*आई ही आई* असते...

● *आयझॅक-न्यूटनची आई* : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??


● *आर्किमिडीजची आई* : गाढवा! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?


● *एडिसनची आई* : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं!


● *जेम्स वॅटची आई* : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!


● *ग्रॅहम बेलची आई* : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!


● *मोनालीसाची आई* : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!


● *गॅलेलियोची आई* : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??


● *कोलंबसची आई* : कुठे ही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!


● *मायकल अँजेलोची आई* : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!


● *बिल गेट्सची आई* : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते!


● *फॅरेनहाइटची आई* : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!


आणि शेवटी..


● *अलबर्ट आईनस्टाइनची आई* : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!


😊😝

गण्याच्या डायनिंग रुम मधील छत गळायला लागले म्हणून प्लंबरला बोलावले.

 

प्लंबर : कधीपासून गळतयं. कधी कळलं...?


गण्या : काल रात्री माझं सूप ३ तास पीत होतो..तरी संपेना...तेंव्हा कळलं.!!

 गोड बोलणा आमका

कोकणातल्या मातीनच

दिला गे बाय ..

मगे तिळगुळ घेऊन गोड

बोलायची गरजच काय ?


वरसून फणसासारखो

काटेरी दिसलो तरी

भुतुर गोड सोन्यासारखो

आसता गे बाय ..

मगे तिळगुळ घेऊन

गोड बोलाची गरजच काय ?


अडल्या पडलेल्यांच्या

हाकेक हाक देता ..

कधी बोलावलास तरी

आसात तसो धावान जाता..

देवासारखो पाठी उभो

रवता गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ?


एखाद्याक जीव लावल्यानं

तर काळीज काढून देता ..

वरवर नाय, मनापासून

सगळा करता ..

बघून डोळ्यात पाणी

भरता गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ?


गरम मसाल्यासारखो

वरवर तिखट दिसलो तरी ..

काळीज रसरशीत हापूस पायरी ..

सगळ्यांनी त्येचो अनुभव

घेतल्यानी गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ?


मालवणी माणसा बद्दल

बोलशीत तितक्या थोडा

कसो घडलो ह्या सगळ्यांका

पडला कोडा ..

नारळातल्या पाण्याचा

साक्षात अमृत गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ? 


मालवणी माणसा बरोबर

दोस्ती केलास काय होतला

सगळ्यांचा भला ..

तुम्ही पण शिकतलास गोड

बोलण्याची कला ..

मी सांगतयता विश्वातला

सत्य आसा गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ??🥰

चार संप्रेरके जी माणसाला‌ आनंदी ठेवतात

श्रीकांत लेले यांच्या वॉलवरून घेतलेला हा लेख...

बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी फिरायला गेलेलो.. मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो होतो.थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की,"ती आयुष्यात आनंदी नाही आहे." माझा विश्वास बसेना कारण लौकिकदृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले,"असे का वाटते तुला?"


"मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की, माझ्याकडे सर्व काही आहे पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे."


आता मी स्वतःला विचारू लागलो की,"खरच मी स्वतः आनंदी आहे का?"


काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला,"नाही! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते."


माझ्यासाठी हा एक धक्का होता.मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे?


आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले.काही लेख वाचले,तज्ञ व्यक्तींशी बोललो. पण काहीच मेळ बसत नव्हता.शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले.


त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे.


तो म्हणाला आपल्या शरीरात 'चार संप्रेरके' असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी,प्रसन्न वाटत राहते-

१. एंडॉर्फिन्स

२. डोपामाईन

३. सेरोटोनिन

४. ऑक्सिटोसिन


आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.


*एंडॉर्फिन्स-*

आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते.

हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते.

       मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण एंडाॅर्फिन्स आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात.

      हसणे हा एंडाॅर्फिन्स निर्मितीसाठी आणखी एक चांगला मार्ग आहे.

      आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे एंडाॅर्फिन्स निर्मितीसाठी मदत करू शकते.


*डोपामाईन-*

आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.

       जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.

   यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते.आपण जेव्हा काम करतो,पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते.आता आपल्याला समजले का खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?


*सेरोटोनिन-*

जेव्हा पण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते.

     जेव्हा आपण स्वार्था पलीकडे जाऊन निसर्गासाठी,समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा सिरोटोनिन तयार होते.एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळेसुद्धा सिरोटोनिन तयार होते.

      हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.


*ऑक्सिटोसिन-*

हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो,आपलेपणाने वागतो.

      जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते.

      मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते.

      तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळेसुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.


तर मित्रांनो,खूपच सोपे आहे. दररोज व्यायाम करून एंडॉर्फिंन्स मिळवा.


छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून डोपामाइन मिळवा.


इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा.


आप्तेष्टांना बिलगून ऑक्सिटोसिन मिळवा ! 


अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात की, तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्‍वासाने सामोरे जाल.


आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते. 


आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी...

१. कोणतातरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा. *-एंडॉर्फिन्स* 


२. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा.कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका. *-डोपामाइन*


३. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा. *-सेरोटोनिन*


४. जवळच्या माणसांना विना संकोच आलिंगन द्यायला शिका.यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतो. *-ऑक्सिटोसिन*


*आनंदी राहा,मस्त जगा !*

💐🌹🙏🏻🌹💐

 डॉक्टर रुग्णाला: तुम्ही दिवसातून किती सिगारेट ओढता?

🚬


रुग्ण: जवळपास वीस....

😳


डॉक्टर : बघा मी तुम्हाला बरा करू शकतो....

👨‍⚕💉💊


पण,


हे करायचे असेल तर सिगारेट सोडावी लागेल.....

🚭


रुग्ण : सिगारेट सोडणे तर खूप कठीण आहे....

😒😕



डॉक्टर - बर...


मग एक काम करा...

🤔

असा नियम करा की..


जेवणानंतरच सिगारेट ओढणार!


डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले....


काही महिन्यांनंतर, रुग्णाची तब्येत पूर्णपणे सुधारली....


डॉक्टर: मी सुचवलेल्या आहारामुळे तुमची तब्येत किती सुधारली आहे ते पहा!


रुग्ण: हो!


पण डॉक्टर, दिवसातून 20 जेवण करणे देखील सोपे काम नाही!

 मन्या एके ठिकाणी सुरक्षारक्षकाच्या नोकरीसाठी 

मुलाखत द्यायला जातो... 



