गैरसमज

बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.

नवरा : नाही ग.

बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.

नवरा : तुझा गैरसमज आहे.

बायको : काय, कोणता गैरसमज ?

नवरा : मी झोपलो होतो.

बायकोच्या माहेरी

बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!

१३ आणि अंधश्रद्धा

चोर १ : अरे बापरे पोलीस चल उडी मार खाली.

चोर २ : पण हा १३ वा मजला आहे.

चोर १ : वेड्या अंधश्रद्धा उफाळून यायची ही वेळ नव्हे. कळलं. मार उडी.
तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!

पक्का मारवाडी

एकदा एक मारवाडी रेल्वेने प्रवास करत होता. गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस येऊन बसला. काही वेळाने त्या चिनी माणसाला एक डास चावायला लागला. त्याने तो डास मारला व खाऊन टाकला.


थोड्या वेळाने त्या मारवाडी माणसाच्या हातावर पण एक डास बसला. मारवाड्याने तो डास पकडला व त्या चिनी माणसाला विचारले," विकत घेतोस का ?"

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं|

हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं||

नही वार्‍यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं|

नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं||

पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं|

नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं||

निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं|

आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं||

ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं|

धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं||

येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं|

केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं||

नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं|

जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं||

अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं|

इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं||

दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं|

जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं||

इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं|

जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं||

ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं|

त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं||


- बहिणाबाई चौधरी

करोडपती

निलेश- अरे मला जी मुलगी आवडत होती तिने माझ्याशी लग्न नाही केल रे ...

गौरव - अस का झालं ? पण तू सांगायचं ना कि तुझे काका करोडपती आहेत ते ...

निलेश - सांगितलं ना ... चालू निघाली रे ती, तिने काकाशीच लग्न केलं..