केवढे हे क्रौर्य!

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!


कवी - ना.वा.टिळक

काही बोलायाचे आहे, पण......



















काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही


गीतकार      - कुसुमाग्रज
गायक        - श्रीधर फडके
संगीतकार  - यशवंत देव
तू किनारा गाठलास
तर मी तुझ्याबरोबर आहे
आणि तळाशी गेलास
तर तुझ्या अगोदर आहे

                   - चंद्रकांत गोखले 

प्रेम कोणीही करीना

प्रेम कोणीही करीना, का अशी फिर्याद खोटी ?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी का स्वार्थ पोटी ?

आपल्या या चारुतेशी विस्मरूनी जा सुकेशी,
भाळता कोणास देशी का न भक्तीची सचोटी ?

प्रेम का संगीन गुच्छी, प्रेम का रंगीन ओठी
प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी.


गीतकार - माधव ज्युलियन
गायक  - जी. एन्‌. जोशी
संगीतकार - जी. एन्‌. जोशी
एकदा अमेरिकेत चीन,पाकिस्तानी आणि भारतीय यांना २०-२० चाबकाचे फटके
मारण्याची शिक्षा झाली. चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची
इच्छा विचारण्यात आली...

चायनीज - माझ्या पाठीवर ५ चादरी बांधा आणि मग मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...मात्र
५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीज ला पडले,
तो कोमात गेला.

आता पाकिस्तानी ची बारी..
पाकिस्तानी - माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात
पाकिस्तानी बेशुद्ध.

आता आपल्या भारतीय ची बारी होती,
अमेरिकन - तुझी इच्छा काय आहे..?
चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..
पण
आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा.
मी मनसोक्त रडून घेतो
घरात कोणी नसल्यावर,
मग सहज हसायला जमत
चारचौघात बसल्यावर

                 - चंद्रकांत गोखले
बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....??
.
गण्या :- दोघे पण .
.
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?
.
गण्या:- तरीपण दोघेच आवडतात
.
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....??
.
गण्या:- पॅरीस
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??
.
.
.
गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
.
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...??
.
गण्या:- लंडनला
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो
.
गण्या:- नाय , तस काय नाही ?
.
बाबा:- तर मग काय ?
.
गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार