पिसाट मन

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा !

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा !

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा !

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

नरक ते नरक फ्री कॉल

मुशर्रफ़ : यमराज मी पाकिस्तान फोन करु शकतो का?

यमराज : ठीक आहे.

फोन करुन झाल्यावर.

मुशर्रफ़ : किती पैसे झाले.

यमराज : काहीही नाही

मुशर्रफ़ : का?

यमराज : कारण, नरक ते नरक कॉल फ्री आहे.

समाधि


या दूरच्या दूर ओसाड जागी
किडे पाखरांवीण नाही कुणी
हा भूमिकाभाग आहे अभागी
इथे एक आहे समाधी जुनी

विध्वंसली काळहस्तांमुळे ही
हिला या, पहा, जागजागी फटा
माती, खडे आणि आहेत काही
हिच्याभोवती भंगलेल्या विटा!

आहे जरी लेख हा, छेद गेला -
जुन्या अक्षरांतील रेघांमधून
दुर्वांकुरे अन तरु खुंटलेला
निघाला थरांतील भेगामधून

कोठून ताजी फुले, बाभळींनी -
हिला वाहिले फक्त काटेकुटे
ही भंगलेली शलाका पुराणी
कुणाचे तरी नाव आहे इथे

रानांतला, ऊन, मंदावलेला,
उदासीन वारा इथे वाहतो
फांदीतला कावळा कावलेला
भुकेलाच येथे-तिथे पाहतो!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

हार !

ऑपरेशन आधि रुग्णाला सर्व तयारी सोबत टेबलवर एक हारही दिसतो.
त्यामुळे तो काहिसा उत्सुक होऊन डॉक्टरला विचारतो, " डॉक्टर, बाकी तयारी मी समजू शकतो पण हा हार कशासाठी ?"
डॉक्टर : हे बघा हे माझं पहिलच ऑपरेशन आहे. समजा ते यशस्वी झालं तर हा हार माझ्यासाठी नाही झाल तर तो............. तुमच्यासाठी."

अजून

घरदिव्यांत मंद तरी
बघ, अजून जळते वात
उजाळल्या दिशा, सजणा
न कळताच सरली रात!

झडता झडेना या
लोचनातली पण धुंद
सर्व रात्र भर निजला
जिवलगा, कळीत सुगंधी!

निवळले, तरी दिसतो
पुसट एक हा तारा
बघ, पहाटचा सुटला
मधुर उल्हसित वारा!

फुगवते पिसारा अन
फिरफिरुन डोकावते -
वळचणीतली चिमणी
बघ, हळूच चिवचिवते!

जवळपास वाटेने
सुभग चालली कोणी
वाजते तिच्या भरल्या
घागरीतले पाणी

उगिच हासते माझे
ललित अंतरंग, सख्या!
उमलत्या फुलांमधले
हालले पराग, सख्या!

झोप तू, मिठीमधला
अलग हा करु दे हात
उलगडू कशी पण ही
तलम रेशमाची गाठ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

त्रस्त !

एकदा स्वर्गाच्या दारात प्रवेश घेणार्‍यांची रांग लागली होती.
बायकांना अर्थातच स्वर्गात सरळ प्रवेश होता व पुरुषांना रांगेत उभे राहुन परिक्षा दिल्यावर प्रवेश मिळायचा.
पुरुषांची रांग दोन प्रकारची होती.
एका रांगेत असे पुरुष होते जे जिवंतपणी त्यांच्या बायकोच्या धाकात होते तर दुसर्‍या रांगेत जे आपल्या बायकोच्या धाकात नव्हते.
धाकात असणार्‍यांची संख्या प्रचंड होती तर धाकात नसणार्‍या लोकांच्या रांगेत फक्त एकच माणूस ऊभा होता.
सर्व जण त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते व त्याच कौतुकही करत होते.
शेवटी एकाने त्याला त्याच्या हिमतीच कौतुक करत यातील गुपीत विचारले.
तेंव्हा तो म्हणाला, " अरे गुपीत काही नाही, माझ्या बायकोने सांगीतल म्हणुन मी येथे उभा आहे."

झेब्रा क्रॉसिंग

संता रस्ता क्रॉस करताना एकसारखा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांवर नाचत होता.

ट्रॅफिक हवालदार : अरे ए.. काय करतोयंस? असा उड्या का मारतोयस?

संता : अहो हवालदार साहेब, मी केव्हापासून प्रयत्न करतोय. पण हा मोठा पियानो काही वाजतच नाहीये