मॅनेजर : इंग्रजी येतं? 



मन्या : का? चोर काय इंग्लंडवरून येणार आहे का?

 स्थळ: सदाशीव पेठ

जोशी: मी असं ऐकलं की तुमचा फोन कुणीतरी चोरला.

बापट: हो ! 

.

जोशी : त्याचा चार्जर मला द्याल का ?

Valentine Week च्या निमित्ताने, बऱ्याच वर्षानी ति आठवली आणि मनात विचार आला की ती सध्या काय करत असेल..?


म्हणून शाळेच्या ग्रुप वर मेसेज टाकला की कोणाला तिच्या बद्दल ठाऊक आहे का..??


एक शाळेतली मित्राने सांगितले की, ती सध्या एका शाळेत शिकवते आणि तुझं नाव असलेल्या मुलांना विनाकारण " बदड बदड बदडत् असते..

घरच्यांनी रागाच्या भरात घरातून हाकलून दिल आणि सक्त ताकीद दिली की काहीतरी बनूनच घरी वापस ये...


माझं पण डोक भनकल. मनाची पक्की खुणगाठ बांधली आणि ठरवलं की काहीतरी बनुनच घरी जायचं.


मग काय दोन तासाने बेशरम बनून घरी गेलो...!

 एक पैलवान बस मधे चढला पण बसायला मागे जागा नसल्याने तो ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला.


ड्रायव्हर सोबत मस्त गप्पा मारत प्रवास सुरु झाला… थोड्या वेळाने ड्रायव्हरला चहा पिण्याची लहर आली. ड्रायव्हर खाली उतरून चहा प्यायला गेला. परत येऊन बघतो तर काय…

गाडीचा गिअर गायब! तेवढ्यात पैलवान म्हणाला, “कवापास्न बघतुया तुम्ही त्यो दांडा हलवू हलवू काढाया बघताय…

आता माणूस गाडी चालीवणार का दांडा काढणार? म्हणून म्याच उपसला बघा दांडा! आता चालवा निवांत गाडी…”

एल पी जी चा अपघाती जन्म

सध्या इराणमध्ये सुरू असणाऱ्या युद्धामुळे एल पी जी च्या तुडवड्याबाबत असंख्य बातम्या, लेख यांनी सोशल मिडिया अगदी तुडुंब भरलेला आहे. खरंच या एल पी जी चे घरांमध्ये किती असाधारण महत्व आहे नई. 


पण तुम्हाला माहितीय का, हा एल पी जी आपल्या स्वयंपाकघराच्या आयुष्यात आला कुठून आणि आणला कोणी? 


तर ही एल पी जी ची कहाणी आहे विसाव्या शतकात घडलेली, अमेरिकेतल्या पिट्सबर्ग शहरातली. एक दिवस एक मोटार चालक अशी एक तक्रार घेऊन गॅरेज मध्ये आला ज्याने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले. त्या मोटारचालकाने त्याच्या गाडीत इंधन भरले, पण त्याचे असे म्हणणे होते की ते खूप लवकर संपून गेले. सर्वांनी तपासले की टाकीला कोठे गळती आहे का? पण नाही, सर्व काही ठीक दिसत होते. मग सर्वांनाच प्रश्न पडला की इंधन नेमके जातेय तरी कुठे? 

शेवटी हे कोडे, कोणतीही समस्या चुटकीसरशी सोडवू शकतात अशी ख्याती असणाऱ्या श्री.  वॉल्टर स्नेलिंग यांच्याकडे आले. कोणत्याही अडचणीचे उत्तर निसर्गालाच विचारावे अश्या धोरणावर चालणारे स्नेलिंग यांना या मोटारचालकाच्या तक्रारीचे कुतूहल वाटले आणि त्यांनी त्यावर प्रायोगिकरीत्या तपास करण्याचे ठरविले. 

त्यांनी एक कॉर्कचे बूच असलेली काचेची बरणी घेतली, पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल खरेदी केले आणि त्यात भरले. मात्र घरी परत येताना ते बूच सारखे बाहेर उडून पडत होते. त्या इंधनात असे काही बाष्पशील घटक होते जे की बंद बरणीतल्या दाबामुळे कॉर्कवर दबाव आणत होते आणि तेथून बाहेर पडून नाहीसे होत होते. हे लक्षात यायला स्नेलिंगना दहा सेकंद देखील लागले नाहीत. 


त्यानंतर त्यांनी त्याचे विश्लेषण वाहनचालकाला समजावून सांगितले. 

नंतर मात्र त्यांनी त्याचा सखोल अभ्यास करण्याचे ठरविले. आपल्या लहानशा प्रयोगशाळेत, स्नेलिंगनी पेट्रोलमधील घटक वेगळे करण्यास आणि त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. त्यातील

काही भागाचे पटकन बाष्पीभवन होत होते. तर काही मागे राहिले.

सर्व अभ्यासाअंती त्यांनी असा निष्कर्ष काढला की, इंधनातील पेट्रोल आणि कोल ऑइल वेगळे काढून टाकल्यानंतर त्यात हलके हायड्रोकार्बनचे अंश शिल्लक राहत आहेत. यात प्रोपेन आणि ब्युटेन यांचा समावेश होता. ते अत्यंत ज्वलनशील आणि हवेत लवकर पसरणारे आहेत. बहुतेक तेल शुद्धीकरण कारखाने त्यांना तेल प्रक्रियेतील त्रासदायक कचरा मानत होते. मात्र

स्नेलिंगना त्यात अपव्यय दिसला नाही. त्यांना त्यात शक्यता दिसली.

त्याकाळी जगातला मानवनिर्मित प्रकाश हा बहुतेक ठिकाणी गॅसच्या दिव्यांवर अवलंबून होता आणि बहुतेक लोकांकडे मुख्य वीजपुरवठा नव्हता. स्नेलिंग यांच्या लक्षात आले की, "जर ते या वायूचे द्रवात रूपांतर करू शकले, तर त्यांच्याकडे बाटलीत साठवून ठेवता येण्याजोगा प्रचंड ऊर्जा असणारा पदार्थ तयार होईल, ज्याला पुन्हा वायूमध्ये रूपांतरित करून प्रकाश किंवा उष्णतेसाठी वापरता येईल.”


