अबीर गुलाल

अबीर गुलाल उधळीत रंग |
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥

उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥

वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥


  -  संत चोखामेळा

जीवन

अस का बर हे जीवन असत
जे आपल असत ते आपल कधीच नसत
आणि जे आपल नसत तेच गळ्यात पडत
कितीही रडलो तरीही जीवन मात्र पुढेच सरत.

वाटल न्हवत

वाटल न्हवत तू इतकी बदलशील
इतक्या लवकर मजला विसरशील
स्वप्न सजवली होती आपण दोघांनी मिळून
वाटल न्हवत, जाताना केवळ आठवणीच ठेऊन जाशील.....!!
आयुष्यात तू नाही आता
भासात तुला शोधतो आहे
तू जवळ नसलीस तरी
विरहावर तुझ्या मी प्रेम करतो आहे !!
का शोधू मी तुला, हरवलेली नसताना,
भरून येते मन तुला शब्दात पाहताना,
दूर गेल्याचा त्रास आहेच खर जास्त,
पण या वरही विरजण पडते तुझे हास्य स्मरताना!!

क्षणिक मैत्री

कधीतरी तू हि समजून सांग मनाला
मैत्री कधीच क्षणिक नसते,
क्षणिक असतो तो भास अपुल्यांचा
शेवटी,जसे आलो एकले,तसे एकलेच जायचे असते...

आई

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!