डोळ्यांतुन रंगित सांज परतली आज
भटकल्या गायी....
व्याकूळ अनावर धूळ पसरली बाई.
खिडकीला टेकुनि पाठ कशी वहिवाट बावरे न्यारी अंगात रुते कीं कांच तुझ्या दुखणारी... ओलेच उदविले केस
तुझ्या स्मरणास दिसे पडशाळा बगळ्यांची झुलती मंद फुलांची माळा.
झाडांत संपती दूर
मंदिरें चूर बिलगती जैसीं घर तुला खुणावे
तूंच अशी वनवासी.
डोळ्यांत गुंफुनी थेंब जराशी थांब ; देह राख हलणारा
हिमकंपित इथला
भणभण फिरतो वारा....