आणि हीच ती युरेका मोमेंट जेव्हा वॉल्टर स्नेलिंग यांनी हा द्रवीकृत पेट्रोलियम वायू म्हणजेच "एलपीजी" नावाचा द्रव वायू विकसित केला जो की धातूच्या बाटलीत भरता येऊ शकणार होता आणि सामान्य घरासाठी प्रकाश देऊ शकणार होता. 

मात्र ही पायरी अत्यंत महत्त्वाची होती. विश्वासार्ह कंटेनरशिवाय, वायू त्यातून सहजपणे निसटून गेला असता. तेव्हा या एलपीजीचा वापर अधिक व्यापक करण्यात 'फिलिप्स पेट्रोलियम कंपनीचा' खूप मोठा वाटा होता. जिने सुरुवातीच्या काळात या इंधनाच्या उत्पादनात आणि विपणनात मोठी भूमिका बजावली.

त्यांनी अश्या प्रकारचे धातूचे दंडगोलाकृती कंटेनर बनवले ज्यामुळे रिफायनरींपासून दूर असलेल्या ठिकाणी इंधन पोहोचवणे अत्यंत सुलभ झाले.


गायब होणाऱ्या पेट्रोलच्या तपासाने सुरू झालेल्या या प्रकरणामुळे एक अतिशय अद्भुत अशी नवनिर्मिती होऊन इंधनाच्या क्षेत्रात एक कमालीचा मार्ग खुला झाला.

पण असं असलं तरी कोणतीही नवनिर्मिती लोकांच्या गळी उतरवणं तितकसं सोप्पं काम नसतं. पण स्नेलिंग हे जरी शास्त्रज्ञ असले तरी त्यांत एक उद्योजक सुद्धा दडलेला होता. अखेर १९१२ साली, पेनसिल्व्हेनिया येथील शेतकरी जॉन गॅहरिंग हे त्यांचे पहिले ग्राहक ठरले ज्यांनी हा आविष्कार वापरून पहायची तयारी दर्शवली. 


आणि गंमत म्हणजे गॅहरिंग हे या नवनिर्मितीच्या कामगिरीवर इतके खुश झाले की, १९१९ मध्ये त्यांनी आपल्या १८ वर्षीय मुलीचा मार्जोरीचा हात स्नेलिंग यांच्या हाती दिला. 


कालांतराने प्रकाश आणि उष्णतेनंतर स्वयंपाकघरासाठीही याची उपयुक्तता लक्षात येऊ लागली. 


शहरांचा जसा जसा विकास होऊ लागला, तसे लोक कोळसा किंवा लाकडापेक्षा स्वच्छ इंधनाचा पर्याय शोधू लागली. एलपीजी सिलिंडरने त्यांकरिता एक व्यावहारिक उपाय उपलब्ध करून दिला. हा धातूचा सिलिंडर, जो आकाराने लहान आणि सहज वाहून नेण्याजोगा होता, जगभरात रोजच्या वापरातील एक वस्तू बनला.


स्नेलिंग हे एक विलक्षण चिकाटी, निरीक्षणशक्ती व अंतर्दृष्टी असलेली व्यक्ती होते. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा आणि कुतूहल, त्यासाठी वेळ आणि  संयम याला ते वैयक्तिक महत्त्व देत असत. इतकं असून

प्रयोगशाळेबाहेर मात्र ते आपल्या कुटुंबासोबत एक शांत वैयक्तिक आयुष्य जगत होते. त्यांचे कुटुंब हेच त्यांच्या आयुष्याचे खरे समर्पण असावे, असा त्यांचा हेतू होता.”

इतरांच्या नजरेतून सुटलेल्या समस्या समजून त्या सोडवण्यात त्यांना खरे समाधान मिळत असे.

प्रसिद्धीमध्ये त्यांना क्वचितच रस होता. 

अगदी जगभरातील स्वयंपाकघरांमध्ये, कारखान्यांमध्ये किंवा रस्त्यावरील स्टॉल्समध्ये एलपीजी सिलेंडर जसा कुठल्यातरी कोपऱ्यात शांतपणे पडून असतो, तो क्वचितच कोणाचे लक्ष वेधून घेतो, अगदी तसेच. 

लोक सहजपणे नॉब फिरवतात, ज्योत पेटवतात आणि स्वयंपाक करायला सुरुवात करतात. त्यातून जो चवदार स्वयंपाक तयार होतो, त्याचे श्रेय त्या बनवणाऱ्या व्यक्तीला, त्यातील घटकांना, भांड्याकुंड्यांना, उपकरणांना अगदी कधीकधी शेगडीलाही दिले जाते पण सिलेंडर कोणाच्या खिस गणतीतही नसतो. 


तर मंडळी हा आपला स्वयंपाकघरातील दंडगोलाकृती धातूचा मित्र दिसायला साधा वाटत असला तरी पण त्याच्यामागे जिज्ञासा, संयम आणि अशा एका शास्त्रज्ञाची कहाणी दडलेली आहे, ज्याने एका अशा रहस्याचा पाठलाग करण्याचे ठरवले, ज्याकडे बहुतेक लोकांनी दुर्लक्ष केले असते. आजपर्यंत स्वयंपाकघरात शेगडी पेटवताना, हे शक्य करणाऱ्या रसायनशास्त्रज्ञाबद्दल फार कमी लोकांनी विचार केला असेल. पण आज मात्र आपण त्या थोर शास्त्रज्ञाला वंदन करूया. 


सौ. अवनी दाते - पोलंडकर

 बायको :- अहो चला की रावणदहन बघायला,


नवराः- अगं मी काय लहान आहे का आता?


बायको :- नाही हो! पण दुसऱ्याच्य बायकोकडे बघितलं की कसे हाल होतात ते जरा बघा ना..!

९६० रू ला नविन सिलेंडर घेतला..

घरी १५०० रू ला मिळाला म्हणून सांगितलं 🫣


घरचे २ तास झालं सरकारला शिव्या देत आहेत.. 😉


(६०० रू खिशात, युवा उदयोजक 😎) 

 महाराष्ट्रीयन पालक अस नाही बोलत....


"बाळा थोडंसं हळू बोल-"


तर ते बोलतात....


"अजून मोठ्याने बोंबल म्हणजे आख्या गावाला ऐकायला गेले पाहिजे.."

 मुल्ला नसरुद्दीनच्या चेहऱ्याकडे पाहून डॉक्टर मनकवडे म्हणाले, तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदाच आला आहात, बरोबर ना?


मुल्ला म्हणाला, हो. 


डॉक्टरांनी विचारलं, आधी कुठल्या डॉक्टरला दाखवलंत?


