हरवलेल्या संवेदना...

पैसा खुळखुळतोय, पण माणुसकी हरवत चालली आहे. वाटेल तशी वाहने धावत आहेत
आणि अपघात वाढत आहेत; पण जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे.
समृद्धी येऊनही आपल्या संवेदना, भावना जणू गोठल्या आहेत. कधी जागं होणार
आपल्यातलं "माणूसपण'?

"जखमी तरुणाला लोटले मृत्यूच्या खाईत' ही बातमी वाचली आणि मन सुन्न झाले.
मनात विचार आला, 23 वर्षांचा तरुण मुलगा गेला. त्याच्या कुटुंबीयांवर
आकाशच कोसळले असेल. त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली असेल? जी मुलं
गाडी चालवीत होती, ती नक्कीच धुंदीत असतील. त्यांच्याच वयाच्या एका
मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचं त्यांना काहीच वाटलं नसेल का?
बिचारा जखमी अवस्थेतही त्या मुलांजवळ मदत मागत होता, आपल्या आईला फोन
करायला सांगत होता; तरीही त्या निष्ठुरांना त्याची कीव आली नाही. "या
जागी आपण असतो तर!' असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. निष्ठुरपणे
त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी सोडून सर्व जण पसार झाले.

अशा तऱ्हेच्या घटना अनेक ठिकाणी अनेक वेळा घडत असतात. त्या वेळी
प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण झालेली असते; पण नंतर त्यांचा शोध,
चौकशी, पुरावे यामध्ये वेळ जातो, तोवर लोकं विसरून जातात. मग वाटतं, या
अशा गुन्हेगारांना कधी शिक्षा होणारच नाही. स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या
लोकांमध्ये संवेदना, माणुसकी हरवत चालली आहे, फसवणूक लुबाडणूक वाढत आहे.
माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे लहान वयातच गाड्या चालवणे, व्यसनाच्या
आहारी जाणे, नियमांचे उल्लंघन करणे या गोष्टी अफाट वाढल्या आहेत. धुंदीत
गाड्या चालवून दुसऱ्यांचे जीव घेतात, मदतीसाठी कुणी हाका मारल्या तर
दुर्लक्ष करतात, त्यामुळे कित्येक जीव उपचाराअभावी मृत्यू पावतात. काही
बातम्या वाचून अंगावर शहारे येतात. छोटी छोटी मुलं गाडीच्या चाकाखाली
चिरडली जातात, ज्येष्ठ नागरिक ठोकरले जातात. गाडी चालविणाऱ्या
प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे, की या मुलांच्या जागी
उद्या आपली मुलंही असू शकतील, या वृद्धांच्या जागी आपले आई-वडील असू
शकतील. वाहन चालविणाऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की
प्रत्येकाचीच कुणीतरी घरी वाट पाहत असतं त्यामुळे प्रत्येकानेच सावधानता
बाळगायला पाहिजे. पण असं होत नाही. आपण "माणूस' आहोत, हेच सर्व जण विसरत
चालले आहेत. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे! त्यांना भावना आहेत. एखादा पक्षी
मेला तर त्याचे नातलग एकमेकांना हाका मारून लगोलग भोवती गोळा होतात. जखमी
असेल तर काळजी घेतात; पण आपण माणसे आहोत याची जाणीवही उरली नाही. पूर्वी
असं नव्हतं. दुसऱ्याच्या जाण्यानंही, दुःखानंही डोळे पाणावत असत; पण आज
सगळंच हरवलंय. हीच का आमची आधुनिकता?

आज प्रत्येक माणसागणिक घरात वाहन आहे. ही चैन नसून, गरज आहे. पण या अशा
बेफाम गाड्या चालविणाऱ्यांचाही सुळसुळाट वाढला आहे. आज मला वाटतं,
प्रत्येक घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की संध्याकाळी सर्व जण
घरात सुखरूप परत आले की आजचा दिवस पार पडला म्हणून परमेश्‍वराचे आभार
मानत असतील. स्त्री ही ममतेचा सागर असते असं म्हणतात. तीच स्त्री आज
मुलीचा गर्भ आहे म्हणून तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकत आहे, मग
कुठं हरवली संवेदना?

म्हणून माणसांप्रमाणे संवेदना जागृत ठेवा; व्यावहारिक न होता भावनिक होऊन
जागा. आज गरज आहे संवेदना जपण्याची... माणुसकी जपण्याची...

संध्या गावित...
एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस
ओरडला,

”अत्रे तुम्ही कुत्रे....”

काही वेळ सर्वत्र शांतता पसरली.
.
.
.
.
.
.
.
.
.
अत्रे त्याला म्हणाले, “ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब
आणि मोटारीचे टायर”
भिकारी : ये माय भाकर दे .....
..
..
..
..
आजी : अजून भाकरी झाल्या नाही नंतर ये

भिकारी : हा माझा मोबाईल नंबर घे.....
आणि भाकर झाल्यावर मला मिस काल दे..

