बोलतो ते चूक आहे की बरोबर?
मी बरोबर वा खरोखर ती बरोबर?
काय डोळ्यांतून माझ्या दोष आहे ?
कोणताही रंग का नाही बरोबर?
बांध तू ताईत स्वप्नांच्या उद्याच्या
राख थोडी राहू दे माझी बरोबर
प्रश्न माझे अडचणीचे एवढे की
उत्तरे सांगू नये कोणी बरोबर
काळजी घे ! चांदण्याचा झोतसुद्धा
सौम्य कांतीला तुझ्या नाही बरोबर!
चुक तू होतीस हे शाबित होता
काय कळुनी फायदा की मी बरोबर !!
-संदीप खरे
कानाने आंधळा
एका दरोडेखोराने एका घरात डाका टाकला. घरातले सगळे पैसे दागिने एकाजागी जमा केले आणि घरमालकासमोर सुरा काढत म्हणाला.
'' चल सांग अजुन कुठे आहे तुझ्या घरात माल नाहीतर या सुऱ्याने तुझे कानच कापतो''
घरमालक म्हणाला , '' साहेब रहम करा पण माझे कान कापू नका... नाहितर मी आंधळा होईन ''
'' आंधळा?'' दरोडेखोर आश्चर्याने म्हणाला, '' कान कापल्यावर जास्तीत जास्त बहिरा होशील... आंधळा कसा काय होशील?''
'' साहेब.... कान कापल्यावर मी माझा चष्मा कसा लावू?'' घरमालक म्हणाला.

जीन्स वर टिकली
सासू: किती वेळा सांगितले बाहेर जाताना टिकली
लावत जा..
सून: जीन्स वर कोणी टिकली नाही लावत अहो..
सासू: अग जीन्स वर नाही.. कपाळावर लाव..
लावत जा..
सून: जीन्स वर कोणी टिकली नाही लावत अहो..
सासू: अग जीन्स वर नाही.. कपाळावर लाव..
पैल तो गे काऊ कोकताहे
पैल तो गे काऊ कोकताहे |
शकुन गे माये सांगताहे || १ ||
उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ |
पाहुणे पंढरीरावो घर कै येती || २ ||
दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी |
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी || ३ ||
दुधे भरुनी वाटी लावीन तुझे वोठी |
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी || ४ ||
आंबया डाहाळी फळे चुंबी रसाळी |
आजिचे रे काळी शकुन सांगे || ५ ||
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे |
भेटती पंढरीराये शकून संगे || ६ ||
-संत ज्ञानेश्वर

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)