इतके सोपे असते तर मग हसलो नसतो का ?
रोज सुखाच्या पारावरती दिसलो नसतो का ?
सात पिढ्या श्रीमंतच होत्या आठवी पिढी मी
नाहीतर मग नोटा मोजत बसलो नसतो का ?
वैभव जोशी
एक धर्मगुरू आणि पाद्री रस्त्याच्या कडेला उभे आहेत. त्यांच्या हातात एक फलक आहे, ज्यावर लिहिले आहे, "शेवट जवळ आला आहे! खूप उशीर होण्यापूर्वी आताच मागे फिरा!"
एक जाणारा ड्रायव्हर ओरडतो, "तुम्ही लोक वेडे आहात!" आणि त्यांना मागे टाकून वेगाने निघून जातो. वळणाच्या पलीकडून त्यांना टायरच्या कर्कश आवाजासह, मग गाडी पडल्याचा मोठा आवाज ऐकू येतो.
धर्मगुरू पाद्रीकडे वळून म्हणतो, "आपण त्याऐवजी 'पूल बंद आहे' अशी पाटी लावली तर कसं राहील?"
एकदा, बायकोबरोबर घ्यायला गेलो भाजी ! पिशव्या उचलून उचलून, जिरली होती माझी !
पिशव्या उचलणे म्हणजे, समजू नका थट्टा ! इकडे, चालू होता बायकोच्या तोंडाचा पट्टा !
इतक्यात मैत्रीण, छानश्या बाळाला आली हो घेऊन ! अले वा, खेळवू लागलो, त्याच्या गालावर हात ठेऊन !
हे घ्या तुमचे बाळ, मैत्रीण ओरडू लागली रागात ! तुमच्याशिवाय, कोण आहे आम्हाला या जगात !
ओरडलो, कोणाचं बाळ, तुझ डोकं बिकं फिरलंय का? बायको त्वेषाने, तरी वाटलंच, पाणी कुठं मुरलंय का?
बायको लाल झाली रागाने, जाऊ लागला तिचा तोल ! मैत्रिणीला म्हणालो, अगं ये बाई, आता तरी खरं बोल !
मैत्रीण हसतच, सॉरी सॉरी हे माझंच आहे मुल ! मला या वेड्याला, करायचं होतं हो एप्रिल फुल !
मैत्रिणीचं झालं एप्रिल फुल, पण माझी जाम टरकली ! बायकोकडे बघताना, पायाखालची वाळूच सरकली !
कवी - उमेश शां. श. ओवाळ
एका माणसाने वर्तमानपत्रात जाहिरात दिली की त्याला नोकर हवा आहे. तुम्हाला कोणताही पगार मिळणार नाही, फक्त जेवण मिळेल.
नशिबाने साथ दिलेला एक गरीब माणूस आला आणि त्याने विचारले,"साहेब, मला काय काम करायचं आहे?"
तो काहीच बोलला नाही, फक्त दोन लोकांसाठी रोजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण जवळच्या गुरुद्वाराच्या लंगरमधून आणावे लागते.
एक तुझं, एक माझं..!!!
*आई ही आई* असते...
● *आयझॅक-न्यूटनची आई* : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??
● *आर्किमिडीजची आई* : गाढवा! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?
● *एडिसनची आई* : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं!
● *जेम्स वॅटची आई* : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!
● *ग्रॅहम बेलची आई* : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!
● *मोनालीसाची आई* : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!
● *गॅलेलियोची आई* : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??
● *कोलंबसची आई* : कुठे ही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!
● *मायकल अँजेलोची आई* : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!
● *बिल गेट्सची आई* : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते!
● *फॅरेनहाइटची आई* : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!
आणि शेवटी..
● *अलबर्ट आईनस्टाइनची आई* : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!
😊😝