मुलांच्या जिवनावश्यक गोष्टी

- अन्न , वस्र , निवारा.

.

.

मुलिँच्या जिवनावश्यक गोष्टी

- अन्न , वस्र , निवारा आणी … स्तुती

गुणी मुलगा

गंपू : माझा मुलगा एकदम गुणी आहे
बंडू : काय तो सिगारेट पितो ?
गंपू : नाही तो नाही पीत
बंडू : तो दारू पितो
गंपू : नाही कधीच नाही
बंडू :घरी रात्री उशिरा येतो का?
गंपू : नाही
बंडू : खरच
तुझा मुलगा खरच खूप गुणी आणि चांगला आहे..
तू नशिबवान आहेस मित्रा..
त्याचे वय किती आहे?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंपू : पुढच्या गुरुवारी तो सहा महिन्याचा होईल...
सखे तू अशी नेहमी
वेड लाऊन का जातेस
डोळे मिटले कि तू
स्वप्नात येऊन जातेस
८० %   मुलांकडे गर्लफ्रेंड असते आणि
 २० %  मुलांकडे असते.....................
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डोक !

लिलीची फुले

लिलीची फुले तिने
एकदा चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले....!

लिलीची फुले आता
कधीही पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!


कवी - पु. शि. रेगे

केवढे हे क्रौर्य!

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!


कवी - ना.वा.टिळक

काही बोलायाचे आहे, पण......



















काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही


गीतकार      - कुसुमाग्रज
गायक        - श्रीधर फडके
संगीतकार  - यशवंत देव