तुझ्यासाठी !

तुझ्यासाठी
कितीदा
तुझ्यासाठी रे !

मी दुहेरी
बांधल्या
खूणगाठी
–खूणगाठी रे !

मी दुपारी
सोसले
ऊन माथी
– ऊन माथी रे !

लाविल्या मी
मंदिरी
सांजवाती
–सांजवाती रे !

कैक आल्या,
संपल्या
चांदराती
–चांदराती रे !

मी जगाच्या
सोडल्या
रीतभाती
– रीतभाती रे !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कार बनवणारे वेडे !

सांतासिंग अमॄतसरहून जलंधरला आपल्या मारुती कारने जातो. आईला दोन तासातच पोहचल्याचा फोन करतो व आपल्या कामासाठी जातो.
काम झाल्यावर आईला परत फोन करुन सांगतो मी संध्याकाळ पर्यंत परत येतोय.
रात्र झाली तरी सांता घरी पोहचत नाही.
दुसर्‍या दिवशीही पोहचत नाही.
तिसर्‍या दिवशी दमलेला सांता घरी पोहचल्यावर त्याची आई विचारते," बेटा काय झाल ? तु तर दोन तासातच पोहचला होतास. परत यायला इतका वेळ का लागला ?"
सांता : अग आई हे कार बनवणारे वेडेच आहेत. समोर जायला कारला चार गिअर दिलेत तर मागे जायला फक्त एकच गिअर दिलाय त्यांनी.

ये जरा जवळ, राजसे गऽ !

ये जरा जवळ, राजसे गऽ !
ये जरा जवळ, राजसे गऽ !

मी तुझा सजण सावळा
अन तुझी चांदणी कळा
चल, फिरु बरोबर, असे गऽ !

घे चंद्रकळा काजळी
हास तू फुलांआगळी
कर खरे जुने भरवसे, गऽ !

आणली तुला, मंजुळा
लाल बुंद चोळी, तिला –
बिलवरी, नितळ आरसे, गऽ !

करतील तुला सावली
हलत्या गर्द जांभळी
चमकतील मग कवडसे, गऽ !

कोवळे ह्र्दय हरघडी
फडफडून घेते उडी
हळुवार पखरु जसे, गऽ !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सगळे बदलतात पण मित्र नाही

परीक्षेच्या RESULT नंतर:

जर चांगले गुण मिळून पास झाला तर…

शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा
बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच ...
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि...

जर नापास झाला तर….

शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस .
पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच....

सगळे बदलतात पण मित्र नाही.

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……


कवी - कुसूमाग्रज

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे
पण त्याला जगता आलं पाहिजे
फुल खुंटन्याआधी त्यालाही मन आहे
हे जाणता आलं पाहिजे

दुःखाची बेरीज सगळेच करतात
पण दुःखात ही हसता आलं पाहिजे
सुखात ही सगळेच हसतात
पण दुसर्याच सुखही आपलंच मानता आलं पाहिजे

जीवनाच्या वाटेवर खूप माणस मिळतात
माणसात माणूस शोधता आलं पाहिजे
अनेक नाती जोडता जोडता जीवनभर
मैत्रीचं, प्रेमाचं अतूट नात जपता आलं पाहिजे


कवी - गणेश पावले

सखू

चढविते गळा कोवळा
जशी कोकिळा;
हरिणीस सखूचा लळा
कि पडते गळा ऽऽऽऽ जी !

कवळाच नूर लुसलुसू;
नजर देखणी;
खुलविते निरागस हसू
नितळ चांदणी ऽऽऽऽ जी !

हलताच हात : वाजते
गोठबांगडी;
लावून जीव नेसते
कि हिरवी चिडी ऽऽऽऽ जी !

लेऊन रुपेरी, निका
गोफ अन सरी,
पाहते ऊर सारखा
पोर लाजरी ऽऽऽऽ जी !

लडिवाळ हिंचे बोलणे;
चाल नाचरी;
फडफडून राघू म्हणे :
‘सखू साजरी ऽऽऽऽ जी !’


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