बायको :


बोलता बोलता आपल्या लग्नाला 30 वर्षे झाली. 😉


नवरा - 


मग एवढं बोलायचं कशाला? 🫣


🤣😂🤣😂😊

 🪷


जे टाळणे अशक्य ।

दे शक्ती ते सहाया ॥

जे शक्यसाध्य आहे ।

निर्धार दे कराया ॥

मज काय शक्य आहे ।

आहे अशक्य काय ॥

माझे मला कळाया ।

दे बुद्धी देवराया ॥


- *डॉ. आनंद नाडकर्णी*


😊

 *माझ्या मित्राने गेल्या महिन्यात 1 कोटी कमावले.*💵💰💲🪙


तो 26 वर्षांचा आहे👦

आयआयटी नाही. आयआयएम नाही.📜 

अभियांत्रिकी शिक्षण अर्धवट सोडले.🚂

पहिला पगार: 24 हजार. 🥴

गेल्या महिन्यात: 1 कोटी. 🤑

काय बदलले? 🤔

त्याने नोकरी शोधणे थांबवले. 😉

.

.

.

आणि *वडिलांची जमीन विकायला सुरुवात केली*. 🫣


🤣😂🤣😂😊

 दुसऱ्याला व्हॉटस्‌ॲप मध्ये वाट पहायला लावून ...🤨


तेवढ्या वेळात आपण फेसबुकला फिरून येणे ...😉


याला *इ-पाप* म्हणतात ...🫣


🤣😂🤣😂😊

 मध्यंतरानंतर, अंधारात आपल्या जागेवर परत येत असताना, एक स्त्री कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकाला म्हणाली,"दादा, बाहेर जाताना मी तुमच्या पायावर पाय दिला का?🤔


प्रेक्षक (रागाने): हो, तुम्ही माझा पाय चिरडलात , आता माफी मागता का?🤨


स्त्री: माफी नाही दादा, याचा अर्थ माझी जागा याच रांगेत आहे हे माहिती करून घ्यायचे होते 🫣


🤣😂🤣😂😊

 जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला हे ऐकल्यापासून मी सर्वांना आवडेल असं काम करणे बंद केलेले आहे.😉


उगाचच रिस्क नको...🫣


🤣😂🤣😂😊

जावईबापूंचे प्रकार

आपल्याकडे जावईबापूंचे पाच प्रकार सांगितले जातात. ते पुढीलप्रमाणे -

*१) साखऱ्या जावई* 

साधारणत: २% जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० कि.मी.पेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्यामुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जात-येत असतात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून त्यांचा मानपान होत असतो. चांगलीच बडदास्त असते यांची, कुठे बसवू अन् कुठे उठवू ? अशी अवस्था सासरच्या मंडळींची होत असते, म्हणून यांना *'साखऱ्या जावई'* असं म्हटलं जातं. जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे... 


*२) भाकऱ्या जावई* 

या प्रकारात ९५% जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर/वारंवार जात-येत असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई-बाबांची  आठवण आली तर तिच्या सोबत सुध्दा जावे लागते. यांचे जाणे-येणे नेहमीचे असते, त्यामुळे या जावयांना जेवणासाठी जो घरात स्वयंपाक केलेला असतो, तोच वाढला जातो. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हे नेहमीचेच आहेत, *'नित उठे, अन् कपाळ बसे.'* या म्हणीतल्या उक्तीप्रमाणे, म्हणून यांना काही खास मानपान नसतो, म्हणून यांना *'भाकऱ्या जावई'* असं म्हटलं जातं.


*३) ढोकऱ्या जावई* 

या प्रकारात २% जावई मोडतात. हे *'घरजावई'* असतात. या जावयांना घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दूध अशा वस्तू सुध्दा आणून द्याव्या लागतात. झाडलोटीची कामे पण करावी लागतात. घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी यांचा अपमान नक्कीच केला जातो. म्हणून यांना *'ढोकऱ्या जावई'* असं म्हटलं जातंय्.


*४) दयावान जावई* 

हे जावई सासरच्या लोकांना कायम मदत करीत असतात. बायकोचं ऐकतात, शालकाला उसने पैसे देतात. सासरची मंडळी त्यांना कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हे एक-दोन वर्षातून सासरी येत-जात असतात, त्यावेळी त्यांच्याकडे आजूबाजूचे लोक सहानुभूतीपूर्वक बघतात म्हणून यांना *'दयावान जावई'* असं म्हटलं जातंय्.


*५) बेरकी जावई*   

हे दूर असोत किंवा जवळ ते सासुरवाडीला जातच नाहीत अन् गेलेच तर त्यांना हवं तेच जेवायला करावं लागतं, तेवढं करूनही ते गोड काही बोलत नाही, तुसडेपणाने वागतात, म्हणून यांना *'बेरकी जावई'* असं म्हटलं जातंय्.


शेवटी आपल्या पूर्वजांनी अर्थात आपल्या माता-भगिनींनी *'जात्यावरच्या ओवीत'* म्हटलंच आहे, की

*१) जावाई, जावाई नको करू तू मायबाई,*

*जिन्ही वं दिधा जन्म, तिना तिले झाया नही.*


*२) जावयाची जात फार बेईमान सांगती,*

*'लक्ष' गं केलं दान, तरी माझ्या 'ताई' ला गांजती.*


शेवटी जावयाच्या महिमेचं कौतुक करतांना सासुबाई म्हणतात,

*"शंभर ब्राह्मण, एक जेवाले जावाई,*

*म्हणून 'दादासले' पुण्य काशीतून सवाई."*