पाहिले न पाहिले

जे मत्त फुलांच्या कोषांतुन पाझरलें,
निळ्या लाघवी दंवांत उलगडलें,
जें मोरपिसांवर सांवरलें,

तें - त्याहुनही - आज कुठेंसें
पुन्हा एकदां
तशाच एका लजवंतीच्या
डोळ्यांमध्ये - डॊळ्यांपाशी -
झनन-झांजरे मी पाहिलें...
पाहिले न पाहिले.

जें प्राजक्ताच्या पाकळिवर उतरले,
मदिरेवरच्या निळ्या गुलाबी फेंसावर महिरपलें,
जे जललहरीवर थरथरले,

तें - त्याहुनही - आज कुठेंसें
पुन्हां एकदां
तशाच एका लजवंतीच्या
ओठांवरती - ओठांपाशी
ठिबक-ठाकडें मी पाहिलें....
पाहिलें न पाहिलें.

जे कलहंसांच्या पंखांवर भुरभुरलें,
सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतुन शहारलें,
जें पुनवेंच्या चांदण्यांत भिजलें, भिजलें,
ते - त्याहुनही - आज कुठेंसें
पुन्हां एकदां
तशाच एका लजवंतीच्या

मानेखालीं - किंचित वक्षीं -
बहर-बावरें मीं पाहिलें...
पाहिलें न पाहिलें.


कवी - पु.शि.रेगे

निळ्या पारदर्शक अंधारात

१. एखाद्या दिवशी
२. सुखाचे गाणे
३. प्रेम म्हणजे
४. या घनदाट पावसात
५. सूळ

जावे जन्माकडे

१. जावे जन्माकडे
२. संभ्रम
३. मनाची साहसे
४. जाता येते का पुढे
५. एकेकदा खरोखर

निरंजन

१. निरंजन
२. जनी
३. रंगमहाली विठूच्या
४. बायका
५. बायो, आता

मंत्राक्षर

१. मंत्राक्षरे
२. नीलकंठ
३. बाभळीला फुले आली
४. परांगदा
५. सरली वो रात

मामाचं घर

१. मामाचं घर
२. देवदूत
३. सांग ना गं
४. सोनेरी गाणे
५. चंद्र म्हणाला
६. देवाघरच देण
७. गणपतीबाप्पाचे उंदीरमामा
८. आनंदाचा सूर
९. चंद्रपूरच्या जंगलामध्ये
१०. पाउस आला
११. लिसानं दिली भेट
१२.  लिसाची बाळ
१३. झोका
१४. फुंकर
१५. चित्र
१६. गोगलगायीचे पंख
१७. आठवण
१८. मंगळावर दिवाळी
१९. हे माझे गाणे
२०. दादा घरी येतो
२१. एकटा दाट रानात
२२. पऱ्या भेटल्या
२३. वाढदिवस 
२४. अक्कूताईची सहल

अरुणा ढेरे

अरुणा ढेरे (१९५७ - हयात) या मराठी भाषेतील लेखिका, कवयित्री आहेत.


बालपण
अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. तेथेच त्यांचे एम.ए. पीएच.डी. पर्यंतचे सर्व शिक्षण झाले. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत. बालपणापासून एका उच्च दर्जाच्या वाङ्मयीन वातावरणातच त्या मोठ्या झाल्या. अरुणा ढेरेंच्या घरात जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे ग्रंथांच्या सहवासात आणि साहित्याने भारावलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले.

कारकीर्द
अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इ. विविध विषयांवर विपुल लेखन केले असले तरी त्या मुळात कवयित्री आहेत. सुनीता देशपांडे यांच्याशी जुळलेल्या स्नेहबंधाचे निकट मैत्रीत रूपांतर झालेल्या ढेरे यांना जेव्हा सुनीताबाईंची जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेली पत्रे वाचायला मिळाली, तेव्हा त्यांचे पुस्तक होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सुनीताबाईंनी त्यावर प्रस्तावना लिहिणार असाल, तरच पुस्तक निघेल, असा आग्रह धरला. सुनीताबाईंचा आग्रह किती योग्य होता, हे त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचताना लक्षात येते. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणाऱ्या डॉ. ढेरे या गेल्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील.
 

पुस्तके
‘लोकसंस्कृतीची रंगरूपे’, ‘लोक आणि अभिजात’, ‘विस्मृतिचित्रे’, ‘डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’, ‘विवेक आणि विद्रोह’, 'कवितेच्या वाटेवर', 'काळोख आणि पाणी'
 
कविता संग्रह
प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन,

कथा संग्रह
कृष्णकिनारा, अज्ञात झऱ्यावर, रूपोत्सव, मैत्रेय, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे


संपादन
स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०) (११ लेखिकांच्या कादंबऱ्यांचा परामर्श) (पद्मगंधा प्रकाशन)
या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला.

पुरस्कार
नागपूरच्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यासाच्या वतीने अमेरिकेतल्या डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान त्यांना मिळाला आहे. अरुणा ढेरे यांना आजवर तीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.