मुल्ला म्हणाला, डॉक्टरकडे नाही, एका केमिस्टकडे गेलो होतो.


डॉक्टर म्हणाले, केमिस्टकडे? अहो, शहाणेसुर्ते दिसताय, आजारी आहात आणि केमिस्टकडे जाता वैद्यकीय सल्ल्यासाठी? केमिस्टला वैद्यकीय ज्ञान असतं, तर तो डॉक्टर नसता का झाला? कमाल झाली तुमची. बरं गेलातच त्याच्याकडे तर त्या गाढवाने काय मूर्खपणाचा सल्ला दिला तुम्हाला?


मुल्ला उत्तरला, तो तुमचं नावं घेऊन म्हणाला, या डॉक्टरांकडे जा. हे हुशार आहेत. 🫣


🤣😂🤣😂😊

 युद्ध संपेल. नेते हस्तांदोलन करतील. म्हातारी स्त्री तिच्या शहीद मुलाची वाट पाहत राहील. ती मुलगी तिच्या प्रिय पतीची वाट पाहत राहील. आणि ती मुले त्यांच्या वीर वडिलांची वाट पाहतील. मला माहित नाही की आपली मातृभूमी कोणी विकली. पण मी पाहिले की किंमत कोणी चुकवली.


-महमूद दरविश


ज्यांना युद्ध हवे होते, त्यांनी कधीही लढाई केली नाही.


ज्यांनी लढाई केली त्यांना कधीच युद्ध नको होते.

 भिकारी : साहेब, अगोदर तुम्ही ५० रुपये देत होते. आता फक्त १० रुपये देता. असं का ? 🤔


मन्या : पहिले मी सिंगल होतो. अता माझं लग्न झालंय. 😇


भिकारी : वा साहेब! माझ्या पैशांनी बायकोसोबत मजा मारताय होय. 🫣


🤣😂🤣😂😊

 नवरा: मी एका समजूतदार स्त्रीशी लग्न करायला हवे होते.


पत्नी: एक समजदार स्त्री कधीच तुमच्याशी लग्न करणार नाही.


नवरा: मला हे सिद्ध करायचे होते. 🫣


🤣😂🤣😂😊

 *पुणेकर* - माझी बायको खूप खर्चिक आहे. रोज ५००-१००० रूपये मागत असते. 🤨


*मित्र*- इतक्या पैश्यांच काय करतात वहिनी ? 🤔


*पुणेकर* - माहीत नाही. मी कधी दिले नाहीत. 🥴


🤣😂🤣😂😊

 आज मी काही कामानिमित्त SXX बँकेत गेलो होतो....🏦

चार तासानंतर मला जाणीव झाली की🤔

.

.

.

विजय माल्या ने यांच्यासोबत योग्यच केले!!!🫣

 ✈️ कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारं विमान उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात अचानक कॉकपिटमधून पायलट जोरात ओरडला, "*Oh My God!*"🥴


विमानात भीतीने शांतता पसरली. अलीकडच्या घटना आठवून सगळे प्रवासी एकमेकांकडे घाबरत पाहू लागले. सगळ्यांचे चेहरे फिक्कट पडले.

😳😱


थोड्याच वेळात पायलटने माफी मागितली,"प्रवाशांनो, क्षमा करा... माझ्यावर गरमागरम कॉफी सांडली, आणि माईक चुकून चालू राहिला. त्यामुळे माझी आरोळी तुम्हाला ऐकू आली. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही इथे येऊन माझी पँट पाहू शकता..."🙏


तेवढ्यात एक काका उठले आणि म्हणाले, "*रांडच्या तू इथे ये आणि आमची पँट बघ*"🫣


🤣😂🤣😂😊

 एकदा आईनस्टाइन एकटा रेस्तराँमध्ये गेला. मेन्यू समोर आला.📃

 

आईनस्टाइनचा गोंधळ उडाला. 🥴मेन्यू पाहून आॅर्डर देण्याची त्याला माहितीच नव्हती. बराच वेळ मेन्यू उलटापालटा करून पाहिल्यावर त्याने वेटरला बोलावून सांगितलं, यातला एखादा बऱ्यापैकी पदार्थ माझ्यासाठी आॅर्डर कर तूच.😉


वेटर म्हणाला, मीही तुमच्यासारखाच निरक्षर आहे. शिकलो असतो तर इथे वेटरची नोकरी करत बसलो असतो का?

 एका गावात एक शेतकरी आणि एक व्यापारी राहात होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला दर आठवड्याला पाच किलो गहू जायचा आणि शेतकऱ्याकडून दर आठवड्याला पाच किलो ज्वारी किंवा बाजरी व्यापाऱ्याकडे जायची. हा त्यांचा वर्षानुवर्षांचा व्यवहार होता.


दोघांमध्ये एकदा कडाक्याचं भांडण झालं. दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाकलं. पण, दोघांमधला व्यवहार सुरू राहिला.🤝


एक दिवस व्यापाऱ्याला शंका आली की शेतकऱ्याकडून आलेली ज्वारी पाच किलो नसावी. त्याने त्याच्याकडच्या काट्यावर तोलून पाहिली. ती साडेचार किलो भरली. पुढच्या वेळी चार किलोच ज्वारी आली. तो खूप संतापला. त्याने शेतकऱ्याला धडा शिकवायचा निर्धार केला. पंचायतीत तक्रार केली.😡


पंचायतीत जाहीर सुनावणी झाली. पंचांनी शेतकऱ्याला विचारलं, तू व्यापाऱ्याला का फसवतोस?🤨


शेतकरी म्हणाला, भांडण झालं म्हणून मी मापात पाप करीन हे शक्यच नाही.😊


व्यापारी भडकून म्हणाला, आता निदान खोटं तरी बोलू नकोस. माझ्याकडच्या काट्यावर तोलून पाहिलीये मी ज्वारी. पाच किलोच्या जागी कधी चार किलो, कधी साडेचार किलो.🤨


शेतकरी तरीही मानायला तयार नव्हता. तेव्हा पंच वैतागून म्हणाले, तुझ्याकडच्या वजनांमध्ये काही गडबड आहे का?🤔


शेतकरी म्हणाला, मी काय व्यापारी आहे का वजनं ठेवायला? माझ्याकडे वजनं नाहीत.


