होतं”.

“शक्य आहे”,

ती मुलगी म्हणाली,”

ते जनावरांचे डॉक्टर आहेत”.

टाळ्या वाजवा, वाघ घालवा

एकदा एक माणुस जोर जोरात टाळ्या वाजवत होता.

मित्र ते पाहुन म्हणाला, "का हो असे टाळ्या का वाजवत आहात?"

पहिला म्हणाला कि "टाळ्या वाजवल्या तर वाघ जवळ येत नाहि."

मित्र "पण ईथे कुठे वाघ आहे?"

"येइलच कसा? मी टाळ्या वाजवतो आहे ना!" पहिला उत्तरला.

लॉटरीचे तिकीट

स्थळ : सदाशिव पेठ, पुणे........

जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?

तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!

जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?...

तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
मुलगा : आई, तुझा जन्म कुठे झाला ?

आई : पंढरपुरलां

मुलगा : बाबांचां?

आई : नागपुरला .

मुलगा : माझा आणि ताईचा ?आई : तुझा पुण्याला , ताईचा ठाण्याला .

मुलगा : मग आपण सगळे एकञ कसे आलो ?

लग्न २५ शीतच

दोन मैत्रिणींच्या लग्नाविषयी गप्पा सुरु होत्या

पहिली दुसरीला - माझा निर्णय झाला आहे...
दुसरी - कसला?

पहिली - लग्नाचा... मी २५ वर्षांची झाल्यानंतरच लग्न करणार आहे.

दुसरी - मी पण निर्णय केला आहे...

जो पर्यंत लग्न करणार नाही तोर्यंत २५ वर्षांची होणार नाही.