मग उपयोग काय?

जेम्स बाँडचे बैकग्राउंड वाजतय डोक्यात,
हातात भिक्षापात्र..मग उपयोग काय?

लॉटरीच्या पैशाने गुरख्याने घेतला बंगला,
स्वत:च झाला वॉचमन...मग उपयोग काय?

तरुणी आवडली... मनाला भिडली..,
गळ्यात मंगळसुत्र...मग उपयोग काय?

भरपुर पगाराची US ला नौकरी,
व्हिसा रिजेक्ट झाला...मग उपयोग काय?

शहरामधे फुकट अन्न-धान्य वाटले,
गल्लीत माझ्या कर्फ्यु...मग उपयोग काय?

हेअर ट्रांस्प्लांट साठी जमवले होते पैसे,
नुकतेच लग्न झाले...मग उपयोग काय?

नशिबाने नेहमी चॉकलेट दाखवल,
खाउ नाही दिल...मग उपयोग काय?

- शशांक प्रतापवार

दिवस कसे गेले

औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या....
"साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलंच नाही"
...
.
.
.
.
. आणि सभाग्रहात जोरदार हशा ...!

पोरी महागात पडतात!!

पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो, पोरी महागात पडतात

तुम्हाला काय, मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कानाखाली ओढतात
खरच सांगतो पोरांनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरांनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव, त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित, कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात पोरी महागात पडतात!!
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय सर्वांनाच...........

लग्नाच्या गाठी

जन्मोजन्मीचं वैर काढत
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो
...आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे
असं प्रत्येक बाईला वाटत असतं
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं

तो कधी कसा वागेल
ह्याची जरासुद्धा खात्री नसते
नको तेच नेमकं बोलून जाईल
जे बोलायचं त्याला कात्री असते.

मग जमेल तिथं, जमेल तेव्हा, जमेल तितकं
ती त्याला बोलत बसते
त्याच्या तेही डोक्यावरून जातं
पण ह्या नंदीबैलाची मान डोलत असते

त्याचा तो गबळा अवतार
तिला नीट्नेटकं राहयचं असतं
तिला चार दिवस सासूचे
त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

ती तरी थोडी त्याच्यासारखी असेल
असं प्रत्यक्षात घडत नाही
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून
ती त्याच्या आकाशात उडत नाही

तो गच्चीत तिला घेऊन जातो
इंद्रधनुष्यावर चालायला
ती सोबत पापड कुरडया घेते
गच्चीत वाळत घालायला

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते

प्रेमात रंगून, नशेत झिंगून
खूपसं जवळ, काहीसं लांबून
थोडीशी घाई, थोडसं थांबून
पौर्णिमेचा चंद्र त्याला
तिच्या केसात माळायचा असतो
...आणि त्याच वेळेस तिला मोरी धुवायची
किंवा संडास घासायचा असतो.

आपली बायको म्हैस आहे
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

- धुंद रवी

सरदारजिची साइड

एका ट्रफिक पोलीसाने रॉंग साईडने जाणाऱ्या सरदारजीच्या गाडीला थांबविले आणि म्हटले -

'' तुला काही कळतं का? तु कुठे गाडी घेवून चालला होता''

'' नाही ... पण हो जिथेही मी माझी गाडी घेवून चाललो होतो तिकडे काहीतरी खुप मोठी दुर्घटना घडलेली दिसते .. कारण सगळेजण तिकडून गाड्या परत आणित आहेत'' सरदारजीने उत्तर दिले.

म्हातारा माणूस व पोपट

एक म्हातारा माणूस एका मॉलमध्ये बेंचवर बसला होता. तेवढ्यात तिथे एक युवक येवून बसला. त्या युवकाचे केस कुठे पिवळे, कुठे हिरवे, कुठ गुलाबी तर कुठे जांभळे असे जागोजागी रंगविलेले होते. त्याच्या डोळ्याभोवती काळा रंगही लावला होता. तो म्हातारा त्या युवकाकडे एकटक पाहत होता. त्या म्हाताऱ्याला आपल्याकडे असे एकटक बघतांना पाहून तो युवक त्याला उद्दामपणे म्हणाला, '' हे म्हाताऱ्या ... असा काय पाहतोस?... तु तुझ्या जवानीत कधी अशी मस्ती केली नाही का?''

त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले, '' हो केली होती ना... जेव्हा मी जवान होतो तेव्हा एकदा मी खुप पिलो होतो... तश्या पिलेल्या अवस्थेत मला एक पोपट भेटला... त्याला बघताच मी त्याच्या प्रेमात पडलो, आणि पुढेही बरच काही झालं...... मी विचार करीत होतो की तु त्या पोपटाचा आणि माझा मुलगा तर नाहीस ''

एकच कुत्रा

टिचर - बंटी तु ''माझा कुत्रा'' या विषयावर लिहिलेला निबंध अगदी तंतोतंत तुझ्या भावाने लिहिलेल्या निबंधाप्रमाणेच आहे. तु त्याची कॉपी केलीस की काय?

बंटी - नाही सर... पण तो कुत्रा एकच होता...