रंगा येई वो येई, रंगा येई वो येई

रंगा येई वो येई, रंगा येई वो येई |
विठाई किटायी माझे कृष्णाई कान्हाई || १ ||

वैकुन्ठ्वासिनी विठाई जगत्र जननी |
तुझा वेधू माझे मनी || २ ||

कटी कर विराजित मुगुट रत्न जडित |
पितांबरू कासिला तैसा येऊ का धावत || ३ ||

विश्व-रूपे-विश्वं-भरे कमाल-नयने कमलाकरे वो |
तुझे ध्यान लागो बाप राखुमादेविवारे वो || ४ ||

-संत ज्ञानेश्वर

देणार्याने देत जावे

देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !

कवी - विंदा करंदीकर
बायको - अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे.

नवरा - कशावरून???

.
....
.
.
.
.
बायको - अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये.
शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर
शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा
थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले,

'' महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?''
...
'' अगं काही नाही ... हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता''

साईनाथ आरती

जोडूनिया कर चरणी ठेविला माथा ।
परिसावी विनंती माझी सदगुरुनाथा ।। १ ॥

असो नसो भाव आलो तुझिया ठाया ।
कृपादॄष्टी पाहे मजकडे सदगुरूराया ॥ २ ॥

अखंडित असावे ऐसे वाटते पायी ।
सांडूनी संकोच ठाव थोडासा देई ॥ ३ ॥

तुका म्हणे देवा माझी वेदीवाकुडी ।
नामे भवपाश हाती आपुल्या तोडी । ४ ॥

रचनाकर्ता-जगद्गुरू तुकाराम महाराज

तरुतळी

त्या तरुतळी विसरले गीत
हृदय रिकामे घेऊन फिरतो
इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना
स्वरातूनी चमकते वेदना
तप्तरणे तुडिवत हिंडतो
ती छाया आठवीत

विशाल तरु तरी फांदी लवली
थंडगार घनगदर् सावली
मनीची अस्फुट स्मिते झळकती
तसे कवडसे तीत

मदालसा तरुवरी रेलूनी
वाट बघे सखी अधिर लोचनी
पानजाळी सळसळे, वळे ती
मथित हृदय कवळीत

पदर ढळे, कचपाश भुरभूरे
नव्या उभारीत उर थरथरे
अधरी अमृत ऊतू जाय
परी पदरी हृदय व्यथित

उभी उभी ती तरुतळी शिणली
भ्रमणी मम तनू थकली गळली
एक गीत, परी चरण विखुरले
व्दिधा हृदय संगीत


कवी - वा.रा.कांत
गायक - सुधीर फडके
संगीतकार - यशवंत देव

अवचिता परिमळू

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू |
मी म्हणू गोपाळू, आला गे माये || १ ||

चांचरती चांचरती बाहेरी निघाले |
ठकची मी ठेले काय करू || २ ||

तो सावळा सुंदरु कसे पितांबरू |
लावण्य मनोहरु देखियेला || ३ ||

बोधुनी ठेले मन तव जाले आन |
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये || ४ ||

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा |
तेणे काय माने वाचा वेधियेले || ५ ||