पंच म्हणाले, मग तू व्यापाऱ्याला पाच किलो ज्वारी कशी तोलून देतोस?⚖️


शेतकरी म्हणाला, त्याच्याकडून दर आठवड्याला जो पाच किलो गहू येतो, तीच पिशवी मी तागडीत एका बाजूला टाकतो आणि तेवढीच ज्वारी मापून पाठवतो. 🫣

संपूर्ण जगात भारतच असा देश आहे,😊*


जिथे,तुम्ही रेल्वे स्टेशन वर विचारू शकता🤔


9 वाजताची ट्रेन किती वाजता येणार आहे...🫣

🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃

 उद्यापासून सुरु होणाऱ्या 10 वीच्या (S.S.C.)परीक्षेसाठी सर्व लेकरांना खूप खूप शुभेच्छा.. 

आणि 

सर्वात महत्त्वाचे.. अजिबात घाबरु नका.. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.. 😊


अतिशय सोप्पे असतात हे पेपर.. 👍

.

.

.

मी स्वतः 5-6 वेळा दिले आहेत.. 🫣

 दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात ४०० प्रवासी होते आणि विमानात फक्त २०० जणांच्या जेवणाची व्यवस्था होती.


आता ही चूक कशी दुरुस्त करायची?


सर्व एअरलाइन कर्मचारी विचारात पडले.


मग, एका हुशार फ्लाइट अटेंडंटला वेगळाच विचार सुचला!


फ्लाइटमध्ये सुमारे ३० मिनिटांनी, तिने घाबरत घाबरत एक घोषणा केली, "नमस्कार, हे कसे घडले हे मला माहित नाही, पण आज विमानात ४०० प्रवासी आहेत आणि आमच्याकडे फक्त २०० जेवणे आहेत! जो कोणी दुसऱ्यासाठी जेवण सोडण्यास तयार असेल त्याला संपूर्ण प्रवास कालावधीसाठी मोफत अमर्यादित दारू मिळेल!"


एका तासाच्या आत, त्यांची पुढची घोषणा होती...


"नमस्कार, जर कोणाला त्यांचा विचार बदलायचा असेल, तर आमच्याकडे अजूनही १८० जेवणे उपलब्ध आहेत!"


बोध : "दारू पिणारे फार दयाळू आणि इतरांचा विचार प्रथम करणारे असतात. कृपया त्यांचा आदर करा...!,,, 🍻🍻

 एका माणसाने व्हाईट हाऊसला फोन केला आणि म्हटले: मला अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती व्हायचे आहे...😇


ऑपरेटर: तू वेडा आहेस का?🤔


माणूस: हे अनिवार्य आहे का?🫣

बुवाबाजी जादू

1. जादू कुंकू काळे करण्याची...


शिक्षीत लोकांनी आपल्या शिक्षणाचा व विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे अर्धा लहान चमचाभर कुंकूवात निरमा पावडर घ्या निरमा पावडरात अल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते नेमके हिच कृती करून बुवालोक स्त्रियांना घाबरवून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात.


2. जादू हळदीचे कुंकू करण्याची.,..


बाबा लोक हळदीमध्ये थोडा प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्या भाबड्या स्त्रियांना घाबरवून फसवितात.


_३_ वस्तू गोड करणे...


सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते  बाबा लोक ज्या ही वस्तूला हात लावतील ती वस्तू गोड होते तिर्थ गोड होते यासाठी बाबा लोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात.


_४_  लिबांतून रक्त काढणे,..


साहित्य--एक लिबूं  चाकू मिथील ऑरेंज च द्रावण चाकुच्या पात्याला मिथील ऑरेंजच द्रावण लावावे थोड्या वेळाने त्या चाकुणे लिबूं कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो ही कृती तुम्ही कोणत्याही मंत्र न म्हणता करू दाखवू शकतात व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता


_५_ ताब्यांचे भांडे वर उचलणे....


ताब्यांचे लोटी घ्या.(भरणे)  ते काठोकाठ तांदूळाणे भरूण घ्या त्यामध्ये एक साधारण मोठा पेचकस घेवून तो 4ते5 वेळा टोचा तांदूळाचे दाणे हवा निघून गेल्यावर एकदम फिट होतात तेव्हा पेचकस वर उचलूण घ्या ताब्यां वर उचलला जाईल.


_६_ रसाने भरलेल्या लिंबूतून अग्नीच्या ज्वाळा निघणे......


चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.

यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.


_७_ पाण्याने दिवा कसा पेटू शकतो....


एका दिव्यात पाणी घ्या. त्यात कॅल्शिअम कार्बाईडचे छोटे खडे टाका आणि पेटवा. दिवा आपोआप पेटेल. हे कसे झाले?

जेव्हा आपण पाण्यात कॅल्शिअम कार्बाईडचे खडे टाकतो तेव्हा त्यांची पाण्यावर अभिक्रिया होऊन 'अॅसिटिलीन' वायू तयार होतो जो ऑक्सीजनच्या सानिध्यात जळतो व पांढरी शुभ्र ज्योत तयार होते. आणि लोकांना वाटतं दिवा पाण्याने पेटला. तुम्हीसुद्धा करून पहा हे खडे तुम्हाला एखाद्या वेल्डरकडे सहज उपलब्ध होतील. मग कधी पेटवणार 'पाण्याने' दिवा..?


_८_ आपोआप त्या मेणबत्त्या पेटणे....


मित्रांनो चमत्कार सोपा आहे पण खूप काळजी घ्यावी लागेल.

तुम्हाला पिवळा फॉस्फरस व कार्बनडाय सल्फाईडचं द्रावण वापरायचं आहे. पिवळ्या फॉस्फरसचा ज्वलनांक केवळ ३४॰ से. असल्याने तो सामान्य तापमानातही लगेच पेट घेतो हे आपण दहावीत शिकलोय. तर या फॉस्फरसला कार्बनडाय सल्फाईडमध्ये विरघळवा. आणि तयार झालेल्या द्रावणात मेणबत्तीची वात भिजवा. कार्बनडाय सल्फाईड बाष्पनशील असल्याने तो हवेत उडून जातो व वातीवर फक्त पिवळा फॉस्फरस रहातो.. त्याच्या कणांना हवा लागली कि तो लगेच पेट घेतो पर्यायाने वातसुद्धा सहज पेट घेते आणि तुम्ही चमत्कारी बाबा ठरता.


_९_ लिंबातून अक्षरश: ज्वाळा निघू  लागणे....


एक चाकू घ्या. चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.

यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.


_१०_ *अग्नीशिवाय यज्ञ पेटवणे...


