एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं.
पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतकरी होता.
त्याला पाहून पुढारी निराशेनं म्हणाला, "तू एकटाच तळमळीचा माणूस निघालास, पण आता मी भाषण करू की नको ?"
शेतकरी म्हणाला, "साहेब, माझ्या गोठ्यात वीस बैल आहेत.त्याना मी चारा दयायला गेलो आणि तिथं एकच बैल असला, तर बाकीचे एकोणीस बैल नाहीत म्हणून मी त्याला उपाशी ठेवायचं का ?"
त्याच्या या मार्मिक उत्तरावर पुढारी महाशय खुश झाले. त्यानी चांगले दीड तास भाषण ठोकून त्या एकुलत्या एक श्रोत्याला हैराण केलं. भाषण संपल्यावर पुढारी म्हणाले,
"तुझी बैलाची उपमा मला फार आवडली. माझं भाषण कसं झालं?"
शेतकरी म्हणाला, "साहेब, एकोणीस बैल गैरहजर असले, म्हणून वीस बैलांचा चारा एका बैलाला घालु नये, एवढी अक्कल मला आहे, पण ती तुम्हाला नाही...!"
तात्पर्य :- शेतक-यांना मुर्ख समजू नये. शेवटी तो या जगाचा 'बाप' आहे.