एकदा पाटील  मित्रासोबत गाडीने 🚘 पिकनीकला जात होते

गाडीच्या समोरील काचेतून मित्रांना काही दिसत नव्हते 😟 तरी सुध्दा आपला पाटील  अगदी सफाईदार पणे  गाडी खड्डे चुकवित  चालवत होता.

मित्रांनी अगदी हैराण होऊन विचारले: पाटील   गाडीच्या काचेतून व्यवस्थित दिसत नसतानादेखिल गाडी परफेक्ट कशी काय  चालवता? "

पाटील  : काय सांगू? विसरभोळेपणामुळे आतापर्यंत चष्मे झाले 1760...☺

मित्र: आम्ही ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय?😣😠

पाटील   :तेच तर सांगतोय😜, चष्मे बनवून मी हैराण झालो

म्हणून........
.
.
गाडीची काचच चष्म्याच्या नंबराची  बसवली..........

पाटलांचा नादचं खुळा होवू दे तोटा..पाटील हाए मोठा.
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे  जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
😛😝😜😆😁😂😆😬😬😷😷

शिक्षक : मुलांनो सुई  टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
.
.

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.

मास्तरांनी 🏃कोरड्या विहिरीत उडी मारली....
😜😜😜😜😜😜😜😜😜

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....

गण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
😆😆😆😆


पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....

.डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......

.एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......' कारण कोण झोपलय ते कळत नाही ' .

..मास्तरांनी बदाबदा बडवला..
😛😛

गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?

बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!

(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)

😳😳😳😛😛😛😛

आई :- "चिंटु लवकर आंघोळ करून घे,नाहीतर शाळा बुडेल..!"

चिंटु :- "आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?

आईने  बादलीतच बुडवून बुडवून हानला

😂😂😂😂
गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........

बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
.
बाईंनी शाळा सोडली आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................
😂😂😂😂

भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू - सर,

भावा-बहिणीचा.
सर - काय ?
बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..


गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??

विद्यार्थी-

एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
 😁😁 😝
मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का


मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा     : टिंब. "." 👈 

घरगुती मानापमान

नवरा - हल्ली तुझे उपवास नसतात का? लग्नाआधी बरेच करायचीस ना?

बायको - हो ना. सोळा सोमवार

करून तुमच्याशी लग्न झालं आणी माझा विश्वासच उडाला उपासांवरचा!
मास्तर-मुलांनो..'she was new Student an looking happy'
या वाक्याच मराठीत रुपांतर कारा..
.
.
.
.
.
.
 पोरगा-
कुन्या गावाच आल पाखरु..
बसलय डोलात आन
खुदू खुदू हसतय गालात!
.
.
मास्तर ढगात...

एकदा गण्याने मित्रांसाठी पार्टि करायचे ठरवले...🍖🍗
आणि पार्टि साठी आपल्याच घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐

त्यानी बकरा चोरला पण आणि मित्रांसोबत मनसोक्त पार्टि केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :- हा बकरा इथे कसा..???

बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे सांगा रात्री

चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???
एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं.
पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतकरी होता.

त्याला पाहून पुढारी निराशेनं म्हणाला, "तू एकटाच तळमळीचा माणूस निघालास, पण आता मी भाषण करू की नको ?"
शेतकरी म्हणाला, "साहेब, माझ्या गोठ्यात वीस बैल आहेत.त्याना मी चारा दयायला गेलो आणि तिथं एकच बैल असला, तर बाकीचे एकोणीस बैल नाहीत म्हणून मी त्याला उपाशी ठेवायचं का ?"

त्याच्या या मार्मिक उत्तरावर पुढारी महाशय खुश झाले. त्यानी चांगले दीड तास भाषण ठोकून त्या एकुलत्या एक श्रोत्याला हैराण केलं. भाषण संपल्यावर पुढारी म्हणाले,

"तुझी बैलाची उपमा मला फार आवडली. माझं भाषण कसं झालं?"

शेतकरी म्हणाला,  "साहेब, एकोणीस बैल गैरहजर असले, म्हणून वीस बैलांचा चारा एका बैलाला घालु नये, एवढी अक्कल मला आहे, पण ती तुम्हाला नाही...!"

तात्पर्य :- शेतक-यांना मुर्ख समजू नये. शेवटी तो या जगाचा 'बाप' आहे.

स्त्री प्रवासी - कंडक्टर दिड टिकीट द्या

कंडक्टर - ते कसे?

स्त्री प्रवासी - माझे एक फुल आणि माझ्या हाफ मॅड पतीचे अर्धे

कंडक्टर - तरी तुम्हाला दोन फुल घ्यावे लागतील

स्त्री प्रवासी - ते कसे?

कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणुन अर्धे आणि तुम्ही दीड शहाण्या असे दोन फुल...

तात्पर्य - जगात कुठेही डोकं लावा पण S.T महामंडळ च्या कंडक्टर सोबत डोकं लावु नका.