आनंदी आनंद गडे


आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे

वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे

- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

तू अशी. . तू तशी. . .

तू अशी. . तू तशी. . . तू नक्की आहे तरी कशी. .??
अल्लड, अवघड तरीही सर्वाना आवडेल अशी. . .
तू आहे तुझ्या सारखीच स्वछंदी. . . .
तुझ्या येण्याने सर्व जग बदलून जाते. .
सारे काही सुगंधी, संगीतमय. . हवे हवेसे वाटते. . .
तू फक्त बोलली तरी ग्रीष्मात पाउस पडेल,
तू एकदा हसली तर निमिषभर फक्त तूच दिसेल. . .
तुझ्या प्रत्येक कृतीत प्रेम, मैत्री, माया
यांचं त्रिवेणी संगम आहे. . .
तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला कसलीच तोड नाही,
मला आता तुझ्या शिवाय दुसरी कसलीचओढ नाही. . . .
तुझ्या निखळ मनात अडकून राहायला होतं. .
तुझ्या निरागस हसण्यात हरवून जायला होतं. . .
तुझ्या आवाजातील बंदिश जीव ओढून नेते. .
तुझ्या डोळ्यातील अश्रु माझे प्राणच् घेते. . .
या वेड्याचे प्रेमफक्त तुझ्यावरच असेल. .
तु प्रेम दे अथवा नको देऊ, पण साथ मात्र सोडू नकोस. .
दुःख आले माझ्याशीबोल, एकटी सहन करु नकोस. .
ओठांवर नेहमी हसु ठेव, डोळ्यात अश्रु आणु नकोस. . . ..

प्रेमाला उपमा नाही

प्रेमाला उपमा नाही ,
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पम्प नाही,
पम्पाला पैसे नाही,
पैस्याला नौकरी नाही,
नौकरीला डीग्री नाही,
डीगरीला शिक्षण नाही,
शिक्षनाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरीन्शीवाय प्रेम नाही,
म्हणून प्रेमाला उपमा

ते आम्ही!


चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!

जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!

नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!

हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!

ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!

तुझ्यावर एक कविता करू का


ये सांग न ग मला तुझ्यावर एक कविता करू का
जास्त नाही ग जमत पण थोडा ट्रअय तरी मारू का
डोळ्याचे कौतुक करतो मधी आणि मग केसाकडे वळू का
ओठाचे गुणगान गाऊ आधी मग नाकाकडे बघू का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

कायग नेहमीच भाव तू खायचा मी पण जरा खाऊ का
रुसणे मात्र तुझे आणि समजुतीला मात्र मीच का
एकटेपणा वाटतो तुला आणि सोबतीला मात्र मीच का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

शॉपिंग मात्र ढीगभर करते आणि बिल दयाला मीच का
भांडण मात्र तू काढतेस आणि मिटवायचे मात्र मीच का
नाकावरती राग येतो तुझ्या तेव्हा वाटते तू हीच का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

माझे मन गेले उडत आणि तुझेच घोडे पुढे का
लई लाडात नको येऊ सारखे एक कानाखाली देऊ का
जाऊदे ग वेडे विसर तो लटका राग आता गोड हसू देशील का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

- अशोक खेडकर

का रुसलीस तू

का रुसलीस तू हे कधी न जाणिले मी

का हसलीस तू हे कधी न जाणिले मी

तुज्या स्तब्ध ओठांनी हि प्रेम गीत गायिले तू

तुज्या लुप्त लोचनांनी नव चैतन्य दाविले तू

दाटून कंठ येतो तुझी आठवण हि बिलोरी

विखरून बघ गेली तुझी स्वप्न हि रुपेरी

का छळतेस आज पुन्हा या एकांत सांजवेळी

देऊनी हि उजाळा हि रात्र अजाण काळी

येशीलकाग पुन्हा या एकांत चांदराती

भेटशीलनाग पुन्हा या आठवणी हि मज छळती

का गेलीस दूरदेशी का सापडेलनाग हा रस्ता

परतीची ओढ् तुझ्या खाशीलनाग या खस्ता

परतीची नसे वाट जाणतोग मी हे सत्य

कसे सांगू या मना जणू वाटतेची हे मिथ्य

परतून ये प्रिये मना या लागली ओढ आकंठ

छळनार ना कधी करशील ना हसू उदंड


- अशोक खेडकर

तुझ्या भेटीस अर्थ होता...

तुझ्या भेटीस अर्थ होता नाजूक या कळ्यांचा

कळ्यानाही गंध होता या लाजऱ्या प्रेमाचा

काजव्यांनी चोरून मनी हार मांडलेले

चांदण्यांनी जणू हे आभाळ सांडलेले

स्पर्शतुनी जणू हि लाखोली वाहिलेली

निशाब्ध शांततेला जणू शब्द हि सुचेना

वारा निशब्ध झाला आईकून श्वाश माझे

फुलेही स्तब्ध झाली घेऊन गंध ओला

जुईच्या गंधाने आवेग मुग्ध झाला

चोरट्या या भेटीला नवाच अर्थ आला

उमलत्या या कळीला नवाच गंध आला

भेटीचा अर्थ उमगला कळीचे फुल झाले

परसातल्या कळ्याचे आयुंष्य सार्थ झाले


- अशोक खेडकर