देवाची देणगी- पाकिस्तान

एकदा ब्रम्हदेव आपल्या सर्व दूतांना व कर्मचार्‍यांना एका बैठकित सांगत होते," हे बघा, आपल्याला काही चांगले निर्माण करायचे असेल तर तेथेच काहीतरी वाईट पण द्यावे. म्हणजे त्या क्षेत्रात संतुलन कायम रहाते. सर्व कामे अशी करायची कि कोठेही संतुलन बिघडता कामा नये.
थोडे थांबुन देव म्हणाले," कुणाला काही अडचण ? माझे म्हणणे कुणाला कळले नसेल तर विचारा मी माझ्या म्हणण्य़ाचे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे."
काही वेळाने एक देवदूत ऊभा राहिला व देवाला म्हणाला,"देवा आपले म्हणणे कळले पण आपण एखादे उदाहरण द्याल का ?"
ब्रम्हदेव म्हणाले," हे बघा मी अमेरिकेला सर्व काही दिले आहे. तेथील लोकांना मी भरभरुन श्रीमंती दिली, मजा करायला बरिच ठिकाणे दिली पण त्यांना भितीही दिली. त्यांना कायम भिती वाटत असते."
दूसरा देवदूत म्हणाला, " देवा अजुन एक उदाहरण द्याना."
ब्रम्हदेव म्हणाले," मी अफ्रिकेला निसर्गाचे दान भरभरुन दिले पण त्यासोबतच गरिबीही दिली."
तर तिसरा देवदूत म्हणाला," देवा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, आपण सर्वच ठिकाणी असे संतुलन सांभाळत नाही. आता बघाना भारताला निसर्गाचे दान दिले, समॄद्धि दिली, श्रीमंती दिली व कुठेच काही कमी दिसत नाही."
देव म्हणाले," होय तेथेही मी संतुलन कायम राखले आहे. त्यांना शेजारी मी पाकिस्तान दिलाय ना."

ट्रेनर

एका प्रसिद्ध मासिकासाठी काम करणार्‍या फोटोग्राफरला एकदा जंगलात लागलेल्या आगीचा चांगला फोटो काढायचा होता. त्याने बराच प्रयत्न केल्यावरही चांगला फोटो मिळेना, प्रत्येक फोटोत आग दिसण्या ऎवजी धुरच दिसायचा, तेंव्हा त्याने आपल्या संपादकांना फोनवरुन कळवले कि जंगलात आग लागली आहे व आगीचा फोटो विमानातुनच काढणे शक्य आहे तर लौकरात लौकर विमानाची व्यवस्था करा.
संपादक म्हणाले लगेच करतो तु विमानतळावर जा.
फोटोग्राफरला घाई झाल्याने त्याने विमानतळावर पोहोचल्यावर सोपस्कार पूर्ण केले व एका लहान विमानात जाऊन बसला व पायलटच्या जागेवर बसलेल्याला म्हणाला चल लगेच उडूया.
पायलटने विमान आकाशात नेल्यावर त्यांनी आगीच्या दिशेने ते वळवले.
फोटोग्राफर म्हणाल चल आता विमान जरा खाली घेऊन ३ ते ४ फेर्‍या मार.
पायलट म्हणाला," का ?"
फोटोग्राफर," मी फोटोग्राफर आहे, मला या आगीचे जवळून फोटो काढायचे आहेत."
"अरे बापरे, मला वाटले तुम्ही नविन ट्रेनर आहात व मला आज विमान कसे उतरवायचे हे शिकवणार आहात.",
पर्यटक म्युझियममध्ये फिरत असतात.

पर्यटक : हा कोणाचा सांगाड आहे?

गाइड : हा या भागातल्या राजाचा सांगाडा आहे.

पर्यटक : आणि हा लहान सांगाडा कोणाचा आहे?

गाइड : तो राजा लहान असतानाचा सांगाडा आहे!
पार्टी ऐन रंगात आलेली असते. गंपू एका खुर्चीत बसून बघत असतो. तेवढ्यात डान्सफ्लोअरवरची एक सुंदर मुलगी त्याच्याकडे येऊन विचारते, काय डान्स करणार का?

गंपू : हो!
मुलगी : ठीक आहे, मग तुझी खुर्ची मला दे!!
पत्नी : (रागाने) मी आपल्या ड्रायव्हरला नोकरीवरुन काढून टाकणार आहे. आज तिस-यांदा मी मरता-मरता वाचलेय.

पती : अं...मला वाटतं आपण त्याला आणखी एक चान्स द्यायला हवा.
वडील : तुला यंदा ९५ टक्के मिळाले पाहिजेत.
मुलगा : ९५ काय, १०५ टक्के मिळवून दाखवतो.
वडील : मस्करी करतोस काय?
मुलगा : सुरुवात कोणी केली!!
शिक्षक : शहामृगाची मान लांब का असते?

विद्यार्थी : कारण त्याचं डोकं आणि शरीर याच्यामध्ये खूप अंतर असतं. त्यामुळे त्यांना जोडण्यासाठी त्याची मान पण लांब असते.