या चमत्कारात मांत्रिक बाबा यज्ञाची सर्व सामग्री यज्ञकुंडात टाकतो पण आपल्या नकळत त्यासोबत नारळाची बुरी आणि कागदाचे तुकडेही टाकतो. मंत्राचा जाप करत तो त्यावर यज्ञात टाकावयाची विभूती व गायीचे तुप सोडतो आणि काय चमत्कार यज्ञ आगपेटीशिवाय आपोआप पेटतो आणि आपण धन्य होऊन बाबाला शरण जातो.

पण मित्रांनो खरी गंमत इथेच आहे मंत्र म्हणताना बाबा जी विभूती त्या न पेटलेल्या यज्ञावर टाकतो ती Potassium Permanganate (KMno4) ची बारीक पावडर असते व ती दिसायला काळी असल्याने कुणाला संशयही येत नाही. आणि गायीचे शुद्ध तुप हे ग्लिसरीनचे काम करते. ज्यावेळेस बाबा हे तुप त्या बुक्कीवर सोडतो तेव्हा Potassium permanganate वर ग्लिसरीनची प्रक्रिया होऊन निळसर धूर निघतो आणि यज्ञ पेट घेतो. 

तर मित्रहो, आहे कि नाही जादू..!!

अमेरिकन पोस्टल सर्व्हिसने राष्ट्रपतींचे चित्र असलेले एक स्टॅम्प जारी केले, परंतु नवीन स्टॅम्प लिफाफ्यांना चिकटला नाही.


राष्ट्रपती संतापले आणि त्यांनी ताबडतोब संपूर्ण चौकशीचे आदेश दिले.


आठवड्यांच्या चाचणी आणि १.७३ दशलक्ष डॉलर्स खर्चानंतर, अध्यक्षीय आयोगाने खालील निष्कर्ष प्रकाशित केले:


स्टॅम्प परिपूर्ण स्थितीत आहे; चिकटवण्यामध्ये अजिबात कोणतीही समस्या नाही.


लोक चुकीच्या बाजूला थुंकत आहेत.🫣

वडिलांनी मुलाला सांगितला "परीक्षा" शब्दाचा नवीन अर्थ

"मन लावून अभ्यास करून परीक्षा दिलीस तर... 

कदाचित परी मिळेल 😍

नाहीतर रिक्षा आहेच"🫣

पोरगं अभ्यासाला लागलं !!!😇

सत्ता नामक आगीमधले सरपण कॉमन मॅन असे 
त्यांना मेले जाळत जाणे एकमेव हा प्लॅन असे 

सजग नागरिक नको तयांना फक्त खुळेसे फॅन हवे

सुई विवेकाची न टोचता श्रवणभक्तीचे कान हवे

सत्य मांडता राष्ट्रद्रोह, प्रक्षोभ म्हणा ही रीत नवी
धर्म सांगता लोभ, मोह, अन कामोत्सुकही संतपदी
फक्त रचावे सुबक सापळे आणि गाळे ते घोटावे
रेषेवरचे गरीब सकाळ ते आणिक खाली लोटावे
पुस्तक केवळ बदला बाकी शिक्षण शिमगा घालावा नि दर्जावरती प्रश्न उठवता नुसत्या बोंबा ठोकाव्या
परंपरा नि वैविध्याची कवने जगभर मिरवावी 
झुंडी जमवून तीच विविधता वेशीबाहेर टांगावी
बडे थोरले बिजनेस बापे कर्जमुक्ती सुख ओरपती 
धरणे बांधून घर बुडलेले विस्थापित ते झोडपती
दरी ही ताणून वाढवती 
खुळी स्वप्नं ते दाखवती 
आपली भाकरी शेकवती
महागाईचा जाब मागता माना तितक्या वळविती
विकास कुजका विश्वगुरुपद फुटके सगळे स्तोम असे 
नेत्यावरती जीव जडवणे सिंड्रोम हा स्टॉकहोम असे
x

काल वडिलांना मी फॉरेक्स ट्रेडिंग व क्रिप्टो करन्सी बद्दल अभ्यासपूर्ण माहिती सांगितली..😇

.

.

.

आज वडिलांनी माझ्या नावावर असलेले 5 एकर शेत आपल्या नावावर करून घेतली..🫣

मानसिक गुलामगिरी

 एके दिवशी राजा आपल्या दरबारात बढाया मारत असतो. तो म्हणतो, "काल मी शिकारीला गेलो होतो. तिथे मला एक काळवीट दिसले. मी इतक्या वेगाने आणि अशा कोनातून बाण मारला की, तो बाण एकाच वेळी त्या हरिणाच्या डोळ्याला लागला आणि तिथून आरपार जाऊन थेट त्याच्या मागच्या पायाच्या खुरामध्ये अडकला!

दरबारी लोक चक्रावून जातात. एकाच बाणाने डोळा आणि पाय एकत्र कसे काय भेदले जातील? हे अशक्य आहे. पण राजासमोर बोलायची कोणाची हिंमत नसते.

सगळे लोक भाटाकडे बघतात. भाट अजिबात न डगमगता म्हणतो, "महाराज, यात नवल ते काय? तुम्ही तर उत्तम धनुर्धर आहातच, पण त्या हरिणाची स्थितीही तशीच होती."

भाट पुढे त्या थापेचे  'रसभरीत समर्थन' करताना म्हणतो:

"महाराज, तो बाण सुटला तेव्हा नेमका त्याच क्षणी त्या हरिणाच्या डोळ्याला खाज सुटली होती. त्यामुळे त्याने आपला मागचा पाय उचलून डोळा खाजवण्यासाठी तोंडापाशी नेला होता. त्याच स्थितीत तुमचा बाण आला, तो आधी त्याच्या डोळ्यातून गेला आणि पाय तिथेच असल्याने तो पायातही रुतला!"

राजा खूश होतो, पण त्यालाही समजते की भाटाने आपली इज्जत वाचवली आहे. नंतर राजा हळूच भाटाला विचारतो, "अरे, पण असे घडणे अशक्यच होते."

तेव्हा भाट अतिशय मार्मिक उत्तर देतो. तो म्हणतो, "महाराज, तुम्ही थापा मारताना थोड्या जपून मारत जा. तुमच्या एका थापेला 'सत्य' करण्यासाठी मला त्या बिचाऱ्या हरिणाला दोन पायांवर उभे करून त्याचे पाय डोळ्यापर्यंत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली!"

