हवामान खाते

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक :  बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस .  तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.
असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?



बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.

लांबी ...ऊंची ....

एक अभियंता, एक गणितज्ञ व एक भौतिक शास्त्रातला तज्ञ एका खांबाजवळ उभे होते. त्यांना प्रश्न पडला होता कि या खांबाची ऊंची कशी मोजायची, असे कोणते सूत्र या खांबाची अचूक ऊंची काढून देईल ?
तितक्यात एक मराठीचा प्राध्यापक तेथे आला.
मराठीचा प्राध्यापक," काय झाल ? सर्वच काळजीत दिसताय ?"
अभियंता,"आम्ही या खांबाची ऊंची मोजण्या साठी एक सूत्र तयार करतोय. या सूत्राने याची अचूक लांबी मोजता येणार."
प्राध्यापक," त्यात काय एक्दम सोप आहे ते. मी तुम्हाला ती मोजुन दाखवतो."
मराठीच्या प्राध्यापकाने तो खांब तेथून काढला, जमिनीवर आडवा ठेवला, एक पट्टी आणली व मोजून सांगीतले १८ फूट व खांब परत जागेवर नेऊन ऊभा केला.



गणितज्ञ : अरे आम्हाला याची ऊंची मोजायची होती, याने तर खांबाची लांबी सांगितली !

हुशार कुत्रा

सांता एके दिवशी सुट्टी बघून आपल्या कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळायला घराच्या अंगणात बसला.



त्याच्या मित्राने समोरुन जाताना सांता कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळत असल्याचे बघितले व तो त्यांचा डाव बघायला तेथे थांबला.



"सांता, माझ्या पहाण्यातला हा सर्वात हुशार कुत्रा आहे.", मित्र म्हणाला.



सांता," नाही रे, पाच डांवां मधले तो फक्त दोनच डाव जिंकलाय."

बघुन चाला हं.....

एक बाई देवाघरी गेल्या.
घरुन अंत्ययात्रा सुरु झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणार्‍या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली.
तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या. दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली.

थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्‍यांना सांगू लागला," बघुन चाला हं. बघा नाहीतर मागल्या सारखी कोणाला परत ठेच लागेल."

गळती

रामरावांकडचा नळ अचानक गळायला लागला. त्यांनी प्लंबरला फोन करून लगेच यायला सांगीतले त्यावेळेस सकाळचे ११ वाजले होते.

प्लंबर यायला दुपारचे ५ वाजले. त्याच्याकडे रामराव फारच वैतागुन बघत होते.

प्लंबर म्हणाला,"काय झाले."

"काही नाही. घरात पाणी साठले आहे. तुझी वाट बघता बघता मी पोहणे शिकून घेतले.", रामराव.
बळवंतरावांनी गावाबाहेर जमीन घेऊन एक छान बंगला बांधला व तिथे रहायला गेले. एकदा रात्री बंगल्याच्या आवारात आवाज आल्याने ते उठले व बाहेर बघितल तर काही लोक त्यांच्या आवारात असलेल्या वस्तु नेताना दिसले.
बळवंतरावांनी तडक पोलीस स्टेशनला फोन लावला," अहो, माझ्या आवारात चोर शिरलेत आणि ते माझ्या मालकिच्या वस्तु नेताहेत जरा लौकर याल का. "

पलिकडून : "शक्य नाही, इथे कोणिही नाही. आल्यावर लगेच पाठवतो."

बळवंतराव जरा थांबले व परत पोलीस स्टेशनला फोन लावला. मी थोड्यावेळा पुर्वी फोन केला होता माझ्या आवारात चोर शिरलेत हे सांगायला. आपण नाही आलात तरि चालेल, मी माझ्या बंदूकिने त्या सर्वांना ठार केले."


थोड्यावेळातच पोलीस व्हॅन घेऊन आले.

पोलीस : तुम्ही तर म्हणाला होता तुम्ही सर्वांना ठार केले.

बळवंतराव : तुम्ही म्हणाला होता ना तिथे कुणी नाही.

खोकण्याचा सराव

गंपुनाना हॉस्पीटलच्या बेडवर पडले होते.

नर्स : नाना, तुम्ही कालच्या तुलनेत आज बरेच चांगले खोकताय, सुधारण दिसतेय तब्येतीत.

गंपुनाना : होना, सुधारणा होणारच. काल रात्रभर खोकण्याचा सराव करत होतो ना.