राहूनच गेलं...

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.


तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.


हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.

ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...
सरदार सांतासिंग ज्योतिषाला :माझे लग्न कधी होणार ?"

ज्योतिषी : तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही."

सांता : कां ?

ज्योतिषी : अरे तुझ्या नशिबात अपार सुख लिहीलय !
बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.
त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.
त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले," जाहिरातीत छापा "बळवंतराव आज सकाळी अचानक गेले."
पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा.
बायको म्हणाली, तर छापा,"बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे."

कोलंबसची मराठी बायको

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला


नसता... कारण बायकोने विचारले असते...

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

... काय शोधायला जाताय?

इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मी पण येऊ का?

कोलंबस: जाउ दे नाही जात...

आयला आयटम

मराठीचा वर्ग सुरू होता
बाईंनी वाक्य सांगितलं,
' समोरून एक खूप सुंदर मुलगी येते आहे.'
या वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा.'
हात वर करून विन्या लगेच उद्गारला,
' आयला आयटम!!!'
परीक्षेच्या निकालानंतर:
जर चांगले गुण मिळून पास झाला तर…

शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा
...बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच ...
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि...

जर नापास झाला तर….
शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस .

पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच....

सगळे बदलतात पण मित्र नाही.
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते....

नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक
.
....
.
.
.
.
.
.
.
बायको : अय्या !!!!
सासूबाई !!!!!