मुलगा :-  तुला एकूण भाऊ किती ?



 मुलगी :- तुला धरून तीन
(खेळ खल्लास)

आणि भारत सज्ज झाला.....

१४ महिन्याचं लेकरू कडेवर घेऊन ,
आपल्या ५ वर्षांच्या मुलीला हाताने ओढत,
७ वर्षाच्या मुलीच्या कडेवर बसलेल्या
३ वर्षाच्या मुलीला बिस्किटाचा घास भरवत,
ती ६ महिन्यांची पोटुशी माऊली,
अनवाणी पायाने, 'यावेळी मुलगाच होऊ दे!',असा नवस बोलण्यासाठी मंदिरात आली..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

गळ्यात ताईत आणि मनगटाला गंडा बांधला,
नाकात दोन दोन थेंब टाकून, परातीतल्या पाण्यात हात बुडवून, कावीळ उतरवली,
आणि सापाचे विष उतरवण्यासाठी मांत्रिक गाठला!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

मुलीच्या लग्नात १० तोळे सोने आणि लाख भर हुंडा शेत विकून दिला, शिवाय तिचं बाळंतपण सुद्धा केलं!
बाळाच्या जावळाला बोकड कापून जेवणावळी घातल्या!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

बाई कमावते, नवरा दारूत उडवतो, रात्री पायाखाली तुडवतो.
तरीही वंशाचा दिवा हवा म्हणून सासू रुसून बसली!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

नापिकीला कंटाळून बाप हवालदिल झालाय! तंगड्या वर करून बसलेल्या मुलाच्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय! हळदीला डीजे नाही आणला तर लग्न नाही करणार म्हणते धाकटी मुलगी!
नांदवायचं नाही म्हणताहेत सासरचे, म्हणून घरी आली मोठी मुलगी..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

नव्या गाडीच्या नंबर प्लेटला  लिंबू मिरची बांधली,
राहत्या घरातले स्वयंपाकघर पूर्वेचं पाडून पश्चिमेला बांधलं,
नावाच्या स्पेलिंगमध्ये एक्सट्रा लेटरही जोडून घेतलं
आता कुठे पोरगा बिनपगारी मास्तर म्हणून नॉन ग्रांट च्या शाळेत लागला

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!
भारताची लोकसंख्या आता एकाच गोष्टीने रोखली जात आहे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

शाळेची फी
मुलांना वाया जाऊ द्यायचे नाहीये ? मग दोन मिनिटे वेळ काढून वाचा

शेजारशेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या अंगणात शोभेची झाडं दोघांनी लावली होती. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत.

हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती.

एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले.

त्या आजोबांचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे होते !!

आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत.”

Note : आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.. जितके जास्त जपाल तितके मुलांना कमकुवत कराल. निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली असते. ती खच्ची करू नका. उलट थोडेफार ऊन वारा पाऊस त्याला सोसू द्या ! तरच तो मजबूत बनेल. मग जीवनात कितीही वादळे आली तरी तो पालकांच्या (खत पाण्यावर) म्हणजेच भरोशावर जगणार नाही !
हेच खरे पालकत्व आहे !!!!
- अच्युत गोडबोले (मानसोपचार विशेषक)
पिऊन आलेला नवरा : तू जाडी, काळी, रताळी...,,..!!!

बायको चिडून : तू दारुड्या, बेवड्या, नशेडी...😡😡😡

नवरा जोराजोरात हसुन : माझं काय... मी तर सकाळी ठीक होईल... ।

पण तू तर अशीच राहणार!!!  😎😂

 एका लहान मुलाला विचारले
'कोणत्या शाळेत जातोस?'









तो म्हणाला 'मी जात नाही!....मला पाठवतात...😏
सूचना...

जर आपण सहकुटुंब कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक ;
व्हाट्सप वर टाकू नये...!

त्यामुळे...

जे कधी कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडणं होतात...!!