आश्चर्यच आहे एकही अक्षर
नाही माझ्या वहीवर
कुठे गेले ते शब्द सगळे
जे मी लिहिले होते वहीवर
हे कुठले काळे ढग
आले माझ्या समोर
छोटी छोटी निरपराध मुले
झोपळी आहेत रस्त्यावर
चुक नसूनही अपघातात
एक निशप्राणझालेआहे कलेवर
असह्य आजाराने त्रस्त असे
कितीतरी आहेत सभोवार
एक वेळच्या अन्नासाठी
विकण्याची पाळी आली एका युवतीवर
सांगा ना हे लिहिताना
यातना होत नसतील; माझ्या शब्दाना
का राहतील मग ते माझ्या वहीवर
बघून सगळे येई त्यानाही अन्धारुन
कविता बोडस