फेसबुक वापरणाऱ्यांसाठी काही सूचना

१) भूकंप झाल्यास त्वरित घराबाहेर पळा, फेसबुक वर status update ... करायलाउभे आयुष्य आहे (जर वाचलात तर ).

२) मुलगी पाहायला गेल्यास तिला "तुझे फेसबुक account आहे का ?" असा मागास प्रश्न विचारू नका. यातून ती फेसबुक वर आहे कि नाही हे समजण्यापेक्षा, तुम्ही किती उतावळे आहात हे दिसते.

३) इकडून तिकडून post ढापून टाकण्यापेक्षा, स्वतः लिहा. फुकटात तुमचे लेखन प्रसिध्द करणारे असे लोकप्रिय ठिकाण दुसरे नाही , तसेच कितीही भंगार लिहिले, तरी ते संपूर्णपणे वाचणारे इथे पुष्कळ महारथी आहेत.

४) एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा - तुम्हाला दारूची सवय असेल तर ती एकवेळ सुटणे सोपे आहे , पण फेसबुकचे व्यसन सुटणे अवघड.

५) दारू सोडण्यासाठी 'बुलढाण्याला' एका मांत्रिकबाबाकडे नेतात , परंतु पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व मांत्रिक मात्र मागास असल्याने , फेसबुकचे व्यसन सोडविणारा एकही मांत्रिक या महाराष्ट्रात नाही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा