शाळेतली मुलं प्राणीसंग्राहलय ­ ात गेली:
इंग्रजी शाळेतली मुलं:
Wow! Look at that monkey,...... he's so cute!!
:
:
:
मराठी शाळेतली पोरं: ते बघ
रम्या तुझा बाप कसा झोपलाय!!
दगड मारू का त्याला.....

परीक्षा

विज्ञानात केलेत अंधश्रद्धांवर वार
त्यांची झुंड तर भोंदूच्या दारी होती

भूगोलात केली त्यांनी जगाची सैर
परि शेजारच्यास न ओळखणारी होती

आयुष्याचे गणित कधी आलेच नाही
तरीपण बरोबर ही गुणाकारी होती (?)

मायभूचे ऋण न जाणले, झटपट शिकून
त्यांना करायची परदेशवारी होती

सदा शिकले चांगले, पण वागले उलटच
तरीही त्यांनी घेतली भरारी होती

अनुत्तीर्ण झाले परीक्षेत जीवनाच्या
परि त्यांना मिळाली टक्केवारी होती


कवी -  विश्वजीत गुडधे
 एक महिला वनात गेली असतांना पिंज-यात अडकून बसलेला एक बेडूक तिला दिसला. तिने त्याची मुक्तता केली तर तिला तीन वर मागायला बेडकाने सांगितले.
बेडकाने त्याची सुटका झाल्यावर सांगितले की ती जे काही मागेल ते तिला मिळेलच पण त्याच्या दसपट तीच गोष्ट तिच्या नवरोबाला पण मिळेल.
बाईंनी पहिला वर मागितला, “मला जगातली सर्वात सुंदर स्त्री बनव.” तिचा नवरा अत्यंत देखणा बनण्याला तिची हरकत नव्हती.
दुसरा वर, ” मला जगातली सर्वात श्रीमंत स्त्री बनव.” तिचा नवरा जरी दहापट श्रीमंत झाला तरी त्याची संपत्ती म्हणजे तिचीच असा विचार तिने केला.
तिसरा वर, “मला एक सौम्य असा हृदयविकाराचा झटका येऊ दे”
तात्पर्यः बायका लई बेरकी असतात
.
.
.
तात्पर्य काढण्याची एवढी घाई करू नका.
.
.
.
.
.
.
.
.
.
तिच्या नव-याला दहापटीने सौम्य असा अगदी मामूली झटका येऊन गेला.
.
दुसरे तात्पर्य
पहिले तात्पर्य तितकेसे बरोबर नाही

आभाळाचा श्वास

आभाळ भरुन येताना..!

आभाळातनं मोती सांडावेत
आणि तुझा भास व्हावा
कोंडलेल्या मनाचा थोडा
श्वास मोकळा व्हावा!

मोकळ्याच ढगांची गडगड
हा ऋतु कोणता असावा?
बंध भावनांचे जपण्या
तो बहुधा सज्ज नसावा!

निळसर रंग पुन्हा एकदा,
एखादाच ढग भरुन यावा
सांडणार्‍या थेंबाला मार्ग
पापण्यांनी सुचवावा!

अशावेळी सांज होती
हा विसर का रे पडावा?
विसावलेल्या मनाचा पुन्हा
श्वास भरुन यावा!

भरुन येताना आभाळ
क्षण धुंद जरा असावा
फक्त आभास चांदण्याचा
रात्रीच्या श्वासांत उरावा!


कवियत्री - पूजा  पवार

हवा झुकत काजवा

हवा झुकत काजवा
काळ्याशार अंधारात
ब्रम्हकमळ सुजाण
हवे खिडकीत....

हवा जरा वाऱ्यासंगे
ओल्या गवताचा गंध
पाखराची नीज जशी
हवी तशी रात्र धुंद....

हवा असा थाटमाट
असे गुज लिहायला
हवी चांदण्याची वाळू
ओळीवरी शिंपायाला......

आपलं माणूस

आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

दिसत नाही फुल
तरी वास येतो!
तुम्ही म्हणाल भास होतो!
भास नव्हे:अगदी खरा
गालांवर श्वास येतो!

मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येवून बसतं;
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

किलबिल करीत जाग्या होतात
त्याच्या सगळ्या हालचाली,
कधी शब्द तर कधी
शब्दावाचून त्याची बोली
धूपासारखी भरून टाकते सगळी खोली!

ज्याचं त्याला कळत असतं
त्याच्याशिवाय,तिच्याशिवाय
जीवाला इतकं बिलगून कुणीच नसतं!
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

आपण आपलं काहीवाही करत असतो,
सगळ्यांसाठी हे करीत ते करीत
वेळ आपला भरीत असतो!
जरा थांबा
आठवून बघा:

एकटेच आपण आपल्याशी हळूच हसतो,
खरतर आजूबाजू कुणीच नसतो!

हसता हसता कोण आपले डोळे पुसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

संध्याकाळच्या गूढ सावल्या,
रात्र होते खिन्न काळी
पाखरं गाणी मिटून घेतात,मुकी होते रानजाळी!

घराच्या पायरीवर कोण तेव्हा एकट बसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

खिडकीतून दिसणारा
निळा तुकडा कुणाचा?
फांदिमागे चंद्र आहे
हसरा मुखडा कुणाचा?

एकांतात उगवणारा
एक तर कुणाचा?
निरोप घेवून येणारा
ओला वारा कुणाचा?

डोळे मिटून घेतल्यावर आपल्याला कोण दिसत?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

तरीसुद्धा

समूहात बसून हि गाणी
ऐकावीशी वाटली तर
त्यात काय चूक आहे?
शब्दांचं नादरूप
असं मिळून भोगणं ही
प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे!

तरीसुद्धा डोळे मिटून
मनोमय तालावर
आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे;
एकट बसून एकट्याने
प्रत्येक गाणं
आपल्याच मनात वाचता आलं पाहिजे!