बडबड-गीत


ससोबा साजरे
खातात गाजरे
या की जवळ
भारी तुम्ही लाजरे



कावळोबा काळे
फिरवता डोळे
लावा बुवा तुमच्या
तोंडाला टाळे






चिमुताई चळवळे
इथे पळे तिथे पळे
बसा एका जागी
पायात आले गोळे
मिठूमिया मिरवे
अंग कसे हिरवे
सारखे काय तेच
बोला की नवे


गाडी

घडाडधड खड खड खड
झुक झुक गाडी चालली
दोहीकडे झाडं पहा
कशी पळू लागली

खडाडखड धड धड धड
किती हिची गडबड
गप्प बसणं माहीत नाही
सारखी हिची धडपड

सों सों सों सों वारा येतो
डोळयात जाते धूळ
वेडयासारखी पळत सुटते
लागलंय हिला खूळ

दंगा करीत शिट्टया फुंकीत
गाडी सुटते पळत
तरी हिला मुळीच कसा
मार नाही मिळत?

साबणाचे फुगे



जादूची बाटली
त्याच्यात पाणी
फुगे आत
ठेवले कोणी?

काडीवर बसून
बाहेर येतात
रंगीत झगे
बघा घालता

वार्‍यावरती
होतात स्वार
किती मजेचे
रंगतदार

हात लावता
फट्ट फुटले
बघता बघता
कुठे पळाले?

जिराफदादा जिराफदादा
खरंच का रे
उंच मान करून
मोजतोस तारे?

द्वाडपणा केलास
बाप्पानं धरला कान
म्हणून का उंटदादा
वाकडी झाली मान?

चित्तेदादा चित्तेदादा
काळे डाग कसे
शाईने अंगावर
पाडलेस का ठसे?

चिऊताई

चिऊताई चिऊताई
चिंव चिंव चिंव

मी पुढे पळते
तू मला शिव

टुण टुण टुण
चल मार उडी

चल आपण खेळू
दोघी फुगडी

भुर्र भुर्र भुर्र
उडून नको जाऊ

चल ये खेळू
देते तुला खाऊ

लवकर उठ
बघ आली माऊ

पटकन पळ
तुझाच होईल खाऊ


माकडदादा माकडदादा
हूप हूप हूप
उडया चला मारुया
खूप खूप खूप
ससेभाऊ ससेभाऊ
पैज लावू चला
पहा कसा धावतो
हरवा पाहू मला!

बेडूकराव बेडूकराव
नका मारू बुडी
तुमच्याहून बघा
लांब मारीन उडी
हसता काय सारे
मारीत नाही गप्पा
दुध पितो म्हणून
जोर देतो बाप्पा

कवियत्री: माधुरी भिडे

रिस्क

एक आंधळा माणूस बारमध्ये पिऊन टून्न झाल्यानंतर टेबलवर थाप देवून जोरात ओरडला, '' सरदारजीचा जोक कुणाला ऐकायचा आहे?''

त्याच्याजवळ आठ दहा जण जमा झाले.

त्याच्या कानाशी कुणीतरी जावून हळू आवाजात म्हणालं, '' जोक सांगण्याच्या आधी तूला काही गोष्टी माहित असायला हव्यात''

'' कोणत्या?''

'' की या बारचा मालक आणि बारचे दोन नोकर सरदारजी आहेत, मीही सरदारजी आहे, एवढच नाही तर माझ्या उजव्या बाजुला उभा असलेला पावने सहा फुट उंच दिडशे किलो वजन असलेला ग्राहक सरदारजी आहे, आणि माझ्या डाव्या बाजूला उभा असलेला ग्राहक सहा फुट उंच, दोनशे किलो वजन असलेला बॉडीबिल्डर पहिलवान ग्राहकही सरदार आहे...म्हणजे आम्ही सहा-सहा जण इथे सरदार आहोत... आता तू ठरव की तरीही तुला जोक सांगायचा आहे का? ''

तो आंधळा मनुष्य म्हणाला, '' मला वाटते तोच तोच जोक सहा-सहा वेळ समजावून सांगण्यापेक्षा न सांगितलेला केव्हाही बरा''