बळवंतरावांनी गावाबाहेर जमीन घेऊन एक छान बंगला बांधला व तिथे रहायला गेले. एकदा रात्री बंगल्याच्या आवारात आवाज आल्याने ते उठले व बाहेर बघितल तर काही लोक त्यांच्या आवारात असलेल्या वस्तु नेताना दिसले.
बळवंतरावांनी तडक पोलीस स्टेशनला फोन लावला," अहो, माझ्या आवारात चोर शिरलेत आणि ते माझ्या मालकिच्या वस्तु नेताहेत जरा लौकर याल का. "

पलिकडून : "शक्य नाही, इथे कोणिही नाही. आल्यावर लगेच पाठवतो."

बळवंतराव जरा थांबले व परत पोलीस स्टेशनला फोन लावला. मी थोड्यावेळा पुर्वी फोन केला होता माझ्या आवारात चोर शिरलेत हे सांगायला. आपण नाही आलात तरि चालेल, मी माझ्या बंदूकिने त्या सर्वांना ठार केले."


थोड्यावेळातच पोलीस व्हॅन घेऊन आले.

पोलीस : तुम्ही तर म्हणाला होता तुम्ही सर्वांना ठार केले.

बळवंतराव : तुम्ही म्हणाला होता ना तिथे कुणी नाही.

खोकण्याचा सराव

गंपुनाना हॉस्पीटलच्या बेडवर पडले होते.

नर्स : नाना, तुम्ही कालच्या तुलनेत आज बरेच चांगले खोकताय, सुधारण दिसतेय तब्येतीत.

गंपुनाना : होना, सुधारणा होणारच. काल रात्रभर खोकण्याचा सराव करत होतो ना.

बरोबरी


एकवेळ संगणक मानवाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करेल पण मानवाच्या मुर्खपणाची बरोबरी करता येणार नाही !

करार कोवळा

एकदा दिलास तू गळ्यामध्ये गळा
लगेच काळजास लाख लागल्या कळा !

योजना तुझीच का नकारतेस तू ….
सहीविना तुझ्या कसा फुलायचा मळा ?

उगाच संशयासवे युती नको करू ..
तशीच तापतेस तू, वरून ह्या झळा !

गाल हे पुन्हा पुन्हा पुसू तरी नको..
तेवढीच भेट .. तो .. करार कोवळा !


कवी - ज्ञानेश वाकुडकर
नागपूर
पोलिस - अपघात झालेल्या बाईसः बाई, आपणास धडक देऊन गेलेल्या मोटारीचा नंबर आपण पाहिलात का?

बाई -  नंबर काही लक्षात नाही माझ्या... पण मोटार चालवणा-या त्या बाईने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, गळ्यात मोत्याची माळ होती..आणि ... तिचं लिपस्टिक मात्र तिला मुळीच शोभुन दिसत नव्हतं ..!

शेजाऱ्याची बायको

जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती
.


.
.
प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!

अंगात मस्ती

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... ..


का?



.. अंगात मस्ती, दुसरं काय?