मूर्ति फोडा, धावा ! धावा फोडा मूर्ति,
आंतील सम्पत्ति फस्त करा !
व्यर्थ पूजाद्रव्यें त्यांस वाहूनियां,
नाकें घांसूनीयां काय लभ्य ?
डोंगरींचे आम्ही द्वाड आडदांड,
आम्हांला ते चाड संपत्तीची !
कोडें घालूनियां बसली कैदाशीण,
उकलिल्यावीण खाईल ती !
तिच्या खळीमध्यें नाहीं आम्हां जाणें,
म्हणूनि करणें खटाटोप.
मूर्ति फोडूनीयां देऊं जोडूनीयां
परी विकूनीयां टाकूं न त्या !
विकूनि टाकिती तेचि हरामखोर
तेचि खरे चोर आम्ही नव्हें !
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
- अभंग
- १८९६
आंतील सम्पत्ति फस्त करा !
व्यर्थ पूजाद्रव्यें त्यांस वाहूनियां,
नाकें घांसूनीयां काय लभ्य ?
डोंगरींचे आम्ही द्वाड आडदांड,
आम्हांला ते चाड संपत्तीची !
कोडें घालूनियां बसली कैदाशीण,
उकलिल्यावीण खाईल ती !
तिच्या खळीमध्यें नाहीं आम्हां जाणें,
म्हणूनि करणें खटाटोप.
मूर्ति फोडूनीयां देऊं जोडूनीयां
परी विकूनीयां टाकूं न त्या !
विकूनि टाकिती तेचि हरामखोर
तेचि खरे चोर आम्ही नव्हें !
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
- अभंग
- १८९६