दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत होत्या. बराच वेळानंतर चम्या आला व म्हणाला," तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल."
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.आणि ती एक सीट रिकामीच राहिली !
एका आरोपीला कोर्टात २ खुनांच्या आरोपात हजर केले जाते...

जज : तूम्ही तूमच्या बायकोला हातोड्याने मारल्याचा आरोप तुमच्यावर आहे..

(पब्लिकमधून आवाज येतो, "हरामखोर...")

जज: (दुर्लक्ष करून) तसेच तूमच्या सासूला सुद्धा तूम्ही हातोड्याने मारून निर्घृण हत्या केली आहे...

(पुन्हा मागून आवाज येतो, "अरे दगाबाज साल्या....")

जज: (त्याच्याकडे पाहून) हे पहा तुमचा राग मी समजू शकतो... पण तूम्ही असे कोर्टात ओरडू शकत नाही.. अथवा मला तुमच्यावर पण खटला भरावा लागेल... मी ह्या आरोप्याला योग्य ती शिक्षा देणार आहे. तूम्ही कृपया शांत रहा...

तो ओरडणारा माणूस: अहो तस नाही ओ, मी ह्याचा शेजारी आहे आणि आत्तापर्यंत ३-४ वेळा ह्याच्याकडे हातोडा मागितला... आणि हा हरामखोर माझ्याकडे नाहीये अस बोलला...

सांग आठवतोय ना तुला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....

..... सांग आठवशील ना मला ?



सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?


कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?

अवघड वळणावरचा वेडा बहाणा


तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला

तुजवर रचलेल्या कवितांमधून


जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?

राहूनच गेलं...

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.


तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.


हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.

ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...
सरदार सांतासिंग ज्योतिषाला :माझे लग्न कधी होणार ?"

ज्योतिषी : तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही."

सांता : कां ?

ज्योतिषी : अरे तुझ्या नशिबात अपार सुख लिहीलय !
बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.
त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.
त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले," जाहिरातीत छापा "बळवंतराव आज सकाळी अचानक गेले."
पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा.
बायको म्हणाली, तर छापा,"बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे."

कोलंबसची मराठी बायको

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला


नसता... कारण बायकोने विचारले असते...

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

... काय शोधायला जाताय?

इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मी पण येऊ का?

कोलंबस: जाउ दे नाही जात...