वडाचं झाड डॉट कॉम

सासु - अगं सुनबाई उठ लवकर,
आज वटपौर्णिमा ... वडाची पूजा नाही करायची का ???
सुन - मला जाम कंटाळा आलाय, घरीचं करते पूजा,
माझा लैपटॉप आणा बरं इकड.....
डबल्यू डबल्यू डबल्यू डॉट वडाचं झाड डॉट कॉम,
ऑनलाइन वडाची पूजा सुरू..
माझे फेरे घालते... १,२,३,४,५,६,७……आता तुमचे  १,२,३,४,५,६,७……
झाली एकदाची वडाची पूजा.....
सासु - माझे गं कशाला घातले फेरे,
तुझे सासरे जावून ३ वर्ष झाले की गं आता.....
सुन - अय्या खरचं की ... Sorry हं.. Undo करते...

डबल-सिम मोबाईल

मुलगी : जानू....माझ्यावर किती प्रेम करतोस??

मुलगा : माझं हृद्य मोबाईल फोन आहे....आणि तू त्याचं सिमकार्ड...!!

मुलगी : अय्या.....मी किती लकी आहे....!!
.
.
.
.
.
मुलगा मनातल्या-मनात, " च्यायला...हिला काय माहीत माझा मोबाईल डबल-सिम चा आहे

वडे

आंब्याच्या झाडाला
आंबे लागतात...
.
.
.
.
.
वाव्..
.
.
.
.
.
.
.
पण,
वडाच्या झाडाला कधीच वडे लागत नाही...
आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं.

कोण असेल ती, कशी असेल ती,
शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात

मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी
असते समोर, भिडते नजर थेट,

मैत्रीचा प्रवास असाकाही सुरु
होतो
तिच्यातच स्वप्नं सुंदरी
शोधण्याचा कार्यक्रम चालू
होतो...

काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते
आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा
असतो वेगळाच गेम...

पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत...

माय

मायसंगं मीबी तवा,
काडक्या येचाया जायचो.....
माय लाकडांकडं आन,
मी धसपाटं घ्यायचो......

माय माझी हुती गोरी,
उन्हात त्वांड जळालेली....
गरीबीच्या लांड्ग्यामागं,
दमस्तवर पळालेली.....

फ़ाट्क्या तिच्या पदराशी,
लेमण गोळीचा तुकडा....
भुक तिची जाळायसाठी,
संगं र्‍हायचा मिश्रीचा पुडा....

माजी साळा बुडाया नगं,
म्हणून रोज लई राबायची......
कंधी दमलो शाळंत जर,
पोट्र्‍या माह्या दाबायची.....

म्या मेट्रिक केली तवा,
मायचं कातडं लोंबलं...
पण तिचं गोधडी घेणं,
माया काळजाला झोंबलं....

शर्ट-चड्डी घालेल पोर्‍या,
तिनं नीट पाह्यला न्हाई......
पण शिकवुन माला लय,
जायाची व्हती तिला घाई....

दाराम्होरं आजबी ढीग,
वाळेल काडक्यांचा हाय.....
पण चुलीजवळ शेकणारी,
गेली सोडुन लाडकी माय....


कवी - संतोष वाटपाडे(नाशिक)

हवामान खाते

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक :  बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस .  तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.
असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?



बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.

लांबी ...ऊंची ....

एक अभियंता, एक गणितज्ञ व एक भौतिक शास्त्रातला तज्ञ एका खांबाजवळ उभे होते. त्यांना प्रश्न पडला होता कि या खांबाची ऊंची कशी मोजायची, असे कोणते सूत्र या खांबाची अचूक ऊंची काढून देईल ?
तितक्यात एक मराठीचा प्राध्यापक तेथे आला.
मराठीचा प्राध्यापक," काय झाल ? सर्वच काळजीत दिसताय ?"
अभियंता,"आम्ही या खांबाची ऊंची मोजण्या साठी एक सूत्र तयार करतोय. या सूत्राने याची अचूक लांबी मोजता येणार."
प्राध्यापक," त्यात काय एक्दम सोप आहे ते. मी तुम्हाला ती मोजुन दाखवतो."
मराठीच्या प्राध्यापकाने तो खांब तेथून काढला, जमिनीवर आडवा ठेवला, एक पट्टी आणली व मोजून सांगीतले १८ फूट व खांब परत जागेवर नेऊन ऊभा केला.



गणितज्ञ : अरे आम्हाला याची ऊंची मोजायची होती, याने तर खांबाची लांबी सांगितली !