बदला

चिंगी : आज्जीच्या वाढदिवसाला तू तिला काय गिफ्ट देणार?

चंप्या : फुटबॉल.

चिंगी : फुटबॉल? आजी कधी फुटबॉल खेळते का?

चंप्या : मग, माझ्या वाढदिवसाला तिने मला भगवतगीता दिली होती....
चम्प्याच्या शाळेत फोटोसेशन होणार होतं..

त्यासाठी त्याच्या टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना देत होत्या..
“हे बघा.. उद्या सर्वांनी छान छान ड्रेस घालून यायचं..

म्हणजे काही वर्षांनी मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फोटो कडे बघाल..

तेव्हा म्हणाल..

‘तो बघा झंप्या.. आता डॉक्टर झालाय..;

ती बघा चिंगी.. आता हेरोईन झालीये..’…”

चम्प्या मध्येच बोलला,

“त्या बघा टीचर.. आता देवाघरी गेल्या..”

वेडा बाळू

"शाळेत नाही जाणार,
येतं मला रडू
आई मला शाळेत
नको ना धाडू!"

कोण बरं बोललं,
रडत हळूहळू
दुसरं कोण असणार?
हा आमचा बाळू.

आई मग म्हणाली:
शहाणा माझा राजा
शाळेत गेलास तर,
देईन तुला मजा.

घरी बसलास तर,
हुशार कसा होशील?
बाबांसारखा कसा,
इंग्लंडला जाशील?

आपला रामा गडी,
शाळेत नाही गेला
म्हणून भांडी घासावी,
लागतात ना त्याला?

तू कोण होणार?
डॉक्टर का गडी?
बाबांसारखी ऐटबाज
नको तुला गाडी?

मुसमुसत बोलला,
बाळू आमचा खुळा

"होईन मी गडी,
नको मला शाळा."

ताई

ताई म्हणे मोठी
आणि मी म्हणे लहान
जिथे तिथे जेव्हा तेव्हा
ताईचाच मान

नवीन पुस्तकं ताईला
पेन्सिल पण तिलाच
किती मोठी झाले तरी
मी लहान सदाच!

ताई सारखी मोठी होणार
नवे फ्रॉक तिला
"बरोब्बर" होतात म्हणे
जुने फ्रॉक मला

अस्सा अगदी राग येतो
पण उपयोग काय होणार?
अगदी म्हातारी झाले तरी
मी लहानच राहणार.

परी

परी असते गोरी
परी असते खरी
परीच्या गळयात असते
सोन्याची सरी

परी हासते गालात
परी नाचते तालात
परी अशी चालते
आपल्याच तोर्‍यात

परी असते इवली
चिमणीशी भावली
अंग तिचे मऊ जणू
साय असे लावली

काल मला दिसली
खिडकीमध्ये बसली
खरं सांगते परी
मला बघून हसली

मोठी झाली म्हणजे

मोठी झाले म्हणजे
होणार मी आई
मंडळात जायची
सारखी माझी घाई

मोठी झाले म्हणजे
मी बाई होणार
चष्म्यावरून अश्शी
रागानं पाहणार

मोठी झाले म्हणजे
होईन भाजीवाली

म्हणेन "घ्या हो घ्या हो.
ताजी भाजी आली."

मोठी झाली म्हणजे
बोहारीण मी होईन
नव्या छान भांडयांनी
पाटी माझी भरीन

नकोच पण मोठी व्हायला
लहानच मी राहणार
मोठेपणी सारखा सारखा
खाऊ कसा मिळणार?

ग्रहांचे युद्ध

एकदा चम्या चंद्राच्या नेवी मध्ये एक कॅप्टन असताना आपल्या जहाजावर फेरी मारत असतो
एक सैनिक पळत येतो आणि म्हणतो " गुरु ग्रहाचे म्हणजेच आपल्या शत्रूचे एक जहाज आपल्या दिशेने येत आहे "

चम्या : ओह , मग एक काम कर , आत जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये
सैनिक: ठीकेय
दोन जहाजांमध्ये तुफान लढाई होते आणि शेवटी चंद्र नेवी जिंकतात
सैनिक : अभिनंदन सर , पण हा लाल शर्ट का घातला तुम्ही ?
चम्या : जर मला गोळी लागली असती तर माझे रक्त बघून माझ्या सैनिकांचा आत्मविश्वास नाहीसा झाला असता ,ते होऊ नये म्हणून.

तेवढ्या एक सैनिक पळत येतो आणि म्हणतो " मंगळ ग्रहावरून शत्रूची ५० जहाजे आपल्या दिशेने येत आहेत"
चम्या : मग आता एक काम कर आत जा आणि माझी पिवळी प्यांट घेऊन ये !!