खानदानी गुंडगीरी

बंड्या: ओ अण्णानु, जशे तुम्ही माका झोडतास,
तशे तुमचे बाबा पण तुमका झोडीत होते काय...????
.
.
.
अण्णा: "होय रे, येताच्या काठीन माका बरे झोडीत होते..!
.
.
.
बंड्या: " तर मग ही, खानदानी गुंडगीरी कधी परयत सुरु रवतली...??
वराडकरांच्या बंटीन गरमीच्या येळी सुट्टीये पडल्यार,हापुस आंब्याचा दुकान घातल्यान...!
...
शाळेतले तुळसकर मास्तर तेच्या दुकानार आंबे घेउक म्हणान येतत,

मास्तर: काय रे बंटी, आंबे कशे दिलस..???

बंटी:  ३०० चे १२  आंबे..
..
मास्तर: अरे, मी मास्तर तुझो, माझ्यासाठी काय तरी कमी कर मरे..!!!

बंटी: ठिक आसा..!
तुम्ही माझे मास्तर आसास म्हणान कमी करतय..!
चला, 200 चे 8 आंबे घेवा..!!

Z Talkies- Celebrity Calender 2013 ( मराठी चित्रपटांची १०० वर्षे )

सिद्धार्थ जाधव - ( निळू फुले )

 सई ताम्हणकर - ( रंजना )
 

 भरत जाधव - ( दादा कोंडके )


उपेंद्र लिमये - ( चंद्रकांत मांडरे )


मुक्ता बर्वे - ( स्मिता पाटील : जैत रे जैत ) 



 अंकुश चौधरी - ( अरुण सरनाईक )

सोनाली कुलकर्णी - ( जयश्री गडकर )

मकरंद अनासपुरे - ( राजा गोसावी )

उर्मिला कानेटकर - ( शांता आपटे )

सुबोध भावे - ( डॉ. काशिनाथ घाणेकर )

अमृता खानविलकर - (दुर्गा खोटे)
 

संजय नार्वेकर - ( लक्ष्मीकांत बेर्डे )
 सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।

व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।

फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।

राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।


कवी - म. म. देशपांडे.

घाल घाल पिंगा वाऱ्या

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !


कवी - कृ. ब. निकुंब

घाटातील वाट

घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ ।।

निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती ।।

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा ।।

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।


कवियत्री - सरिता पदकी
 दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी