एक परदेशात कामाला असलेला मुलगा स्थळं बघण्यासाठी भारतात आलेला असतो.
कांदे-पोह्यांच् या कार्यक्रमासाठी तो आणि आई-बाबा एका मुलीच्या घरी येतात.
औपचारिक गप्पा-टप्पा झाल्यावर मुलाला आणि मुलीला जरा ओळख वाढावी यासाठी बाल्कनीत एकांतात पाठवतात.
मग असेच १-२ प्रश्न-उत्तरे झाल्यावर मुलगा विचारतो , "इंग्लिश जमते का ? "
.
.
.
.
.
.
.
मुलगी - हो ,पण सोड्याबरोबर
झंप्या : मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकणार

गर्लफ्रेंड : का ?

झंप्या : घरचे विरोध करत आहेत.

गर्लफ्रेंड - घरी कोण कोण आहे?

झंप्या : बायको आणि २ मुले
एकदा एक सरदार मरण पावला.

त्याच्या अंत्यविधीची सर्व तयारी झाली. बॅंड बोलावण्यात आला. घरुन निघाल्यावर अंत्ययात्रेत सर्व बॅंडच्या तालावर नाचू लागले. भांगडा करु लागले.

रस्त्याने बघणारे नवल करत होते कि अशी अंत्ययात्रा कधी बघितली नाही.
...
राजाभाऊंनी एका सरदाराला बाजूला घेऊन विचारले," अरे ही अंत्ययात्रा असताना तुम्ही लोक असे का नाचताहात ?"

सरदार म्हणाला," पहिल्यांदाच कुणी सरदार ब्रेन ट्युमरने मेला, आता कोणी म्हणणार नाही सरदारांना ब्रेन नसते." आणी तो परत नाचायला लागला.
चम्या : माझे स्वप्न आहे मी माझ्या वडिलांसारखच महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.

पम्या : तुझे बाबा महिन्याला ५००००० रुपये कमावतात ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चम्या : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे कि महिन्याला ५००००० रुपये कमवावेत !
मिथुन चक्रवर्ती ला जर

दोन मुले असतील तर त्यांची नावे काय आहेत?

.

.

.

.

इथुन आणि तिथुन !!!
ज्या मुलाच्या वडिलांना ४ बहिणी आहेत, त्या मुलाचे नाव काय?
.

.

.

.

.
आत्याचार....!!!

बोलणारे घड्याल

एक बेवडा मध्यरात्री मित्राबरोबर घरी येतो,
भिंतीवर एक घड्याळाच चित्र
काढलं होत.

मित्र : अरे तू हे घड्याळाच चित्र का काढलं आहेस ?

बेवडा : अरे ते नुसत चित्र नाहीये, त्यातून आवाज येतो.
बघ आता.
बेवडा जमिनीवर
पडलेला हातोडा घेतो आणि त्या चित्रावर जोरात
मारतो.
.
.
.
.
.
.
शेजारच्या घरातून आवाज येतो, ए बेवड्या पहाटेच ३
वाजलेत, झोप आता.

बेवडा : बघ, तुला बोललो होतो ना.