कळी उमाळण्याच्या आशेत वेडा चंद्र रात्रभर जागा होता,
कळी उमाळनार असा त्याचा विश्वास होता,
पहाट झाली, कळी उमळली,
पण हे पाहण्यास वेडा चंद्र कुठे होता???
मुलगा : जान मी हात सोडुन गाडी चालऊ का ?
मुलगी : नको रे,
आपण पडु ना मग..
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मग माझा शेंबुड पुस, तोंडात चाललाय..
एक दुधवाला रस्त्याने त्याच्या गाडीवरुन चाललेला असतो........तर तो अचानक त्याच्याजवळ असलेले सगळे दुध पिऊन टाकतो !!!!!!

का ?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण मागुन एक कार हॉर्न वाजवत असते.......(पी पी पी पी)....

खटारा गाडी

रम्या चम्यासमोर आपल्या अफाट श्रीमंतीचे गोडवे गात असतो.

रम्या : अरे, सकाळीसकाळी मी कार घेऊन बाहेर पडलो, तरी संध्याकाळपर्यंत माझी अर्धी प्रॉपटीर्ही पाहून होत नाही.

चम्या : मग त्यात काय? तशी खटारा गाडी माझ्याकडे पण आहे.

प्रेमाचे राजकारण

सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की,
कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत..
आणि, ती मुलाकडे पाहून हसली की,
त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत..
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की,
" मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत
आणि, लग्नाला एक वर्ष झाल की, मग,
" आदर्श घोटाळl " केल्यासारख वाटत !!!

कुणीतरी असलं पाहिजे…

कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…

मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…

इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू
नकोस”
असं बजावायला…

उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला…
एका महानगरात
नौकरी गमावलेला एक तरुण
सिटीबस मधून उतरतो,
तेव्हा त्याच्या लक्षात येते
की त्याचे पाकीट चोराने
लांबवले. तो तरुण बुचकळ्यात पडतो.
कारण
त्याची नौकरी गेलेली असते
आणि खिशात फक्त १५० रुपये
आणि त्याने
त्याच्या आईला लिहून ठेवलेले एक पत्र असते.
ज्यात त्याने लिहिलेले असते
की ,"माझी नौकरी मी गमावून
बसलो आणि तुला आता काही दिवस
पैसे पाठवू शकत नाही."
तीन दिवसापासून ते पत्र त्याच्या खिशात असते. पोस्ट
करू
की नाही ह्या मनस्थितीतच
त्याचे १५० रुपये आणि ते पत्र
चोरी होते.
१५० रुपये काही फार मोठी रक्कम नाही, पण
त्या तरुणासाठी ते १५००
रुपयापेक्षा कमी नव्हते.
काही दिवसांनी त्याच्या आईचे
पत्र त्याला मिळाले. तो तरुण
आपल्या आईचे पत्र वाचून आश्चर्यचकित होतो.
त्याची आई ने पत्रात लिहिले
असते - "बाळ, तु पाठवलेले ५००
रुपयांचे मनीऑर्डर
मला मिळाले. काळजी घे
स्वतःची." तो तरुण जाम बुचकळ्यात पडतो.
त्याला प्रश्न पडतो,
कोणी ५०० ची मनीऑर्डर
केली असेल. काही दिवसांनी परत
त्याला एक पत्र येते,
तोडक्या मोडक्या अक्षरात
लिहिलेले, वाचण्यास अवघड पण
३ ते ४ ओळीचे -
“प्रिय भाई, 150 रुपए तुम्हारे.. और 350 रुपए
अपनी ओर से मिलाकर
मैंने तुम्हारी माँ को..
मनीआर्डर.. भेज दिया है..।
फिकर.. न करना।
माँ तो सबकी.. एक- जैसी ही होती है न..!
वह क्यों भूखी रहे...?

तुम्हारा
— जेबकतरा भाई..!!!!!...