भूक हव्याशापोटी धावणारी
उपाशीपोटी रहाणारी
पैशासाठी पळणारी
कुणाली ती न समजणारी
                    माणसात मी पशु पहिला
                    आले अंगावर शहारे दाटून
                    भूक पैशाची न कधी समजणारी
                    भरुनी पोट उपाशी येथे सारे
काहीस  नसे  शास्वत या जगी
मोह  असे साऱ्याचा तुज
जाताना रिते  हात असतील
उमगुनी  तू   पैशामागे  धावतोस  कारे   
                   सहज मिळत गेले की
                   भूक जाईल वाढत
                   कष्ट करुनी दाखव
                   मग भूक तुझी मिटेल
समाधान थोडक्यात मानण्या
शिकणार तू कधी रे
काहीच  नाही ह्या जगी
नको  धरू  मोह साऱ्याचा
              भेदभावाचे  असे  कारण  घातक 
              नको करू रे भुकेचे नाटक
              भुकेची आग हि प्रेमाने विझवा
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा