पुण्यात मुबलक प्रमाणात व काहीच कष्ट न करता काय मिळते ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अपमान !!!
नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,
गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,
“तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?”

गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….!!!

आवाज हुंदक्यांचा

आवाज हुंदक्यांचा, ओठात दाबलेला !
ओथंब आठवांचा डोळ्यात दाटलेला !!

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी..
रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला !!

बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा...
होता सुगंध श्वासा- श्वासात माळलेला !!

तो तीळ जीवघेणा खांदयावरी सख्याच्या...
मग चंद्र पौर्णिमेचा फ़िकाच वाटलेला !!

भाळावरी सख्याच्या सजतात घर्मबिंदू...
पडता मिठी खुलावा शृंगार राखलेला !!

गालांवरी उमटली होती पहाट लाली
प्राजक्त देठ तेव्हा भाळून लाजलेला !!

कल्लोळ भावनांचा जाणेल रातराणी
भावार्थ मौनतेचा ओठात आटलेला !!

- सुप्रिया

ती माझी जन्मसाथी

माझा जन्म झाल्यापासुन तीचे आणि माझे नाते आहे.मी निराश असलो की तिच्या डोळ्यातुन अश्रु येतात आणि मी जेव्हा हसतो तेव्हा तीच्या गालावरच्या खळ्या मला वेडावतात.दुखाःच्या उन्हात ती अधिकच गडद होत जाते आणि सुखाच्या वर्षावात ती माझ्याबरोबर चिंब भिजते.मी तीचा श्वास आहे आणि मीच तीचा आत्मा.मी तिला कधीच काही सांगत नाही तरिही ती सर्व जाणुन असते.रोज मी तिला पायदळी तुडवतो पण तीचे प्रेम आटत नाही.माझ्याशिवाय तीचे विश्व नाही ती पुर्णपणे मला समर्पित आहे.मी ज्यादिवशी अलविदा घेईल तेव्हा तीही या जगाचा माझ्याबरोबर निरोप घेईल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

ती माझी सावली आहे !

पोरगी पटली

कॉलेजला जाताना समोरचं
तिला बघितली,
मी दिसताचं चालता चालता जरा थांबली..
माझ्याकडे बघुन गोड हसली,
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली,
पण
हत्तीच्या मारी
मागे वळुन बघितलं..
तर तिची मैत्रीण दिसली.. !!
भूत १- " तू कसा मेलास?"
.
भूत २- " थंडी ने कुडकुडून मेलो. आणि तू?
.
भूत १- " काय सांगू यार........ बायकोवर संशय होता, सगळा घर शोधलं, कोणी नव्हतं.......... लाजेने मेलो.
.
भूत २- " अरे साल्या फ्रीज तरी उघडायचा ........ दोघ वाचलो असतो!
दैवाची साथ तर मिळेलच
सोबत हवीये आता मैत्रीची
हसणे रडवणे होतच राहील
गरज आहे आता सोज्वळ मैत्रीच्या खांद्याची !