अजून

घरदिव्यांत मंद तरी
बघ, अजून जळते वात
उजाळल्या दिशा, सजणा
न कळताच सरली रात!

झडता झडेना या
लोचनातली पण धुंद
सर्व रात्र भर निजला
जिवलगा, कळीत सुगंधी!

निवळले, तरी दिसतो
पुसट एक हा तारा
बघ, पहाटचा सुटला
मधुर उल्हसित वारा!

फुगवते पिसारा अन
फिरफिरुन डोकावते -
वळचणीतली चिमणी
बघ, हळूच चिवचिवते!

जवळपास वाटेने
सुभग चालली कोणी
वाजते तिच्या भरल्या
घागरीतले पाणी

उगिच हासते माझे
ललित अंतरंग, सख्या!
उमलत्या फुलांमधले
हालले पराग, सख्या!

झोप तू, मिठीमधला
अलग हा करु दे हात
उलगडू कशी पण ही
तलम रेशमाची गाठ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

त्रस्त !

एकदा स्वर्गाच्या दारात प्रवेश घेणार्‍यांची रांग लागली होती.
बायकांना अर्थातच स्वर्गात सरळ प्रवेश होता व पुरुषांना रांगेत उभे राहुन परिक्षा दिल्यावर प्रवेश मिळायचा.
पुरुषांची रांग दोन प्रकारची होती.
एका रांगेत असे पुरुष होते जे जिवंतपणी त्यांच्या बायकोच्या धाकात होते तर दुसर्‍या रांगेत जे आपल्या बायकोच्या धाकात नव्हते.
धाकात असणार्‍यांची संख्या प्रचंड होती तर धाकात नसणार्‍या लोकांच्या रांगेत फक्त एकच माणूस ऊभा होता.
सर्व जण त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते व त्याच कौतुकही करत होते.
शेवटी एकाने त्याला त्याच्या हिमतीच कौतुक करत यातील गुपीत विचारले.
तेंव्हा तो म्हणाला, " अरे गुपीत काही नाही, माझ्या बायकोने सांगीतल म्हणुन मी येथे उभा आहे."

झेब्रा क्रॉसिंग

संता रस्ता क्रॉस करताना एकसारखा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांवर नाचत होता.

ट्रॅफिक हवालदार : अरे ए.. काय करतोयंस? असा उड्या का मारतोयस?

संता : अहो हवालदार साहेब, मी केव्हापासून प्रयत्न करतोय. पण हा मोठा पियानो काही वाजतच नाहीये

पुर्ण नाव..

शाळेचा पहीला दिवस असतो..

शिक्षक : अरे तु उठ.. तुझ नाव सांग..

पहिला विद्यार्थी : नरु

शिक्षक : अरे अस नाही म्हणायच, "नारायण" अस पुर्ण म्हणायच..

शिक्शक (दुसऱ्या विद्यार्थ्याला) : बाळ, आता तु तुज नाव सांग बघु..

दुसरा विद्यार्थी : "रामायण" !!!

२ अर्थ

शाळेत मराठीचा क्लास चालू होता.

बाई : हे बघा मुलांनो , मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!

दिघ्या : बाई काढून दाखवा ना !!!!!

बाई ( लाजुन ) : खाली बस वेडया ! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ निघतात!

फोनच बील

फोनच बील फार जास्त आल्यावर श्री. देसाईंनी सकाळी नाश्त्याला सगळे बसले असताना विषय काढला की फोनच बील एवढ कां ? मी तर सगळे फोन ऑफिस मध्ये असतांनाच करतो. एवढ मोठ बील मला परवडत नाही.
सौ. देसाई : मी पण सगळे फोन माझ्या कार्यालयातुनच करते.
देसाईंचा मुलगा : मी घरुन कधिच फोन करित नाही. कंपनीने मला वेगळा फोन दिला आहे. मी तोच वापरतो.
देसाईंची मोलकरिण : त्यात काय बिघडलं ? आपण सगळेच आपल्या कामाच्या ठिकाणचेच फोन वापरतोनां ?

कापूस आहे का?

डॉक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का?
डॉक्टर : हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का?
डॉक्टर : हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डॉक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे.
१० मी. पुन्हा बेल वाजते…
पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का?
डॉक्टर : जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की।