लोकशाही राज्य पद्धतीत साधी माणसे आणि पार्टी लायनर मंडळी अश्याच पद्धतीने आपल्या पक्षाचे समर्थन करत असतात. 

भाट भाग्यवान होता , राजाच्या दरबारी होता. राजा त्याला पोसत होता...लोकांना जरी त्याने थापा मारल्या तरी राजाला सत्य सांगण्याचे त्याच्यात धाडस तरी होते.  लोकशाही मधले भाट घरचे खाऊन अश्या लष्कराच्या भाकर्‍या भाजतात. आणि ज्याच्यासाठी अशी जोरदार बॅटिंग करतात त्याचा आणि यांचा आयुष्यात संबंध येण्याची शक्यता सुद्धा नसते... 

मानसिक गुलामगिरी ही एक फार वाईट गोष्ट आहे. 

 आपण जग सोडून पळालो आहोत, त्याअर्थी जग असार आहे, या जगातले संसारी लोक मूर्ख आहेत आणि आपण शहाणे आहोत, अशी अनेक बोगस संन्याशांची समजूत असते. ही मंडळी हिमालयात कंटाळली की समाजात येऊन डायरेक्ट उद्धाराच्या कार्याला लागतात. समाज आपल्या बोधामृतासाठी ताटकळत बसलेला आहे, अशी त्यांची समजूत असते.

अशाच एका साधुबुवांनी तुरुंगामध्ये प्रवचनं देऊन कैद्यांना सुधारण्याचा चंग बांधला होता. त्यांची प्रवचनं ऐकणं हे सद्वर्तन मानून कैद्यांना त्यांच्या शिक्षेत सूट मिळत असे. त्यामुळे कैदी डुलक्या काढायला का होईना त्यांच्या प्रवचनांना हजेरी लावत. या तुरुंगात एक विकृत खुनी आणि बलात्कारी दरोडेखोरही बंदिवान होता. तो या प्रवचनांना नियमित हजेरी लावायचा. दहाएक वर्षं सतत प्रवचनं ऐकली होती त्याने. त्याची सुटका होण्याचा दिवस आला, तेव्हा साधुमहाराजांनी तुरुंगाधिकाऱ्यांना सांगितलं की मला त्या कैद्याला भेटायचंय.

स्वामी महाराज त्या कैद्याला सुटकेच्या दिवशी भेटले आणि त्यांनी विचारलं, आता तुम्ही सुटका झाल्यावर काय करणार? पुन्हा जुन्याच उद्योगांकडे वळणार की इतर काही करणार?

तो कैदी म्हणाला, नाही. आता मी माझ्या जन्मगावी परत जाणार. तिथे माझी थोडी शेती आहे, घर आहे. तिथे राहणार आणि यापुढे आराम करणार.

साधुबुवांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आपल्या अखंड प्रवचनधारेने एका दगडाला पाझर फोडला, एका माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणलं, त्याला सुधारलं या कल्पनेने ते खूष झाले आणि त्याला म्हणाले, तुम्ही मला केवढा आनंद दिलाय याची कल्पना नाही तुम्हाला. माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझी सगळी प्रवचनं आज सार्थ सिद्ध झाली. त्यांनी तुम्हाला सन्मार्गावर आणलं.

तो दरोडेखोर फिस्कारून म्हणाला, ओ महाराज, तुमच्या त्या कंटाळवाण्या बडबडीचा याच्याशी काही संबंध नाही. सुधारणा व्हायला मी बिघडलोच कुठे होतो? कुठल्याही धंद्यातला माणूस वय झाल्यावर, हातपाय थकल्यावर रिटायर होतो की नाही? आराम करतो की नाही? मी फक्त रिटायर होतोय… रिटायर.

 एक दिवस बायको सहज म्हणाली “ऐका ना, मी थोडा वेळ मैत्रिणी सोबत बाहेर जातेय.”

मोबाईल बघत बसलेला तीचा पती फक्त वर पाहत म्हणाला, “ठीक आहे. मजा करा.”

ती थोडी चकित झाली. नेहमी नाही म्हणणारा काही गरज ये का , गेलंच पाहिजे का उशीर करू नको—असे काहीतरी सांगायचा . पण त्या दिवशी काहीच नाही — ना सुस्कारा, ना प्रश्न, फक्त शांत “ठीक आहे.”

काही तासांनी त्यांचा किशोरवयीन मुलगा किचनमध्ये आला. हातात एक कागद आणि चेहरा फिक्का.

“बाबा ” तो हळू आवाजात म्हणाला, “माझे मॉक परीक्षेचे निकाल आले… आणि ते खूप वाईट आहेत.”

तो थिजून उभा राहिला, कारण त्याला नेहमीप्रमाणे ओरडा होईल अशी खात्री होती. बापा ला त्याच्या अभ्यासाची खूप काळजी, म्हणून आज पुन्हा ‘वेळ वाया घालवला’, ‘क्षमता वाया घालवत आहेस’ अशी भाषणे ऐकायला मिळतील — अशी त्याची तयारी होती.

पण त्याऐवजी ती शांतपणे म्हणाला , “ठीक आहे.”

तो विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला, “फक्त… ठीक आहे?”

“हो,” तो प्रेमाने म्हणाला . “जास्त अभ्यास केलास तर पुढच्या वेळी चांगले होईल. नाही केला तर सेमिस्टर रिपीट करावा लागेल. तुझा निर्णय. मी दोन्ही परिस्थितीत तुझ्या पाठीशी आहे.”

तो हैराण झाला. बाबा एवढ शांत कधी पासून झाले.

दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची मुलगी घाबरतच घरात आली. हॉलमध्ये थोडं थबकून ती म्हणाली, “बाबा … मी… मी कारला धडक दिली. फार मोठं नाही, पण डेंट पडलाय.”

बाबा ना ओरडले, ना रागावल, काहीच नाही. तो फक्त म्हणाला , “ठीक आहे. उद्या गाडी वर्कशॉपमध्ये देऊन टाक.”

मुलगी थिजलीच. “तुम्हाला… राग नाही?”

बाबा ने मंद स्मित केले. “नाही. रागावल्यानं कार परत नीट होणार नाही. पुढच्या वेळी जपून चालव.”

आता घरातील सगळेच चिंतित झाले. हा माणूस — तीच पतो , त्यांचा बाबा — पूर्वीसारखी राहिला नव्हता. तो कधी तापट, पटकन तणावात येणारा , पटकन बोलून जाणारा होता . आता मात्र शांत, स्थिर, अगदी प्रसन्न दिसत होता .

