वाळू सागराला भिजवते
की सागर वाळूत भिजतो
एक थेंब येऊन पावसाचा
शिंपल्यात हळूच निजतो
तारे आकाशातून तुटतात
की तुटण्याची मजा लुटतात
तुझ्या माझ्या पाऊलखुणा
आठवणी बनून उमटतात
सुगंध बरसवते रातराणी
की भ्रमराला तरसवते रातराणी
मिटून घेईल पापण्या
लाजाळूला पाहू नका कुणी
दवात भिजलेल्या पाकळ्या
होत्या धुक्याखाली झाकल्या
गंध माळला होता फ़ुलांनी
तुझ्या केसात मोकळ्या
- अमोल घायाळ
की सागर वाळूत भिजतो
एक थेंब येऊन पावसाचा
शिंपल्यात हळूच निजतो
तारे आकाशातून तुटतात
की तुटण्याची मजा लुटतात
तुझ्या माझ्या पाऊलखुणा
आठवणी बनून उमटतात
सुगंध बरसवते रातराणी
की भ्रमराला तरसवते रातराणी
मिटून घेईल पापण्या
लाजाळूला पाहू नका कुणी
दवात भिजलेल्या पाकळ्या
होत्या धुक्याखाली झाकल्या
गंध माळला होता फ़ुलांनी
तुझ्या केसात मोकळ्या
- अमोल घायाळ