आजी : अरे बाबा, त्यापेक्षा मी माझा फेसबुक स्टेटस अपडेट करते भाकरी झाल्यावर ...
...ते बघ आणि मग ये ...

टाय-बो पार्टी

एकदा चम्या अगदी बारीक चेहरा करून येतो तर पम्या त्याला विचारतो ,''काय झाले? काल तर तू एकदम खुशीत होतास टाय-बो पार्टीला जायचे आहे म्हंणून?"

चम्या म्हणतो "गेलो होतो ना, पण तिथे लोक बाकीचे पण कपडे घालून आलेले होते."

पवित्र चिकन मटन

प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शेजारी कठोर कॅथोलीक होते ... आणि त्यांना त्यांच्या धर्मगुरुने शुक्रवारी चिकन आणि मटन खाण्यास मनाई केली होती. परंतू शुक्रवारच्या रात्री संताच्या घरुन येणारी चिकन आणि मटणाची सुगंध त्या कॅथोलीक लोकांना खुप विचलित करत असे. त्यामुळे त्यांनी शेवटी आपल्या धर्मगुरुला या बाबतीत सांगितले.

धर्मगुरु संताला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला आणि त्यांनी त्याला कॅथोलीक बनन्याचा सल्ला दिला. त्या धर्मगुरुने आणि त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची खुप मनधरणी केल्यानंतर संता सिंग अनिच्छेना का होईना एक दिवस कॅथोलीक चर्चमधे त्यांची प्रार्थना अटेंड करण्यास गेला. तो प्रार्थनेसाठी उभा असतांना अचानक त्या धर्मगुरुने संताच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडले आणि ते म्हणाले, '' तु धर्माने सिख होता, आणि सिख म्हणूनच मोठा झाला आहेस, परंतू आता तु कॅथोलीक आहेस ''

संताचे शेजारी खुप खुश होते - पण पुढील शुक्रवार येई पर्यंतच.

पुढील शुक्रवारच्या रात्री पुन्हा संताच्या घरातून चिकन आणि मटनाचा सुवास सगळ्या चाळीत पसरला. शेजाऱ्यांनी ताबडतोब कॅथोलीक धर्मगुरुला बोलावले. धर्मगुरु जेव्हा संताच्या घराच्या मागच्या बाजुने त्याच्या घरात शिरले आणि त्याला रागावण्यासाठी तयारच होते, जेव्हा ते अचानक थांबले आणि आश्चर्याने संताकडे पाहू लागले.

तिथे संता एक छोटी पवित्र पाण्याची शीशी घेवून उभा होता. त्याने ते पवित्र पाणी चिकन आणि मटनावर शिंपडले आणि म्हणाला, '' ओए... तुम्ही जन्माने चिकन आणि बकरा होतास, आणि चिकन आणि बकरा म्हणूनच मोठे झालात , पण यारा आता तुम्ही आलू आणि टमाटर आहात ''

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं

मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं



श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,

सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव

पार्कात विराजती उद्यान गणेश

नांवाजलेली शाळा-कॊलेजं

म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!

विद्यार्जन नि विद्यादानाला

जे सदैव सप्रेम सादर असतं

ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं!



वसंत देसाई, वसंत प्रभू

सी रामचंद्र नि सुधीर फडके

दादरचेच तर होते

ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर

चक्क नौशादसाहेब झोपत होते!

मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची

‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे

लताजींची रिहर्सल चालायची!

असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं…

म्हणूनच गडया,

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...



छबिलदासचा फर्मास बटाटावडा

नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’

नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर

नायतर नाकासमोरच्या गोमांतकात,

खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं

दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं

ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...



शिवाजी पार्कच्या मैदानाला

एक किलोमीटरचा कटटा असतो,

तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत

इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!

चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो

’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा

मात्र निराळाच ढंग असतो!

पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी

काला-खटटा च्या गाडीवर मात्र

गि-हाईक हमेशा हजर असतं...

नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं



हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत

साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत

लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत

फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!





पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ

फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ

भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का

गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का

अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत

दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!

हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...



पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर

नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर

इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण

नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण

सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं

ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं

ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई

त्याच लोकांचं इथे घर असतं,

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....

दिपिकाचा महिमा

दीपिका जेव्हा युवराज सिंग कडे गेली तेव्हा त्याचा फोर्म गेला आणि त्याला भारतीय टीम मधून निघावे लागलेले.
ती जेव्हा रणबीर कपूर कडे गेली तेव्हा रणबीर कपूर च्या फिल्म्स फ्लोप व्हायला लागल्याआता
ती मल्ल्या कडे आहे तर त्यांची किंगफिशर एयरलायींस कंपनी एकदम बंद पडायच्या लायकीला आली आहे
.
.
.
.
.
.
.

माहित नाही ती कॉंग्रेस मध्ये कधी जातेय ?