ते एकमेकांत कुजबुजायला लागले — काही बिनसले आहे का? तब्येत बरी नाही का? काही घडले आहे का?

शेवटी त्या संध्याकाळी, सगळ्यांनी त्याला किचनच्या टेबलाजवळ बसवले.

“ऐका ,” बायको म्हणाली , “तूम्ही अलीकडे खूप बदलले आहे. काही होतंय तरी तुम्हाला राग येत नाही, तूम्ही प्रतिक्रिया देत नाही. सगळं ठीक आहे ना?”

तो त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहत हसला .

“काहीच बिनसलं नाही,” तो म्हणाला . “सगळं अगदी योग्य चाललंय. मला फक्त एक गोष्ट समजली आहे.”

ते सगळे शांत झाले.

“खूप वर्षांनी लक्षात आलं,” तो म्हणाला, “की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच जबाबदार असतो.”

बायको ने भुवया उंचावल्या. “काय म्हणायचंय तुम्हाला?”

तो हात जोडून म्हणाला , “मी आधी प्रत्येक गोष्टीची चिंता करायचो . तू उशीर केलास तर काळजी, मुलांचे मार्क कमी आले तर अपराधीपणा, काही तुटलं तर राग, कुणी नाराज झालं तर ते ठीक करण्याची धडपड. मी सगळ्यांच्या समस्या माझ्या मानायचो . पण एक दिवस लक्षात आलं — माझ्या काळजीने त्यांची समस्या सुटत नाही. फक्त माझी शांतता नष्ट होते.”

मुलगी शांतपणे ऐकत होती.

तो पुढे म्हणाला , “माझ्या तणावाने तुम्हाला काही फायदा होत नाही. माझी धडपड तुमचं आयुष्य सोपं करत नाही — फक्त माझं कठीण करते. मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो , प्रेम देऊ शकतो , साथ देऊ शकतो. पण तुमचं आयुष्य मी तुमच्यासाठी जगू शकत नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात — चांगले असोत वा वाईट.”

तो क्षणभर थांबला आणि पुन्हा हसला. “म्हणून मी ठरवलं — जे माझ्या नियंत्रणात नाही ते नियंत्रित करण्याचा प्रयत्नच करणार नाही.”

मुलगा पुढे झुकत विचारला, “म्हणजे… तुम्हाला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही?”

तो म्हणाला, “अगदी वाटतं. पण चिंता करणे आणि नियंत्रण ठेवणे यात फरक असतो. मी तुमच्यावर माया करू शकतो,तुम्हाला पैसे पुरवू शकतो पण त्यासाठी माझी शांतता हरवू नये.”

घरात शांतता पसरली.

ती तिघांकडे प्रेमाने पाहत म्हणाली, “माझं काम — तुम्हांला प्रेम देणं, तुम्हाला काय हवं नको ते देण,मार्गदर्शन करणं, आणि गरज पडली की तुमच्या पाठीशी उभं राहणं. पण तुमचं काम — स्वतःचं आयुष्य स्वतः हाताळणं. निर्णय घेणं. त्यांचे परिणाम भोगणं. तसंच प्रत्येकजण मोठा होतो.”

तो शांतपणे म्हणाला , “म्हणून आता काही चुकीचं झालं तरी मी स्वतःला आठवण देतो — हे माझं दुरुस्त करण्यासारखं नाही. मी शांत राहीन. तुम्ही यातून शिकाल यावर विश्वास ठेवेन. कारण जीवन असंच असतं — धडे शिकवंत.”

थोडा वेळ घरात संपूर्ण शांतता होती. वातावरण मात्र बदललं होतं.

बायको ने त्याचा हात हातात घेत म्हणाली , “तूम्ही आज आम्हा सगळ्यांना काहीतरी शिकवलं.”

तो हसला. “कदाचित. पण हे मला स्वतःलाच आधी शिकावं लागलं.”

त्या रात्री सगळ्यांनी त्याच्या शब्दांवर विचार केला.

मुलगा पुन्हा अभ्यासाला बसला — बाप ओरडला म्हणून नाही, पण जबाबदारी त्याची आहे हे त्याला जाणवलं म्हणून. मुलीने स्वतःच कारची दुरुस्ती ठरवली आणि इन्शुरन्सची प्रक्रिया समजून घेतली. बायको घरातील सगळं वेळेत आवरून ठेवू लागली — कारण तो सक्ती करत होता म्हणून नाही, तर तिला तसं करावंसं वाटलं म्हणून.

आणि हळूहळू घर हलकं वाटू लागलं.

कोणीही भीतीने नाही तर समजुतीने वागू लागले. कोणीही कशावर ओरडा होईल या कल्पनेने दडपून राहत नव्हते.

कारण घरातला एक जरी माणूस शांतता स्वीकारतो, तर ती शांतता सगळ्यांत पसरत जाते.

एक जण नियंत्रण सोडतो, आणि बाकी लोक स्वतःला नियंत्रित करायला शिकतात.

आणि अशा प्रकारे — शांतता प्रेमा सारखी पसरते.

कुणावरही रागावून दडपण टाकून हक्क गाजवून समोरच्या ना नियंत्रित करू नका 

त्यापेक्षा आपण आपल्या जबाबदारीने वागून समोरच्याला त्यांच्या जबाबदारी ची जाणीव करून दया.

 तो पुण्यात नवा होता.😊

रोज त्या ठरलेल्या रस्त्याने जायचा.🛣️

एक आजीबाई रस्त्यावर वडापावाची गाडी चालवायच्या. या वयात त्यांना काम करताना पाहून त्याला आईची आठवण यायची. १५ रुपयांचा वडापाव होता. तो रोज त्यांच्यासमोर १५ रुपये सुटे ठेवायचा आणि जंक फूड खायचं नसल्याने वडापाव न घेताच निघून जायचा. 🚶

असं महिनाभर चाललं. 

एक दिवस त्याने १५ रुपये ठेवले आणि पुढे निघायच्या आत त्या आज्जीने त्याचा हात धरून त्याला थांबवलं… तो म्हणाला, मी रोज १५ रुपये ठेवतो आणि वडापाव न घेताच निघून जातो, असं का करतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?🤔

आजीबाई खरखरीत आवाजात म्हणाल्या, नाही. मी तुला हे सांगायला थांबवलंय की गेल्या आठवड्यापासूनच वडापावाची किंमत २० रुपये झाली आहे!!!🫣