खतरनाक पीजे

असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो.....?
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
म्हातारा....
एकदा एक शहरातील मुलगी शिक्षिका होते .आणि तिची पोस्टिंग
खेडागाव मधील मराठी शाळे मध्ये होते .शाळेमध्ये पहिल्या दिवशी
ती विद्यार्थ्यांना आपली ओळख करून देते. मी आज पासून तुमची
नवीन शिक्षिका आहे,मी तुम्हाला मराठी हा विषय
शिकवणार आहे . वगेरे वगेरे .स्वतःची ओळख
करून दिल्या वर ती शिक्षिका मुलांना उभे
राहून स्वतःचे नाव सांगा असे सांगते .मग
एक मुलगा उभा राहतो आणि सांगतो की बाई
माजे नाव पांडू आहे .बाई लगेच म्हणतात अरे
स्वतःचे नाव " पांडू" असे नाही सांगायचे,
"पांडुरंग" असे सांगायचे .मग तो मुलगा बाई
ला सांगतो की बाई मला सगळेच "पांडू"
म्हणून हाक मारतात. तर बाई लगेच
सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतात की, "
मुलानो आज पासून पांडू ला पांडुरंग
या नावाने हाक मारायची ".सगळी मुले
एका सुरात, "हो बाई" असे म्हणतात .मग
बाई पांडुरंग ला खाली बसवतात
आणि दुसऱ्या मुलाला विचारतात तुजे नाव
काय? .तो मुलगा "बाई माजे नाव बंडूरंग
आहे ".

एका स्त्रीचा स्वर्ग

बाळ माझं बघ कसं.....दुधासाठी रडतंय,
बोबड्या त्याचा शब्दात....माझ्यासाठी हंबरडा फोडतंय,

दारातली तुळस बघ माझ्या....कशी माझ्याविन सुकलीय,
तिला पाणी नाही घातलं....तिची फांदिही झुकलीय,

लेक माझी बघ....दारात माझी वाट बघत बसलीय,
गुणाची आहे रे पोर माझी....दारात एकटीच रुसलीय.

बछडा माझा......आता शाळेतून येईल,
"आई कुठे गेली??"..विचारत....घर डोक्यावर घेईल...

नवरा माझा भोळा आता दमून भागून येणार,
दमला असेल रे तो.....त्याला पाणी कोण देणार?

गाय माझी बघ कशी....गोठ्यात चाऱ्याविन उभी,
माज्यावीन ती चारा खात नाही रे कधी....

संसार माझा मी थोडा सावरून....आवरून येते,
भेटणार नाहीत पुन्हा....माझ्या लेकरांचा मुका घेऊन येते.
नवऱ्याचे माझ्या....माझ्यावर खुप खूप प्रेम रे....
माझंही त्याच्यावरचे प्रेम त्यांना सांगून येते.....

सोड रे देवा मला ....थोडा वेळ जाउ दे,
कांदाभाकर माझ्या माणसांसोबत खाऊ दे,
तुझा स्वर्ग नको......मला माझ्या स्वर्गात राहू दे.

चिउताई

गरीब,मध्यमवर्गीय आणि श्रीमंत

गरीब माणुस दारु पितो,

मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर

श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!



काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,

काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर

काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!



गरीब माणुस करतो ते लफडं,

मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम,
तर

श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!

"ड्राय डे" ,"पुतळे" व "आचारसंहिता"

विद्यार्थी : सर ड्राय डे म्हणजे काय?

मास्तर : कोरडे दिवस.

विद्यार्थी : विस्कटून विस्कटून सांगा सर.

मास्तर : या दिवशी दारूची दुकाने बंद असतात.

विद्यार्थी : का सर?

मास्तर : अरे आपल्याला महापुरुषांची आठवण व्हावी असा शासनाचा यामागचा उद्देश आहे.

विद्यार्थी : मग सर एकतीस डिसेंबरला विशेष परवाने देऊन सरकार उत्तेजन का देतं?

मास्तर : लोकांनी नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत करावं म्हणून.

विद्यार्थी : म्हणजे आनंदासाठी पिण्यास हरकत नाही असंच ना?

मास्तर : हो तसंच.

विद्यार्थी : मग सर, स्वातंत्र्य दिनी, प्रजासत्ताक दिनी जनतेला दु:ख होत असतं का?

मास्तर : ...........

विद्यार्थी : दु:खामुळे ड्राय डे असतो का?

मास्तर : ...........

विद्यार्थी : बोला ना सर.

मास्तर : हा तुझा विषय नाही. तू पीत नाहीस ना? मग गप्प बस.

विद्यार्थी : पण सर, तीस जानेवारीला दु:खामुळे तर दोन ऑक्टोबरला आनंदामुळे ड्राय डे, असं असतं का?

मास्तर : तसं नाही बाबा. थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला त्यांची आठवण राहावी म्हणून ड्राय डे असतो.

विद्यार्थी : सर, ड्राय डेच्या दिवशी महापुरुषांची आठवण येते हे भन्नाट आहे. पण अगोदर सवय लागली पाहिजे. ना?

मास्तर : तोच तर सरकारचा उद्देश आहे.

विद्यार्थी : म्हणजे... जाणून बुजून शासनाने लोकांना दारूबाज केले.

ड्राय डेमुळे तर कळले, महात्मा गांधी आज गेले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

पुतळे

विद्यार्थी : सर देव जळी-स्थळी-पाषाणी आहे ना?

मास्तर : हो.

विद्यार्थी : मग सर दारूची दुकानं मंदिरापासून पंचाहत्तर मीटर दूर का ठेवतात?

विद्यार्थी : देवाला पंचाहत्तर मीटर पलीकडचं दिसत नाही का?

मास्तर : तसं नाही रे बाळा. मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे.

विद्यार्थी : पण काही देवांना दारूचा नैवेद्य लागतो.

मास्तर : तुझं सामान्य ज्ञान बरंच बरं दिसतंय.

विद्यार्थी : देवाचं सोडा, पण राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासमोरही वाईन शॉपला बंदी आहे.

मास्तर : हो. बरोबरच आहे ते.

विद्यार्थी : पण सर एखादा राष्ट्रपुरुष पिणारा असेल तर?

विद्यार्थी : सांगा ना सर, वाईन शॉप बंद केल्यास त्या पुतळ्यास काय वाटेल?

मास्तर : राष्ट्रपुरुष तसे नसतात रे.

विद्यार्थी : सर, आजकालचे बहुतेक आमदार-खासदार तर घेणारेच आहेत. ह्यांच्यापैकीच काहीजण उद्याचे राष्ट्रपुरुष असणार. त्यांचे पुतळे होणार. समोर वाईन शॉप नसेल तर त्या पुतळ्यांना काय वाटेल सर?

विद्यार्थी : बोला ना सर...

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

आचारसंहिता

विद्यार्थी : सर आचारसंहिता म्हंजी काय?

मास्तर : अरे, निवडणुकीत पाळायचा आचार-विचार.

विद्यार्थी : तसं नाही, विस्कटून विस्कटून सांगा.

मास्तर : अरे बाबा, मतदारांना उमेदवाराने किंवा पक्षाने प्रलोभने दाखवू नयेत यासाठी काही नियम केलेले असतात.

विद्यार्थी : पण सर, पुतळ्यांना-फोटोंना का झाकलं जातं?

मास्तर : गांधी, नेहरू, फुले, आंबेडकर यांच्या चित्रांचा वापर करू नये म्हणून.

विद्यार्थी : पण सर, मतदानाच्या ठिकाणी महापुरुषांची चित्रंसुद्धा झाकली जातात.

मास्तर : हो, त्यांचा परिणाम होऊ नये म्हणून.

विद्यार्थी : सर, महापुरुषांचा वाईट परिणाम होतो?

विद्यार्थी : बोला ना सर, महापुरुष का झाकतात?

विद्यार्थी : सर हत्ती झाकले, कमळ झाकलं, पण हाताचं काय करणार?

विद्यार्थी : सर एक आयडिया. उमेदवाराला सत्यनारायण घालायला सांगा. मतदार आपोआप घरी येतील.

मास्तर : हुशार आहेस!

विद्यार्थी : आणखी एक आयडिया सर...

मास्तर : बोल बाळा.

विद्यार्थी : मतदाराने स्वत:चेच तळहात पाहिले तर त्याचा त्याच्या मनावर परिणाम होईल आणि तो काँग्रेसला मत देईल. त्यामुळे प्रत्येक मतदाराला हातमोजे दिले तर?..

ह्या पोराला 'वाह्यात म्हणावं की विचारवंत' हे गुरुजींना कळेना. तरी नवीन शैक्षणिक धोरणानुसार उत्तर देणं भाग होतं. 'मतदारांना हातमोजे वाटण्याची विनंती आयुक्तांना करू', असं पुटपुटत गुरुजींनी चष्म्याची काच पुसली. पुटपुटत पुटपुटत आपण वाईन शॉपजवळ कधी आलो, ते त्यांचं त्यांना कळलंच नाही.

ड्राय डेमुळेच 'पूर्वनियोजित साठा' करण्याची सवय महाराष्ट्रात वाढू लागली होती. गुरुजींनाही रात्री 'टीचर्स'ची संगत जडली होती. सहाव्या वेतनामुळे मुलेही गुरुजींना गुरुजी न म्हणता 'सर' म्हणू लागली होती. सहाव्या वेतनाचा मान राखण्यासाठीच गुरुजींनी 'देशी'पण सोडलं होतं. ते दिवसाचे 'सर' आणि रात्री 'टीचर्स'झाले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या आनंदासाठी एक, तीस जानेवारीच्या पुण्यतिथीच्या दु:खासाठी एक आणि निवडणुकीच्या गोंधळासाठी एक असा पूर्वनियोजित साठा घेऊन गुरुजी घराकडे वळले.

खर प्रेम

तीन प्रकारची माणसं गप्पा मारत असतात...

आशियायी माणुस :- आमच्या इथे बायको पण असते आणि गर्लफ्रेण्ठ पण असते. पण आम्ही बायकोवरच जास्त प्रेम करतो..

अमेरिकन माणुस :- आमच्या इकडे आम्हाला बायको पण असते आणि गर्लफ्रेण्ड पण असते
पण आम्ही गर्लफ्रेण्डवरच जास्त प्रेम करतो...

अरेबीयन माणुस :- आम्हाला तर 10-15बायका अन् 5-10 गर्लफ्रेण्ड असतात पण एवढे असुनदेखील आम्ही उंटावरच जास्त प्रेम करतो.